अॅण्टीबायोटिक्स घेत असताना मद्यपान करू नये! खरं की खोटं… जाणून घ्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आजकालच्या आधुनिक जीवनात जसं सर्वकाही फास्ट झालं आहे त्याचप्रकारे लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत. आजकाल लोकांमध्ये आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. ह्यावेळी अनेकांना हा प्रश्न पडतो की, अॅण्टीबायोटिक औषधी घेत असताना मद्यपान करायला हवे की, नाही. तसे तर मद्यपान करणे आरोग्याच्या दृष्टीने वाईटच आहे.

 

antibiotics-aloccol-inmarathi
fourchette-et-bikini.fr

अनेकजन असे मानतात की मद्यपान केल्याने अॅण्टीबायोटिक औषधी व्यवस्थित काम करत नाहीत. काही लोकांना असे देखील वाटते की, अॅण्टीबायोटिक सुरू असताना मद्यपान केले तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi01
doctorshealthpress.com


लंडनच्या जेनीटूर्नरी क्लिनिक ने ह्यावर ३०० हून जास्त लोकांवर सर्वे केला होता. ज्यानुसार ८१ टक्के लोकं असे मानतात की, मद्यपान केल्याने अॅण्टीबायोटिक चा प्रभाव कमी होत नाही. तर ७१ टक्के लोकांच्या मते मद्यपानाचा ह्यावर काहीही फरक पडत नाही.

पण ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. पण डॉक्टरांच्या मते ह्या चुकीच्या धारणा लोकांना मद्यपान करण्यापासून दूर ठेवतात. म्हणून ते देखील लोकांच्या डोळ्यावरील पट्टी तशीच राहू देतात. ह्यामुळे लोकं मद्यपानापासून दूर राहतात आणि औषधी वेळेवर घेतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi03
glamour.com

अॅण्टीबायोटिक्सवर दारूचा काहीही वाईट परिणाम पण अश्याही काही अॅण्टीबायोटिक्स औषधी आहेत ज्या घेत असताना मद्यपान करणे चांगले नाही. सेफालोस्पोरिन सेफोटेटान घेताना जर तुम्ही मद्यपान करता तर तो शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतात. ह्या दोघांचे एका वेळी सेवन केल्याने त्यांच्यातून एसीटल्डिहाइड नावाचे केमिकल बनते. ज्यामुळे चक्कर येणे, उल्टी होणे, डोकेदुखी, छातीत दुखणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

 

antibiotics-aloccol-inmarathi02
YouTube

डायसल्फाईड नावाची औषध घेत असताना देखील अश्याच प्रकारची लक्षणे आढळतात. ही औषध मद्यपान सोडविण्यासाठी वापरण्यात येते. ह्यामागे एकच कारण असत की, जर कोणी मद्यपान केलं तर त्याला त्याचा त्रास व्हावा आणि त्यामुळे त्यांनी मद्यपान करण्यापासून दूर राहावे.
तसेच अॅण्टीबायोटिक मेट्रोनिडाजोल घेताना देखील मद्यपान न करण्याची ताकीद दिली जाते. कारण असे केल्याने डोकं दुखणे, चक्कर येणे, उलटी होणे अश्या सर्व समस्या उद्भवू शकतात. ही औषध मेट्रोनिडाजोलला दातात इन्फेक्शन असल्यास तसेच इतर जखमांच्या उपचारासाठी दिल्या जाते.

आणखी इतरही काही अॅण्टीबायोटिक्स आहेत, जे घेताना मद्यपान करण्यास मनाई करण्यात येते. टिनिडाजोल, लाइनेजोलिड आणि एरिथ्रोमायसिन इत्यादी.

 

antibiotics-aloccol-inmarathi04
movenoticias.com

पण त्यासोबतच अश्याही काही अॅण्टीबायोटिक्स आहेत ज्या घेताना मद्यपान केल्यास काहीही परिणाम होत नाही. पण असे केल्याने तुमचा आजार बरा व्हायला वेळ नक्की लागू शकतो.

अॅण्टीबायोटिक्सचा वापर हा अनेक आजारांच्या उपचारात केला जातो. म्हणू डॉक्टर नेहेमीच अॅण्टीबायोटिक्स घेताना मद्यपान करण्यास मनाई करतात. कारण आजार बरा होण्याच्याच बहाण्याने लोकं मद्यपानापासून दूर राहतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *