कॉकपिटमध्ये अभ्यासिका आणि पंखाची गॅलरी : त्यांनी विमानातच बनवले ‘स्वप्नातले घर’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काहीतरी जगावेगळं करून दाखवणे… ह्या वाक्याची आजची परिभाषाच बदलली आहे. ह्या व्याक्याचा काही लोकांनी एवढा शब्दशः अर्थ घेतला की, खरच जगापेक्षा काहीतरी अतीच वेगळं करून बसतात. ज्याला आपण weird म्हणतो. असंच काहीतरी केलं आहे Bruce Campbell ह्यांनी. त्यांनी त्यांच्या स्वप्नाच्या घराची एक वेगळीच प्रतिमा सर्वांसमोर मांडली आहे.

 

airoplane house-inmarathi06
inspiring.ntd.tv

Bruce हे मागील ६ महिन्यांपासून एका विमानात आपलं घरं बनवून राहत आहेत. हा पण हे विमान हवेत उडत नाही तर ते नेहेमी जमिनीवरच असते. Bruce हे Aircraft Fleet Recycling Association (AFRA) चे सदस्य आहेत. ह्या ग्रुपचं काम म्हणजे हे जुन्या विमानांचे सुंदर घरांमध्ये रुपांतर करतात.

 

airoplane house-inmarathi05

inspiring.ntd.tv


ह्याची सुरवात १९९९ साली झाली, जेव्हा Bruceने १००,००० मिलियन डॉलरमध्ये Boeing 727 हे विमान विकत घेतले आणि त्यालाच आपला महाल बनवला.

ह्या विमानाला एका घराचं रूप देण्यासाठी Bruce यांना अनेक वर्ष लागली.

 

airoplane house-inmarathi
atlasobscura.com

ह्या विमानात बनलेल्या घरात दोन रेस्टरूम आणि दोन शॉवर आहेत. कॉकपिटला रीडिंग रूममध्ये रुपांतरीत करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या पंखांना Deck बनविले गेले आहे. ह्या विमानाच्या १०६६ स्क्वेअर फुट एरियाचा Bruce ने पुरेपूर वापर केला आहे.

 

airoplane house-inmarathi04
atlasobscura.com

याबाबत Obcura शी झालेल्या मुलाखतीत Bruceने सांगितले,

ही जागा लवकर खराब होणारी नाही, तसेच ह्याची साफ-सफाई करणे देखील खूप सोप्पे आहे. त्यासोबतच आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे इथे खूप जागा आहे.

 

airoplane house-inmarathi02
atlasobscura.com

जर तुम्हालाही असा विमानाचा महाल हवा असेल तर तुम्ही Bruce ह्यांना संपर्क करू शकता…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *