मासिक पाळी मध्ये काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

मासिक पाळी दरम्यान मूड स्वींग्स होणे, चिडचिड होणे साहजिक आहे. मासिक पाळी दरम्यान अनेकदा कोणाशीही बोलायची इच्छा होत नाही, कधी खूप आनंद होतो तर कधी मन दुखी होते. असे मूड स्वींग्स होतच असतात.

आपली अशी वागणूक बघून आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास व्हायला लागतात. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान काही गोष्टी करण्यापासून वाचले तर कदाचित हे मूड स्वींग्स एवढे त्रासदायक ठरणार नाही.

मासिक पाळी दरम्यान कुठलाही डिप्रेसिंग चित्रपट किंवा कार्यक्रम बघू नये. ज्यामुळे आपल्या भावना दुखावणार नाही. चित्रपट किंवा कार्यक्रमात दाखविलेले क्षण बघून आपणही भावूक होऊन जातो.

म्हणून होईल तेवढं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या गोष्टी, कार्यक्रम बघा. ह्याने तुमचा मूड पण चांगला राहिलं आणि इतरांना देखील त्रास होणारं नाही.

DEPRESSION01-marathipizza
Getty Images

अनेक स्त्रियांना मासिक पाळी दरम्यान पाय आणि कंबरेत खूप दुखणे असते कारण त्यावेळी आपल्या शरीरातील एस्ट्रोजेनची लेव्हल खूप कमी होऊन जाते. मासिक पाळीचा पहिला दिवस हा अतिशय त्रासदायक असतो.

ज्या महिलांना त्या त्रासातून जावे लागते त्यांनाच हे सर्व कळू शकत. त्यामुळे ह्या दरम्यान डेंटिस्ट किंवा डॉक्टरची अपॉइंटमेंट नाही घ्यावी. तसेच मासिक पाळी दरम्यान वॅक्सिंग देखील करू नये.

पण त्यानंतरच्या आठवड्यात तुम्ही वॅक्सिंग करू शकता, कारण तेव्हा तुमच्या शरीरातील एस्ट्रोजेन लेव्हल नॉर्मल होऊन जाते.

 

WAXING-inmarathi
skinfacebodyclinic.com

 

मासिक पाळी दरम्यान हलक्या रंगाचे किंवा पांढरे कपडे घालणे टाळावे. तसे तर हे रंग एव्हरग्रीन आहेत त्यामुळे आपल्याला ते आवडतातच, पण मासिक पाळी दरम्यान असे रंग घालणे खूप रिस्की असू शकते.

कारण असे केल्यास डाग लागण्याची भीती असते. जसे आपण सॅनिटरी नॅपकिन्स जाहिरातींमध्ये बघतो की, मुली पांढरे कपडे घातलेल्या दिसून येतात. पण खऱ्या आयुष्यात मासिक पाळी दरम्यान पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालणे टाळावे.

woman-during-periods-inmarathi01
visual-therapy.com

 

अनेकांच्या मते मासिक पाळी दरम्यान जिम ला जाऊ नये किंवा व्यायाम करू नये. पण हा निव्वळ एक गैरसमज आहे. Women Health Magazine नुसार मासिक पाळी दरम्यान थोडाफार व्यायाम करत राहावा.

व्यायाम किंवा योगा केल्याने बॉडीपेन कमी होते तसेच मासिक पाळीत होणारा त्रास देखील कमी होतो. अनेक स्त्रिया सांगतात की, मासिक पाळीमध्ये देखील व्यायाम केल्याने त्यांचा त्रास कमी झाला.

girl-doing-exercise-in-morning-inmarathi
hdwallpapersrocks.com

शरीरातील कॅलशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण दुध-दही खात असतो. पण मासिक पाळी दरम्यान हे पदार्थ खाऊ नये.

मासिक पाळीत होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी डेअरी प्रोडक्ट्स खाऊ नये. डॉक्टरांच्या मते मासिक पाळी दरम्यान कॅलशियम घ्यायला हवे पण डेअरी प्रोडक्ट्स खाण्यापासून वाचायला हवे.

कारण ह्यामुळे त्रास वाढतो. ह्याचं कारण म्हणजे ह्यात एराकाडोनी अॅसिड आढळत ज्यामुळे त्रास वाढतो.

 

indiafilings.com

 

नोकरी करणाऱ्या स्त्रिया ह्या कामाच्या नादात कधीकधी पॅड बदलायचं टाळतात. पण हे खूप घातक असतात. मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप गरजेची असते.

जर आपण पॅड खूप काळापर्यंत बदलला नाही तर त्यात बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात ज्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून पॅडला दर तीन ते चार तासाला बदलाने गरजेचे असते. त्यामुळे ते टाळणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

 

periods-inmarathi
newstrack.com

मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध बनविणे टाळावे. त्या दरम्यान शारीरिक संबध ठेवल्यास गर्भधारणा होत नाही हा निव्वळ एक गैरसमज आहे. मासिक पाळी दरम्यानही गर्भधारणा होण्याची शक्यता असते. पण संक्रमण होण्यापासून वाचण्यासाठी ह्या दरम्यान संबंध बनविणे टाळावे.

मासिक पाळी दरम्यान शरीर कमकुवत झालेलं असतं त्यामुळे थकवाही जाणवतो. म्हणून ह्या दरम्यान पुरेश्या प्रमाणात खाणे गरजेचे असते. खाण्यापासून वाचणे किंवा न खाणे ह्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. ह्या दरम्यान जमेल तेवढं पौष्टिक आहार घ्या.

 

woman-during-periods-inmarathi
medicaldaily.com

मास्टरबेशन करणे हे तसे आरोग्यासाठी चांगलं असत त्यात काहीही गैर नाही, पण मासिक पाळी दरम्यान हे करणे जरा घातक ठरू शकते. ह्यामुळे संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान मास्टरबेट न केलेलेच बरे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?