देशासाठी काम करणाऱ्या या श्वानांना निवृत्तीनंतर ठार केले जाते, एका विशिष्ट कारणामुळे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कुत्रा हा एक इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. कुत्रा हा आपल्या मालकाशी नेहमी इमानदारीने वागतो. तो आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी मानतो.

तसेच, कुत्रा हा अत्यंत चपळ आणि हुशार प्राणी आहे. त्याला योग्यप्रकारे ट्रेनिंग दिल्यास तो गुन्हेगारांना शोधण्यासाठी देखील पोलिसांना मदत करतो.

 

Indian Army dogs.Inmarathi
blogspot.com

सैन्यामध्ये माणसांबरोबरच हे कुत्रे देखील देशाचे रक्षण करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. जेव्हा कुत्र्याने स्वतःच्या जीवाशी खेळून एखाद्या सैनिकाचे प्राण वाचवले आहेत असे देखील कितीतरी वेळा झाले आहे.

सैन्यातील हे कुत्रे बॉम्ब, दारुगोळा आणि आतंकवाद्यांच्या ठिकाणांना शोधून काढण्यासाठी सैन्याची मदत करतात. कुत्र्यांच्या याच इमानदारीमुळे त्यांना माणसांचा खरा मित्र म्हटले जाते.

एकवेळ तुमचा मित्र तुमची मदत करण्यापासून मागे हटेल, पण तुमचा कुत्रा कधीही मागे हटणार नाही.

असे असूनही हे कुत्रे जेव्हा सैन्यामधून निवृत्ती घेतात, तेव्हा सैन्याद्वारे त्यांना गोळी मारून ठार करण्यात येते. पण ही विचार करण्याची गोष्ट आहे की, सैन्याची एवढी मदत करूनही या कुत्र्यांना का मारले जाते?

ह्यामागे एक विविष्ठ कारण आहे.

भारतीय सैन्यामध्ये तीन जातीच्या कुत्र्यांना समाविष्ट करून घेतले जाते. यामध्ये लेब्रोडोर, जर्मन शेफर्ड आणि बेल्जियम शेफर्ड या जातींचा समावेश होतो. सैन्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या कुत्र्यांच्या खाणे – पिण्यापासून त्यांच्या सुरक्षेपर्यंत सर्वप्रकारे त्यांची काळजी घेतली जाते.

या कुत्र्यांना योग्य ते प्रशिक्षण देखील दिले जाते. हे कुत्रे प्रत्येकवेळी एखाद्या आर्मी ऑफिसरसारखे अलर्ट राहतात.

 

Indian Army dogs.Inmarathi1
topyaps.com

जेव्हा एखादा कुत्रा एक महिन्यापेक्षा जास्त आजारी राहिला किंवा आपली ड्युटी योग्यप्रकारे करू शकला नाही, तर त्या कुत्र्याला अॅनिमल यूथेनेशिया नावाचे विष देऊन मारून टाकले जाते.

सैन्यामध्ये कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याची परंपरा खूप जुनी आहे. हे त्या काळापासून चालत आलेले आहे, जेव्हा इंग्रज भारतावर राज्य करत होते.

कुत्र्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मारून टाकण्याचे पहिले कारण हे आहे की, कुत्र्यांना सैन्याच्या बेस लोकेशनची पूर्ण माहिती असते, तसेच त्यांना सैन्याचे कितीतरी गुप्त गोष्टी माहीत असतात. त्यामुळे या कुत्र्यांना एखाद्या सामान्य माणसाला देणे, हा सुरक्षेला खूप मोठा धोका ठरू शकतो.

हा धोका टाळण्यासाठी सैन्य असा कटू निर्णय घेतं.

 

Indian Army dogs.Inmarathi2
wordpress.com

शिवाय कुत्र्यांना सैन्यामध्ये विशेष सुविधा दिल्या जातात, ज्यांची या कुत्र्यांना सवय लागते. सैन्यासारखी या कुत्र्यांना सुविधा देणे कोणत्याही माणसाला किंवा वेल्फेअर सोसायटीला खूपच कठीण असते.

आणि एक कारण असे आहे की, सेना त्यांना दुसऱ्या कोणाकडे पाठवू इच्छित नसते. ते म्हणजे ह्या कुत्र्यांचा सन्मान…!

या सैन्यातील कुत्र्यांना मारण्यापूर्वी त्यांना योग्य तो मानसन्मान सैन्याकडून दिला जातो.

त्यांना त्यांनी केलेल्या कार्यासाठी विशेष आदरांजली वाहिली जाते आणि त्यानंतरच असे पाऊल उचलले जाते. जर कुत्रे रिटायर करून सोडून दिले तर ही आदरांजली देता येणार नाही…हे ते कारण!

हे सर्व वाचून विचारात पडायला होतं…एकीकडे कौतुक वाटतं, भारतीय सैन्याचं…दुसरीकडे त्या कुत्र्यांसाठी वाईट वाटतं…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?