हृदय रोग टाळण्याचा मार्ग : कुत्रा पाळा!

zuckerbrg dog inmarathi
Wired

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम


===

सध्याच्या आधुनिक लाइफस्टाइलमुळे मधुमेह, किडनी फेल्युअर, हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण अगदी सामान्य झाले आहे. अगदी कमी वयातदेखील यांसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात आणि हा फारच चिंतेचा विषय आहे.

जगभरातील डॉक्टर्स आणि संशोधक यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण, खरा बदल हवाय तो आपल्या जगण्याच्या आणि खाण्याच्या सवयींमध्ये!

असो, तर अलीकडेच झालेल्या एका संशोधनानुसार आपल्या घरातील पाळीव प्राणी देखील आपले स्वास्थ्य तंदुरुस्त राखण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतात, असे सिद्ध झाले आहे.

हो, हो! आजवर पाळीव प्राणी आणि त्यांच्या अंगावरील केस मानवी आरोग्याला कसे घातक असू शकतात हेच आपण ऐकत-वाचत आलोय, हे जरी खरं असलं तरी अलीकडे झालेले हे संशोधन काही नवीनच निष्कर्ष सांगत आहे! काय आहे हा निष्कर्ष जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख आवर्जून वाचा!

 

pet animal inmarathi
coolmisthumidifier.org

तुमचा लाडका कुत्रा, डॉगी किंवा पपी जे काही तुम्ही म्हणत असाल ते, तुमच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकतो.

संशोधकांच्या एका पथकाने अलीकडे असा निष्कर्ष काढला आहे की, ज्यांच्या घरी कुत्रे पाळले जातात त्यांना घरी कुत्रे न पाळणाऱ्या लोकांपेक्षा हार्टअटॅक येण्याचा धोका कमी असतो.


अगदी इतर कोणत्याही पाळीव प्राण्यापेक्षा ज्यांच्या घरी हा प्राणी आहे त्यांचे आरोग्य अगदी ठीकठाक आहे, असे म्हणायला हरकत नाही.

खरेतर झेक मधील १,८०० प्रौढ व्यक्तींच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे हे खरे असले तरी, यापूर्वी देखील २०१३ मध्ये अमेरिकन हार्ट असोसिएशनने (एएचए) देखील कुत्रे पाळल्याने हृदय विकारांची शक्यता कमी होते असे शास्त्रीय विधान केले होते.

ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा असतो ते लोक शारीरिक दृष्ट्या जास्त अॅक्टीव्ह असतात. या निष्कर्षानुसार या लोकांचा आहार आणि व्यायाम देखील ठीकठाक असतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे.

“ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा असतो, ते कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने फिरायला जातात. त्यामुळे त्यांची शारीरिक हालचाल सुरु राहते. याचाही फायदा त्यांना स्वतःला होत असावा,” असे मत डॉ. फ्रान्सिस्को लोपेझ-जीमिनिझ यांनी व्यक्त केले.

 

dog walk inmarathi
greenshirtstudio.com

आणि त्यांच्या आहाराच्या सवयींमुळे देखील त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात रहायला मदत होते, असेही ते म्हणाले. डॉ. लोपेझ-जीमिनिझ मायो क्लिनिक रॉचेस्टर मध्ये हृदयरोगतज्ञ म्हणून काम पाहतात.

कुत्रा पाळणाऱ्या लोकांचा आहारदेखील अगदी पौष्टिक असतो. तसे पाहता या दोन्ही गोष्टीचा एकमेकांशी काहीही संबंध नसेलही.

मागे एकदा अशाच पद्धतीने करण्यात आलेल्या संशोधना मध्ये असे दिसून आले की, कुत्र्यांना फिरण्याची सवय असते त्यामुळे आपसूकच त्यांच्या मागून फिरणे आणि इतर हालचाली होत राहतात.

“कुत्र्यांसोबत असण्याने एक प्रकारचा भावनिक आधार देखील वाटतो, एकटेपणा येत नाही,” असेही डॉ. लोपेझ म्हणाले.

“पाळीव कुत्र्यांमुळे तुमचा भावनिक एकटेपणा कमी होतो, त्यांच्यामुळे तुम्हाला एक कारण मिळते… ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची असते, त्यामुळे तुम्ही आपसूकच तुम्ही स्वतःची देखील काळजी घेऊ लागता,” डॉ. लोपेझ म्हणाले.

 

dog inmarathi
news.com

अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए)चे डॉ. ग्लेन लेविन, सातत्याने पाळीव प्राणी आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दल लिहित असतात. त्यांच्या मते, “आमच्याकडे अगदी पुरेसा डाटा असा आहे, ज्यावरून कुत्रे पाळल्याने लोकांची शारीरिक अॅक्टीव्हीटी वाढते हे दिसून येते.”

“अगदी यामुळेच हृदयाला थेट आणि जास्त फायदा होतो,” लेविन म्हणाले.

डॉ. लेविन यांच्या मते,

“अर्थात पाळीव प्राण्यांमुळे थेट हृदयाला फायदा होतो म्हणणे देखील फारच धाडसाचे ठरेल मात्र, याचे इतर काही छोटे छोटे फायदे आहेत ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जसे की, अशा लोकांवरील तणाव कमी होतो, त्यांना आनंद वाटतो आणि त्यांना आपल्या सोबत कुणी आहे ही सोबतीची भावना जास्त आनंद देते, अशाच इतर काही गोष्टींमुळे देखील हे लोकं स्वतःची अगदी व्यवस्थित काळजी घेत असतील.”

या अभ्यासासाठी डॉक्टरांनी २५ ते ६४ या वयोगटातील १,७६९ लोकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले आणि त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ६७% कुत्र्यांच्या मालकांनी एएचएच्या आदर्श व्यायामाची मागणी पूर्ण केली.

यात दररोज १५० मिनिटांसाठी एरोबिक्स व्यायाम आणि ७५ मिनिटांसाठी जोरात केलेली शरीराची हालचाल आणि प्रत्येक आठवड्याला दोन दिवस स्नायुंना बळकटी देणारा व्यायाम असायला हवा. त्याप्रमाणे हे लोक व्यायाम देखील करतात. याउलट ज्यांच्याकडे कुत्रा पाळलेला नाही त्यातील फक्त ४८% लोकांनी ही मागणी पूर्ण केली.

 

exercise inmarathi
startclub.es

आहाराच्या बाबतीत देखील एएचएच्या प्रमाणित आहाराच्या कसोटीनुसार ज्यामध्ये फळे, भाज्या, कडधान्ये, फायबरयुक्त आहार, मासे आणि मटण यांचा समावेश असायला हवा, ज्यांच्याकडे कुत्रा पाळलेला आहे ते आहाराच्या बाबतीत काटेकोर असल्याचे दिसले आणि ते एएचएच्या प्रमाणित आहारानुसार आदर्श आहार घेतात.

“परंतु, हृदयासाठी घातक असणाऱ्या एका गोष्टीच्या बाबतीत मात्र हे कुत्र्यांचे मालक फारच कमी पडतात. ती गोष्ट म्हणजे त्यांचा स्मोकिंग रेट फारच असतो.

आता अमेरिका सारख्या देशात स्मोकिंग ही एक सामान्य बाब असल्याने कदाचित ही गोष्ट इथे प्रकर्षाने जाणवत असेल पण, इतर देशांत अशीच परिस्थिती असेल असे नाही,” असेही डॉ. लोपेझ म्हणाले.

“लोकांना कुत्र्याची सोबत फारच आवडत असेल म्हणून देखील त्यांच्या आरोग्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसत असेल कदाचित,” असेही डॉ. लेविन म्हणाले.

खरे तर, आपल्याला कुणाची सोबत आहे, आपण एकटे नाही, शिवाय आपल्यावर कुणाची तरी जबाबदारी आहे ज्यांच्यासाठी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे या लोकांना प्रकर्षाने जाणवत असले पाहिजे म्हणून देखील यांच्या एकूण जीवनशैलीत आणि आहारात योग्य ती काळजी घेतली जाते म्हणूनच त्यांना यासार्वाचे जास्त फायदे मिळतात.

खरे तर, मुळातच कुत्रा या प्राण्याविषयी आपलेपणा वाटला पाहिजे आणि खरेच एखाद्या कुत्र्याला आसरा मिळावा म्हणून कुत्रे पाळले गेले पाहिजेत.

 

dog inmarathi
blogspot.com

याचे बक्षीस म्हणून कदाचित तुम्हाला हे आरोग्याचे एक्स्ट्रा फायदे मिळू शकतात. परंतु, गरज आहे ती अंत:करणात भूतदया असण्याची. आरोग्याला फायदे होतात म्हणून कुत्रा पाळून चालणार नाही, कुत्र्याविषयी खरोखर आवड आणि प्रेम असणे गरजेचे आहे,” असेही डॉ. लेविन म्हणाले.


===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर । इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?