सेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रणय ही एक अशी क्रीडा आहे जी मनुष्याच्या भौतिक सुखातून त्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते, जेंव्हा स्त्री आणि पुरुष प्रणयात रममाण असतात तेंव्हा ऐहिक गोष्टींचा त्यांना विसर पडतो.

त्या वेळी ते कोणाचेच मुलगा, सून, आई वडील, बहीण भाऊ नसतात, तर फक्त प्रेमी असतात.

असा संदर्भ बऱ्याच ठिकाणी दिलेला आढळतो. रतिसुख, विलास, प्रेमसागर, सेक्स इत्यादी बरेच नावं आहेत प्रणयासाठी. याबद्दल लिहिले जाते, चित्रे काढली जातात.

 

Sex-inmarathi01
thinkingparticle.com

आपल्या भारतात तर बऱ्याचश्या लेण्यांमध्येही प्रेमाच्या प्रतिमा दाखविल्या आहेत. ज्यात नर-नारी आणि प्रणय यांचा दृष्टांत दिला आहे.

प्रणयाचे दुसरे नाव म्हणजे आनंद! पण तो संमतीने, प्रेमाने आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करून केलेला असेल तर.. राजा ययातीने तर या विलासातून बाहेर येण्यासही नकार दिला होता.

त्याच्या मते पृथ्वीवर असे काही असेल ज्याने अपार आनंद मिळतो, मनुष्याची ब्रम्हानंदी टाळी लागते तर तो म्हणजे विलास-सागर.

आता हि अतिशयोक्ती देखील वाटू शकते..

कारण आपण राजे नाहीत आणि आपल्याला हे सोडून बरीच कामे देखील असतात. पण काही अंशी हे सत्य देखील आहेच ना?


मानसिक, शारीरिक ताण विसरायला लावून जोडप्यांमधील नातं अधिक दृढ करणारे हे एक औषध आहे असे म्हणूया हवं तर..

 

sexual-pleasure-inmarathi
hindustantimes.com

“यात माशी शिंकतेय कुठे?”

..पण हा भान हरपून केल्यानंतरचा संदर्भ आणि सुख आहे…
सध्या तरी फक्त प्रणयातील समतेवर आपण खुश नाही आहोत. स्त्री पुरुष यांची बरोबरी आता खोली बाहेर येऊन सगळीकडे डोकावू पाहतेय.. अर्थात गरजही आहेच म्हणा त्याची!


ज्याचे पडसाद आता फक्त सामाजिक राहिलेले नसून त्याचा वैयक्तिक जीवनावरदेखील परिणाम होऊ पाहत आहे.

यातील एक परिणाम हा जोडप्यांच्या वैवाहिक जीवनावर झालेलेही दिसून येतो.

भावनिकदृष्ट्या हळवी मानलेली स्त्री आता फक्त भाबडेपणाचा चष्मा घालून वावरत नाही तर तर्कशात्राचा वापर करून कुठे हळवेपणा किंवा संवेदनशीलता दाखवायची आणि कुठे नाही हे ओळखू लागली आहे.

“लिंगवाद म्हणजे काय रं भो?…”

समानतेच्या गप्पा लिंगभेद आणि परिणामतः लिंगवादापर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत.


Queensland’s School of Psychology यांनी काही मानसोपचारतज्ज्ञांकडून करवून घेतलेल्या द्विवार्षिक सर्वेनुसार असे दिसून येते की, लिंगवादाचे २ प्रमुख प्रकार पडतात.

एक आहे “विरोधी किंवा शत्रुत्व ठेवणारा” लिंगवाद आणि दुसरा आहे “परोपकारी” लिंगवाद.

 

Sex-inmarathi02
money.cnn.com

‘विरोधी लिंगवाद (hostile sexism)’ याला असे समजून घेता येईल कि यात स्त्री हि स्वतःच्या जोडीसारास प्रणयाच्या बाबतीत स्वार्थी समजते, यातून हा वाद फोफावला जातो ज्याचा थेट परिणाम, लैंगिक आयुष्यावर होतो.


‘परोपकारी लिंगवादात (benevolent sexism)’ स्त्री ही स्वतःला परावलंबी समजते, जी तिच्या जोडीदारावर प्रेमासाठी, सरंक्षणासाठी अवलंबून असते.

त्यामुळे हा वाद जन्माला येतो. यात विरोधी किंवा शत्रुत्व ठेवणारा लिंगवाद चटकन ओळखता येऊ शकतो पण परोपकारी लिंगवाद ही एक अप्रकट अशी पडद्यामागील भावना असते, प्रेमाच्या आणि या वादाच्या मधील फरक ओळखणे जरा अवघड आहे.

“या वादातूनही… प्रेमात भेग ?”

जिथे फक्त सामाजिक व्यवस्थेमध्ये समानता पाहिजे होती ती आता जोडप्यांच्या शयनकक्षेतदेखील घर करू पाहत आहे. खरे आहे..

जर तुम्हाला वाटते आहे कि लिंगवाद हा फक्त तुमच्या सामाजिक आयुष्यावरच परिणाम करत असावा तर ‘बेटा, तुम फस चुके हो!’

संशोधन तर असे म्हणते की हा लिंगवाद तुमच्या अतिशय खाजगी म्हणजेच लैंगिक आयुष्यावरदेखील परिणाम करत आहे.


विरोधी लिंगवादातून स्त्रीचा जोडीदाराबाबत समाज झालेलाच असतो ज्यात ती समजत असते की तिचा जोडीदार हा तिच्या पेक्षा वयाने तरुण आहे, आकर्षक आहे, तो तरुणींमध्ये प्रसिद्धही असेल, इत्यादी. तसेच त्यांना तो प्रणयामध्ये स्वार्थी देखील वाटू शकतो.

 

sex-inmarathi03
guardian.ng

जिथे हा लिंगवाद येतो तिथे स्त्रिया प्रणयातील सुखाचा परमोच्च बिंदू (ऑरग्याझ्म) अनुभवू शकत नाहीत त्याच्या शक्यता कमी असतात, कारण त्या १०० टक्के स्वतःला त्यात झोकून देत नाहीत.

तिथेच जर जोडीदार खरंच स्वार्थी असेल तर यात स्त्रीमनाचा विचार केलाच जात नाही परिणामतः “नो ऑरग्याझ्म”.

यामुळे प्रणयातील अतृप्तता नात्यात दुरावा आणू शकते. तसेच, परोपकारी लिंगवाद असे मानतो की ज्या स्त्रियांना पुरुषांबद्दल अवाजवी आत्मीयता असते, पुरुषावर आत्मविश्वास असतो तसेच त्या त्यांच्या गरजा आणि संरक्षणासाठी पुरुषांवर विसंबून असतात याच्या ओझ्याखाली दाबून त्या सेक्स हे एक कर्तव्य समजतात.


त्यांना यामागेही प्रेमापेक्षा एक कर्तव्याची भावना जास्ती येते. खूपजणी मन मारून जगत असू शकतात.

नवऱ्याला देव मानणाऱ्या वैगेरे टिपिकल स्त्रिया पण यातच मोडत असाव्यात. याचा परिणाम म्हणजे त्यादेखील बऱ्याचदा ऑरग्याझ्म पर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण त्यांच्या भावना अव्यक्त राहतात. त्या उघड केल्या जात नाहीत.

स्त्रियांची काळजीयुक्त नजर आणि आत्मीयता हे दाबून टाकत असावी आणि आपण आधीच चर्चा केल्या प्रमाणे, प्रणय हा दुहेरी असतो.

 

sex-inmarathi04
bigjunkies.com

याबद्दल महिलावर्गासोबत चर्चा केली असता असे समोर आले की काही परोपकारी लिंगवादांना सामोऱ्या गेलेल्या महिलांचे म्हणणे आहे की,

“पुरुषांना फक्त आपल्या समाधानाशी मतलब असतो, कधी एकदा मोकळा होऊन शांततेत झोपेन असे त्यांना होते, इथे ऑरग्याझ्म पर्यंत तर सोडाच पण आमच्या भावना समजून घेण्याचीही बऱ्याचदा त्यांना पडलेली नसते..”

इथे एक हताशपणा दिसून येतो यातही त्यांची काळजीयुक्त नजर त्यात राग येऊ देत नाही.

तर विरोधी लिंगवाद सहन करणाऱ्या महिलांना वाटते की, ‘पुरुष हे खूप स्वार्थी असतात ते फक्त स्वतःचाच विचार करतात. स्वतःची मिजास त्यांना प्यारी असते, त्या जोरावर ते डावलून जातात’.

याचा सरळ सरळ परिणाम त्यांचा ऑरग्याझम पर्यंत न जाण्यावर होतो हे त्यांना मान्य आहे.

 

sex-inmarathi05
boldsky.com

“काही उपाय असू शकतात का…..?”

प्रयत्न नक्कीच करता येऊ शकतो. दंतकथेत सांगितल्या प्रमाणे, लिंगभेद लैंगिक आयुष्याच्या बाहेर ठेवून इथे समानतेवर जास्ती भर दिला गेला तर प्रश्न सुटू शकेल.

ज्या स्त्रियांना नवरा स्वार्थी वाटत असेल किंवा आपल्या पेक्षा जास्ती आकर्षित वगैरे वाटत असेल त्यांनी आपला हा न्यूनगंड जमेल तसा बाजूला करून सामोरे जावे.

आणि ज्यांना सेक्स हे एक कर्तव्य वाटत असेल त्यांनी समजून घ्या आणि समजावून सांगा की प्रणयातील आनंद कसा मिळवता येऊ शकतो.

शेवटी स्त्रियांना देखील मन आहे आणि आनंद हा प्रत्येकाचाच हक्क आहे, जोडीदारासमवेत बोलल्याने बरेच वाद टाळता येऊ शकतात.. काय म्हणता?


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?