सेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का? समजून घ्या

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लैंगिक सुखाशी संबंधित असणाऱ्या गोष्टींवर मोकळेपणाने न बोलण्याची एक सर्वमान्य प्रथा आपल्याकडे पहिल्यापासून चालत आलेली आहे. मुलगा किंवा मुलगी वयात येताना त्याच्या शरीरात अनेक बदल होत असतात.

पौगंडावस्थेत असताना होणारे हे बदल समजून घेणे, मानसिक पातळीवर ते बदल स्वीकारण्याची ताकद असणे –

यासाठी त्या मुलाला/मुलीला योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

ते मार्गदर्शन मिळाले नाही तर प्रत्येक मुला-मुलीमध्ये सेक्स, लैंगिक सुख, विरुध्द लिंगाच्या समवयस्क व्यक्तीशी होणारे आकर्षण याबद्दल अत्यंत चुकीच्या समजुती विकसित होत जातात.

 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

अगदी शिकलेल्या, व्यावसायिक आणि चांगल्या हुद्द्यावर काम करणाऱ्या महिला देखील सेक्स बद्दलच मूलभूत सत्य दुर्लक्षित करताना दिसून येतात. सेक्स आधी, नंतर किंवा दरम्यान बाळगायची सावधानता दुर्लक्षित होताना दिसून येते. यावर लैंगिक शिक्षण (सेक्स एज्यूकेशन) हा एक उपाय आहे.

लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे या विषयाची चर्चाही होत नाही आणि गैरसमज तसेच राहतात.

आपल्या मनात रुजवलं जातं की प्रणय करणे ही गोष्टच मुळात वाईट आहे. चुकीच्या लैंगिक धारणांमधून ही गृहीतके आलेली आहेत आणि त्यांचा आपल्या वैयक्तिक जीवनावर जबरदस्त पगडा आहे.

===

हे पण वाचा :


प्रणयादरम्यान हमखास होणाऱ्या या सहा चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजेत !

===

दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात दाखवण्यात आलेली गोष्ट.. एका १४ वर्षे वयाच्या मुलीला तिच्या मित्रमैत्रिणींने सांगितले, की एखाद्या मुलाचे चुंन्बन घेतल्यामुळे ती आता गरोदर असू शकते.

ते लोक मस्करी करत असले तरी मुलीला ते खरे वाटले, तिने इंटरनेटवरती शोधून काही गोळ्या घेतल्या ज्यामुळे तिच्या गर्भाशयाचे कायमचे नुकसान होऊन बसले.

एखाद्या १४ वर्षाच्या मुलीला इतकी सोपी गोष्ट देखील कशीकाय माहित असू शकत नाही.


 

Sex-before-marriage-inmarathi
careguru.in

१४ वर्षाच्या मुलीचे सोडा,

“कपडे अंगावर असताना सेक्स केला तर गर्भधारणा होते काय?”

असा प्रश्न जेव्हा एका २२ वर्षाच्या मुलीने सेक्स थेरेपिस्टला करावा? अविश्वसनीय वाटतं ना? ही अतिशयोक्ती नाहीये. त्यांच्यासाठी तर हे धक्कादायक असणार.

बी-टेक ची पदवीधर असूनही सेक्स बद्दल इतकं अज्ञान?


या अज्ञानामुळे अनेक मुली शाळेत असताना स्वतःला मुलांपासून दूर ठेवतात. म्हणजे त्यांच्याशी किमान मैत्रीही करीत नाहीत.

शाळेतील प्रेमात असणारे जोडपे आणि त्यांच्यातल्या मुली यांपासून त्या शक्य तितके जास्ती अंतर दूर असतात.

अशा मुलींना गमतीने “संस्कारी नारी” किंवा “साध्वी” म्हणायची पद्धत आहे.

पण गंभीर बाब ही की अशा मुली आणि मुळे लैंगिक गोष्टींबद्दल अज्ञानी असतात आणि शालेय जीवनानंतर अगदी पदवी झाल्यावरही हे अज्ञान कायम राहिते.

सामाजिक नियमानुसार असे लोक “उत्कृष्ट मुलगा/मुलगी” असतात.

===


हे पण वाचा :

‘संभोगवेड्या’ माणसासाठी – अरे वेड्या तू चुकीच्या गोष्टीत अडकला आहेस!

===

शिस्तशीर समाजाच्या नजरेत टिकून राहण्याचा हा अट्टाहास लैंगिक आरोग्याची वाताहत लावत राहतो. हे जास्त धोक्याचे असते.


हे होऊ नये म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आधी लोकांच्या मनावर बिम्बवावी लागेल, ती म्हणजे –

लैंगिक शिक्षण घेतल्याने सेक्स करण्याच्या इच्छेवर कोणताही परिणाम होत नाही.

 

sex-education-reuters_inmarathi
indiatoday.com

आपल्याला सेक्स/लैंगिक शिक्षणाबद्दल इतकी लाज का ?

ही गोष्ट चिंताजनक आहे की एखाद्या व्यक्तीला सेक्सबद्दल ज्ञान घेण्यासाठी लग्नापर्यंतची वाट पाहावी लागते. कोणीतरी या अज्ञानामुळे लैंगिक शोषणाला बळी पडू शकतो.


“संस्कारी” असणे म्हणजे या सर्वांची माहिती नसून या गोष्टींपासून लांब असणे आणि लैंगिक शोषणाचा बळी होणे असते का?

जिथे आपण कुपोषण आणि मानसिक आरोग्याबद्दल बोलू शकतो तिथेच सेक्स बद्दल का बोलू शकत नाही?

भारतात हा असा एकमेव विषय आहे ज्यावर उघडपणे बोलले जात नाही तो म्हणजे सेक्स. जिथे कामसूत्र लिहिले गेले अश्या भूमीत सेक्स आणि तसे प्रकार बोण्यास मनाई आहे, इथे असे अपेक्षित आहे की न बोलता देखील मुलांना वयात येण्याबरोबर या गोष्टी आपोआप समजाव्यात.

“East India Comedy” च्या या सात मिनिटांच्या व्हिडीओत भारतातल्या लैंगिक शिक्षणाच्या परिस्थितीवर अत्यंत चपखल भाष्य करण्यात आले आहे.

 

 

आधीच्या काळातील मुलांना आणि पिढीला हे धोरण नाईलाजाने लागू झाले. पण आजच्या इंटरनेटने कक्षा रुंदावलेल्या पिढीला देखील तेच धोरण आपण लागू करू पाहत आहोत, ज्याचा विपरीत परिणाम अनेक घटनांत दिसून येतो.


लैंगिक शिक्षणाचा अभाव हे लैंगिक शोषणाचे आणखी एक कारण बनत आहे.

===

हे पण वाचा :

हस्तमैथूनच्या या ९ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल !

‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?


स्त्रियांच्या लैंगिक भावनांबद्दल पुरुषांच्या मनातील काही पुरातन गैरसमज

या सात चुकीच्या सवयी तुमची लैंगिक उद्दिपनाची क्षमता कमी करतात..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “सेक्सची इच्छा आणि लैंगिक शिक्षणाचा काही संबंध असतो का? समजून घ्या

  • October 31, 2019 at 9:55 am
    Permalink

    मला देखील असे काही लेख प्रश्न व त्याची उत्तरे व सेक्स एज्युकेशन या बद्दल लिहायचे आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करा

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?