मैथुनाच्या बाबतीत सर्वच पुरुषांना “आक्रमक स्त्रिया” आवडतात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे हा’ हॉलिवूडपट ज्यांनी बघितला आहे त्यांना बऱ्यापैकी BDSM हा काय प्रकार आहे याची कल्पना असेलच. बाकी जे लोग पॉर्न बघतात त्या लोकांना ह्याबद्दल वेगळं सांगायला नको.

तर BDSM म्हणजे Bondage, Discipline And Sadomasochism . हा मैथुनाचा एक हिंसक असा प्रकार आहे. ज्यात एक व्यक्ती आक्रमक असते तर दुसरी व्यक्ती मध्यम. तर जी व्यक्ती आक्रमक असते ती दुसऱ्या व्यक्तीवर वेगवेगळ्या खेळण्यांचा मदतीने शारीरिक वार करते आणि अत्यंत हिंसक पद्धतीने मैथुन करतात. अनेक लोकांना अश्या प्रकारे मैथुन केल्यावर आनंद होत असतो.

 

foreplay-in-sex-inmarathi
herintalk.com

Dominatrix म्हणजे काय?

एखादी महिला आक्रमक असते, जी तिच्या मैथुना दरम्यान हिंसक पद्धतींचा अवलंब करते व पुरुषाचा पुरेपूर वापर शरीरसुखासाठी करून घेते. तिला dominatrix म्हटले जाते. Dominatrix हे domination या लॅटिन शब्दाचे स्त्रीवाचक रूप आहे. ज्याचा अर्थ मालक अथवा अधिपती असा होतो.

मग आपल्याला प्रश्न पडत असेल की पुरुष का अश्या हिंसक महिलांशी अश्या पद्धतीने मैथुन करतात, त्यातुन तर त्यांना इजा होते. तर हा तुमचा गैरसमज आहे.

एका संशोधनाअंती सिद्ध झाले आहे की पुरुषांना अश्या आक्रमक स्वभावाच्या स्त्रियांचं खूप आकर्षण असतं. त्याची काही कारणे आहेत. ती आपण जाणून घेऊयात.

आक्रमक स्त्री ही पुरुषाला वेदना जरी देत असली तरी त्या वेदनेतून पुरुषांना एक वेगळा आनंद मिळत असतो. त्यांची कामवासना त्यामुळे द्विगुणित होत असते.


आक्रमक स्त्रिया वेगवेगळ्या खेळण्यांचा मदतीने पुरुषाच्या शरीराला इजा पोहचवतात. पण या इजा त्या पुरुषांना मैथुनाची प्रेरणा देतात. त्यांचा मैथुनातुन मिळणाऱ्या आनंदाला द्विगुणित करतात. एखादी स्त्री हातात चाबूक घेऊन एखाद्या पुरुषाला मारते अशी सर्वसामान्य इमेज या मैथुन प्रकाराची आहे.

 

Wooldominatrix-inmarathi
adsoftheworld.com

प्रत्येक पुरुषाला पौगंडावस्थेत असताना एक शिक्षिका अथवा एखादी प्रौढ महिला क्रश असते. त्यावेळी त्याची एखाद्या खूप जास्त सुंदर आणि आकर्षक स्त्रीला जी त्याला आज्ञा देते तिला स्वतःला अर्पायचे असते. खरंतर ही त्या वयातील मैथुनाची कल्पना असते, जी सत्यात उतरावी अशी त्यांची इच्छा असते.

त्यासाठी ते एखाद्या आक्रमक स्त्रीला स्वतःला अर्पण करतात. त्या स्त्रीची शिक्षा त्यांना त्यांचा कल्पनाविलासाला खरं करण्याची वेळोवेळ संधी देत असतात.

एखाद्या प्रौढ स्त्रीचं बोलणं ऐकून घेणारा हा मुलगा पुढे जाऊन त्याचा कल्पनेप्रमाणे स्वतःला आक्रमक स्त्रीला अर्पण करतो त्यात खूप शिक्षा, इजा होते. जी त्याचा तारुण्यातील कल्पनांप्रमाणे असते. ज्यात तो स्वतःला तो शक्तीहीन स्वरूपात आणि त्या स्त्रीला प्रौढ महिलेच्या जागी बघतो जिच्यावर त्याचं क्रश असतं.

पारंपरिक समाजात, लग्न जुळवली जातात आणि त्यानंतर केला जाणारे मैथुन हे बऱ्यापैकी साधारण असते. त्यातल्या क्रिया ह्या साधारण पद्धतीच्या असतात.

ज्यात बऱ्याचदा पुरुषाला स्त्रीकडून अथवा स्त्रीला पुरुषाकडून फक्त तेवढया पुरतं तितकंच समाधान भेटत असतं. जो चरमानंद असतो तेवढाच काय तो मिळतो. ज्यामुळे पुरुषाला मैथुन करणे बऱ्याचदा एकांगी आणि कंटाळवाणे वाटू लागते. त्यांना काही उत्तेजित करणाऱ्या गोष्टी मैथुना रम्यान हव्या असतात.

जसं मोठया प्रमाणांत कामुकता, अत्याचार जे त्यांचा कल्पनेतील असतात. पण ह्या गोष्टी ते त्यांचा पारंपरिक पत्नी सोबत करू शकत नाही त्यामुळे ते आक्रमक स्त्रियांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारतात.

 

women-sexual-desire-inmarathi
m0.her.ie

प्रत्येक सामान्य पुरुषाची एकच गरज असते ती म्हणजे स्त्री कडून त्याचा स्वीकार केला जावा. पुरुषाला जीवनात सर्व गोष्टीवर प्रभुत्व हवं असतं. प्रत्येक गोष्ट मर्जीनुसार व्हावी असं त्यांना नेहमी वाटत राहतं पण जेव्हा हे पुरुष आक्रमक स्त्री कडे जातात तेव्हा ती स्त्री त्यांचा सर्व ताण हलका करते. स्वतःच संपूर्ण समर्पण केल्यावर त्यांना मोकळं झाल्यासारखं वाटतं.

त्यांना जबरदस्तीने काही गोष्टी बघायला लावल्या जातात, करायला सांगितल्या जातात, कचरा साफ सुद्धा कधी कधी करायला लावला जातो. अर्थात पुरुष आक्रमक स्त्री समोर एखाद्या गुलामसारखा राहतो.

अश्या गोष्टी तो त्याच्या पत्नी व पारंपरिक जोडीदारासोबत नाही करू शकत कारण त्याला “अपौरुषत्वाचा” डाग लागण्याची भीती असते.

कधी कधी फक्त एकटा पुरुषच नाही तर जोडीने हा मार्ग निवडून, अश्या गोष्टी करतात. कारण कंटाळवाण्या झालेल्या लैंगिक आयुष्याला त्यांना नवीन रंगत द्यायची असते.

ते इटरेस्टिंग बनवायचे असते. एकदम आकर्षक, सुंदर असं चांगलं लैंगिक आयुष्य असणं खूप नशिबाच काम आहे. पूर्ण कल्पनेतील गोष्टी मैथुनादरम्यान लागणाऱ्या खेळण्यांपासून , कपड्यांपासून ते dominance- submission च्या नाटकापर्यंत ह्या सर्व गोष्टी सामान्य बेडरूम मध्ये फार कमी घडतात. बऱ्याचदा त्यात मादकता आणणाऱ्या गोष्टीची स्त्रीच्या शरिरात कमतरता असते.

 

romance-inmarathi
rebelcircus.com

BDSM ही एक प्रकारची हिंसा आहे, असं  चित्र जरी मीडियात रंगवलं गेलं असलं तरी तसं अजिबात नाही.

बऱ्याच पुरुष व स्त्रियांचं मत आहे की ते सशक्तीकरणाचं एक साधन आहे. यातून व्यक्ती मोकळा होतो. त्याच मन मोकळं होतं तो निरनिराळ्या गोष्टी पार्टनर सोबत करतो ज्याने त्यांचातील बंधन आजून मजबूत होतं. माणसाची लैंगिकता ही खूप निराळी व आकर्षक आहे, ज्याचा आपण विचार ही करू शकत नाही.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?