“जर नाटकात फोन वाजत असेल तर नाटक करणं बंद” सुबोध भावेंच्या ट्विटवरील चर्चा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===


नाटक असो वा चित्रपट हि गोष्ट प्रत्यक्ष अनुभवण्याची असते. तो अनुभव घेताना आपल्याला पूर्णपणे आनंद मिळवण्यासाठी आजूबाजूला संपूर्ण शांतता असणे अनिवार्य असते. जर ती शांतता नसेल तर मात्र आपला हिरमोड होत असतो.

मोबाईल फोन हे नाटकात व्यत्यय येण्याचं सर्वात मोठं कारण आहे.

चालू कार्यक्रमात फोन वाजला तर प्रेक्षकांचा हिरमोड होत असतो, परंतु याचा जितका परिणाम प्रेक्षकांवर होतो  तितकाच परिणाम नाटकात अथवा कुठलाही स्टेज परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांवर होत असतो.

नाटक अथवा चित्रपट सुरु करण्याआधी फोन स्वीच ऑफ अथवा सायलेन्ट करण्याची सूचना करून देखील लोक तिचं पालन करतांना बेपर्वाई बाळगतात.

नेहमी घडणाऱ्या घटनांमुळे कलाकारांच्या कामावर परिणाम होतो आणि त्यांना मनस्तापाचा सामना करावा लागतो. यावर अनेक कलाकार आपल्या प्रतिक्रिया तीव्र शब्दात व्यक्त करत असतात.

 

subodh1-inmarathi
marathistars.com

मराठीतले सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांना देखील अश्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असल्यामुळे त्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर व्यक्त केल्या आहेत.

प्रकरण असं आहे की सुबोध भावे नुकतेच एका ठिकाणी नाटक करायला गेले होते, ह्या नाटकात त्यांची भूमिका होती. परंतु नाटकादरम्यान प्रेक्षकांचे फोन  खणखणायला सुरुवात झाले, ज्यामुळे सुबोधच्या अभिनयात व्यत्यय आला.

सुबोध यामुळे भडकला असून त्याने अश्या प्रेक्षकांना टार्गेट करून समाज माध्यमांवर टीका तर केली आहेच सोबतच असंच चालू राहणार असेल तर नाटक करणं थांबवेल अशी सूचना देखील दिली आहे.


 

subodh tweet 1 inmarathi
Twitter

त्याच्या ह्या पोस्टवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत, यात काही सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा देखील समावेश आहे. सुबोधच्या फेसबुक आणि ट्विटर वरील पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून ह्यात अनेक लोकांचा समावेश आहे.

काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूयात …

ट्विटरवरील प्रतिक्रिया:-

अभिनेते निपुण धर्माधिकारींची प्रतिक्रिया, त्यांनी सुबोध भावेंना निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं आहे.

 

nipun dharmadhikari tweet inmarathi
Twitter

नितीन गोडबोले नामक वाचकाने नाना पाटेकरांना देखील अश्याच समस्येचा सामना करावा लागल्याचं नमूद केलं आहे,

 

nitin godbole tweet inmarathi
Twitter

संगीतकार जयदीप यांनी देखील सुबोधचं समर्थन केलं आहे आणि नाट्यगृहात  जॅमर लावण्याची मागणी केली आहे.

 

jaydeep singer tweet inmarathi
Twitter

अनेकांनी ट्विटरवर ह्या विषयावर आपलं मत व्यक्त करताना अनेक उपाय देखील सुचवले आहेत त्यातले निवडक रिप्लाय आपण बघुयात..

 

hitendra koyande tweet inmarathi
Twitter

_

 

dhananjay patil tweet inmarathi
Twitter

ज्याप्रमाणे लोकांनि सुबोधचं ट्विटरवर समर्थन केलं आहे त्याप्रमाणे त्याला विरोध केला आहे..

 

ajit shilimkar tweet inmarathi
Twitter

अनेकांनि सुबोधला नाटक न सोडण्याचं आवाहन केलं आहे….

 

chetan tweet inmarathi
Twitter

_

 

dixit tweet inmarathi
Twitter

_

 

pravin kulkarni tweet inmarathi
Twitter

ज्या प्रमाणे ट्विटर वर लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्याचप्रमाणे सुबोधच्या फेसबुक पोस्टवर देखील अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत…

 


akshita kulkaarni comment inmarathi
Facebook

_

 

mayur limaye comment inmarathi
Facebook

_

 

Ashok Bhosale Comment Inmarathi
Facebook

हे सर्व झाल्यानंतर सुबोधच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, एक सकारात्मक बदल घडत असल्याचं दिसत आहे.

 

अश्याप्रकारे सुबोध भावेंनि आपल्या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलेली व्यथा हि निश्चितच समाजमनावर परिणाम  करून गेला आहे. कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात आपल्यामुळे काही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?