भारतात राहून, घराच्या बाल्कनीत भारत-पाकिस्तान दोन्ही झेंडे लावणारी, मोहम्मद जीनांची मुलगी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पाकिस्तानचे संस्थापक आणि पहिले गवर्नर जनरल मुहम्मद अली जिन्ना यांना तर सर्वच ओळखतात. जसं भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र असतं तसच पकिस्तानच्या नोटांवर मुहम्मद अली जिन्ना याचं छायाचित्र असतं.

 

Muhammad-Ali-Jinnah-inmarathi01
pakimag.com

पण तुम्हाला माहित आहे का – की जिन्ना यांची एक मुलगी देखील होती. जी भारत-पाकिस्तान फाळणी नंतर आपल्या कुटुंबापासून वेगळी होऊन भारतात राहिली. भारतात असूनही तिने आपल्या घराच्या बाल्कनीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे झेंडे लावले.

 

India-Pak Flags-inmarathi

 

१९४७ साली पकिस्तानला भारतापासून वेगळ करणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची एकुलती एक मुलगी दीना वाडिया या भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक वाडिया कुटुंबाच्या सून होत्या. फाळणी नंतर दीना यांनी भारतातच राहण्याचा निश्चय केला. जेव्हाकी त्यांचे वडील आणि कुटुंब पाकिस्तानात गेले.

दीना आणि त्यांचे वडील यांच्यामध्ये नेहेमी वैचारिक मतभेद राहिले. त्यांचे कधीही एकमेकांशी पटले नाही.

 

Dina-Wadia-Inmarathi
samaa.tv

 

दीना यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ साली झाला आणि योगायोगाने भारतही १५ ऑगस्टलाच स्वतंत्र झाला. दीना जेव्हा १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे एका भारतीय पारसी मुलाशी प्रेम जुळले. पण जिन्ना यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांची इच्छा होती की दीनाने एखाद्या मुस्लीम मुलाशी लग्न करावं.

जिन्ना यांनी दीनाला सांगितले की,

‘देशात कितीतरी मुस्लीम मुलं आहेत. तू त्यापैकी कोणाशीही लग्न कर.’

यावर दीना यांनी उत्तर दिले की –

‘देशात कितीतरी मुस्लीम मुली होत्या, मग तुम्हाला लग्न करण्यासाठी माझी पारसी आईच मिळाली होती?’

तिचे हे उत्तर एकूण जिन्नाने तिच्याशी बोलणे बंद केले. जिन्ना यांनी रुट्टी पेटीत या पारसी मुलीशी लग्न केले होते.

 

Dina-Wadia-Inmarathi03
reddit.com

त्यानंतर दीना यांनी जिन्ना यांच्या मर्जीशिवाय नेविली या मुलाशी लग्न केलं. भारत-पाक फाळणी नंतर दीना काही वर्ष भारतात मुंबई येथे राहिल्या आणि त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या.

आपल्याच पित्याने बनविलेल्या पाकिस्तानात, आपल्या जीवनाच्या ९८ वर्षांत दीना केवळ दोनदाच गेल्या. पहिल्यांदा त्या १९४८ मध्ये गेल्या जेव्हा त्यांच्या पित्याचा, म्हणजेच जिन्ना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २००४ साली आपल्या पित्याच्या कबरीवर फुलं चढविण्यासाठी त्या परत पाकिस्तानात गेल्या.

 

Dina-Wadia-Inmarathi01
dawn.com

भारत–पाक फाळणी वेळी दीना या दुविधेत पडल्या की त्या कुठल्या देशाला आपला देश मानतील. एकीकडे भारत होता जिथे त्यांनी लग्न केल होतं आणि दुसरीकडे पाकिस्तान जो त्यांच्याच पित्याने उभा केला होता. त्यांना हे दोन्ही देश तेवढेच जवळचे होते त्यामुळे त्यांनी मुंबईच्या कुलाबा येथील त्यांच्या फ्लॅटच्या बालकनीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे झेंडे लावले आणि या दोन्ही देशांप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं.

 

Dina-Wadia-Inmarathi02
samaa.tv

अशा या दीना वाडिया यांचा अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात २ नोव्हेंबर २०१७ ला मृत्यू झाला जेथे त्या वास्तव्यास होत्या. तेव्हा त्या ९८ वर्षांच्या होत्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?