“ग्राहक” म्हणून होणारी फसवणूक टाळण्यासाठी गॅरंटी आणि वॉरंटीमधील नेमका फरक समजून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

कुठलीही वस्तू विकत घ्यायला गेलो की सर्वात आधी आपण त्याची गॅरंटी आणि वॉरंटी किती आहे हे नक्की तपासून बघतो, त्यानंतरच ती वस्तू खरेदी करतो. दुकानात जाणारा आणि वस्तू विकत घेणारा प्रत्येक ग्राहक हे दोन शब्द अनेकदा उच्चारत असतो. आता तर ही संज्ञा माणसांसाठी देखील दिली जाते.

माणसांना देखील एखाद्या वस्तूप्रमाणे समजून त्यांची नाही गॅरंटी, नाही वॉरंटी असे म्हटले जाते.

आपल्या देशात चीनी मालाची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते. कारण चीनी माल हा स्वदेशी मालापेक्षा स्वस्त असतो.

पण चीनी वस्तू घेताना दुकानदार लगेच सांगून मोकळा होतो की ह्यावर काहीही गॅरंटी आणि वॉरंटी नाही, खराब झालं की ती आमची जबाबदारी नाही. खरेदी विक्रीच्या व्यवसायात ह्या गॅरंटी आणि वॉरंटीचा खूप मोठा वाटा असतो.

 

guarantee-warranty-inmarathi
keydifferences.com

आपण लोकल मार्केट मधून जरी सामान घेत असलो तरी तिथे देखील आपण वस्तूची गॅरंटी आणि वॉरंटी विचारत असतो. पण ही गॅरंटी आणि वॉरंटी नेमकी काय असते आणि ह्यांच्यामध्ये काय फरक असतो हे कदाचितच आपल्याला माहित असावं.

आधी वॉरंटी म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊ…

शब्दकोशातील वॉरंटीची व्याख्या ही काही अशी आहे,

“a written guarantee, issued to the purchaser of an article by its manufacturer, promising to repair or replace it if necessary within a specified period of time.”

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ती वस्तू बनविणाऱ्याने ती वस्तू विकत घेणाऱ्या ग्राहकाला वचन देणे की, एका मर्यादित काळापर्यंत ती वस्तू खराब होणार नाही आणि त्याची क्वालिटी कमी होणार नाही.

म्हणजेच ती वस्तू ग्राहकाच्या अपेक्षांवर खरी उतरेल ह्याची शाश्वती देणे.

 

guarantee-warranty-inmarathi03
theydiffer.com

म्हणजे जर तुम्ही एखाद्या दुकानातून मोबाईल विकत घेत आहात तेव्हा जर त्या दुकानदाराने तुम्हाला सांगितले की ह्या मोबाईलवर एका वर्षाची वॉरंटी आहे,

म्हणजे त्या एका वर्षात जर तुमच्या मोबाईलला काहीही झाले तरी त्याला सुधरविण्याची, बदलण्याची तसेच तुमचे पैसे परत करण्याची जबाबदारी ही त्या कंपनीची आहे.

आता जाणून घेऊ गॅरंटी म्हणजे काय ?

गॅरंटी हे देखील कंपनीने ग्राहकाला दिलेलं एक वचनच असतं. त्या वस्तूच्या क्वालिटी संबंधीचे वचन. पण वॉरंटीच्या तुलनेत गॅरंटीचे जास्त महत्व असते.

 

guarantee-warranty-inmarathi01
quora.com

जर एखाद्या कंपनीने तुम्हाला एखादी वस्तू विकली आणि त्यावर त्यांनी तुम्हाला ५ वर्षांची गॅरंटी दिली. म्हणजे पाच वर्षांत त्या वस्तूला काही जरी झाले तरी त्याचा जाब आपण त्या कंपनीला विचारू शकता.

आता गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये काय फरक आहे हे आपण जाणून घेऊ…

ह्या दोन गोष्टींमध्ये फार काही फरक आढळून येत नाही तरी देखील काही थोडेफार फरक ह्यात आहेत.

जेव्हा आपण गॅरंटी बाबत बोलत असतो तेव्हा त्या वस्तूला काही झाले तर त्याचा पूर्ण पैसा वापस येण्याची किंवा रिप्लेसमेंटची शाश्वती असे समजल्या जाते.

तर वॉरंटीमध्ये निव्वळ त्या वस्तूची सुधारणा आणि मेंटेनन्स एवढचं असतं. त्यामुळे गॅरंटीला जास्त महत्व दिले जाते.

 

guarantee-warranty-inmarathi02
hvac.com

वॉरंटी लेटर मध्ये एक निश्चत काळ दिलेला असतो म्हणजे त्या निश्हीत काळापर्यंतच आपण क्लेम करू शकतो. तर गॅरंटी देताना कंपन्या अतिशय चातुर्याने त्याचे नियम बांधत असतात. गॅरंटी ही फार कमी कालावधीसाठी दिली जाते.

त्यासोबतच अनेक नियम कायदे अन अटी देखील घातल्या जातात.

गॅरंटीचा वापर हा केवळ त्या वस्तूची विक्री वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे कधीकधी कंपन्या ‘लाईफटाईम गॅरंटी’ अशी संज्ञा देखील वापरतात, मग भलेही त्यावर १० वर्षांचीच गॅरंटी का असेना.

कुठलीही वस्तू घेताना आपण निव्वळ गॅरंटी आणि वॉरंटी हे बघून ती खरेदी करतो मग त्या मागील अटी काय आहेत ह्यात आपण कधीच लक्ष देत नाही.

जर आपण त्या टर्म्स अॅण्ड कंडीशन वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की, ‘लाईफटाईम गॅरंटी’ जरी कंपनी सांगत असली तरी ‘लाईफटाईम गॅरंटी’ नसून ‘लाईफटाईम वॉरंटी’ असते.

गॅरंटी ही कोणत्याही पेमेंटशिवाय झालेला करार आहे, परंतु वॉरंटी ही एक कायदेशीर इन्स्ट्रुमेंट आहे, ज्याला विक्रेता/निर्मात्यावर त्या करारानुसार सर्विस न दिल्याबाबत आरोप करण्यासाठी वैध कायदेशीर कागदपत्र म्हणून वापरले जाऊ शकते.

त्यामुळे कुठलीही वस्तू खरेदी करताना जर त्यावर गॅरंटी आणि वॉरंटी असेल तर त्यासंबंधीचे सर्व नियम-कायदे आणि अटी व्यवस्थितपणे पडताळून घ्या, जेणेकरून तुमची फसवणूक होण्यापासून तुम्ही बचावाल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?