CV आणि Resume एकच नसतो! जाणून घ्या दोघांमधील फरक!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण कोणत्याही नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी खूप तयारी करतो. नवीन नोकरीला लागलेल्या लोकांकडून काही ना काही सल्ले घेतो की, मुलाखतीला कोणते कपडे घालावेत? मुलाखतीला गेल्यावर कसे वागावे? इत्यादी इत्यादी! तर या मुलाखतीला जाताना आपण आपल्या शैक्षणिक आणि कामकाजविषयक कारकीर्दीचा आढावा म्हणून १ ते २ पानाची माहिती बरोबर घेऊन जातो, ज्याला काही लोक सीव्ही म्हणतात तर काही रेझ्युमे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काय म्हणता असं कसं? चला तर जाणून घेऊया CV आणि Resume मधील फरक!

interview-marthipizza
avservices.co.in

ब्रिटीश नागरिक नेहमी सीव्ही बरोबरच नोकरीसाठी अप्लाय करतात, तर अमेरिकेतील नागरिक रिज्यूमेने अप्लाय करतात.ऑस्ट्रेलिया मध्ये दोन्ही वापरले जातात.

सीव्ही :

सीवी (Curriculum Vitae याचा अर्थ जीवनात पुढे जाण्यासाठीचा लेखाजोखा) एक तपशीलवार कागद असतो ज्यामध्ये दोन किंवा तीन पानांमध्ये माहिती दिली जाते. यामध्ये आपल्या करियर मध्ये आतापर्यंत झालेली प्रत्येक गोष्ट जिला तुम्ही सांगण्या लायक समजता, यात सांगितली जाते. सीव्ही मध्ये शिक्षण आणि इतर वैशिष्ट्ये, तसेच तुम्हाला मिळालेले अवार्ड, हॉनर्स, प्राइजेस यांचा समावेश केला जातो.

cv-marathipizza
curriculumvitae-resume-formats.com

सीव्ही तयार करताना क्रम लक्षात ठेवणे गरजेचे असते. ज्या क्रमाने तुमच्या कारकिर्दीत घटना घडल्या आहेत त्याच क्रमाने त्या मांडणे गरजेचे असते. सीव्ही प्रत्येकवेळी एकसारखाच असतो. तुम्ही कोणत्याही पोझिशनसाठी अप्लाय करा, यामध्ये काहीच बदल होणार नाही. जर तुम्ही काही बदल करू इच्छित असाल किंवा त्यात तुम्हाला विशेष काही सांगायचे असेल तर एका कवर लेटर मध्ये तुम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकता.

 

रेझ्युमे :

रेझ्युमे (Resume) मध्ये आपली निवडक माहिती दिली जाते. रेझ्युमे एका पानापेक्षा जास्त मोठा नसावा. असे म्हणतात की, मुलाखतकार रेझ्युमे वाचण्यावर जास्त वेळ खर्च करत नाहीत. रेझ्युमे मध्ये कमी परंतु गरजेची असलेली माहिती भरली जाते. स्वत:ला खास ठरवण्यासाठी रेझ्युमे वापर केला जातो.

एकीकडे सीव्ही कोणत्याही पोझिशनसाठी वापरला जातो, तर दुसरीकडे रेझ्युमेमध्ये मात्र पोझिशननुसार बदल करावा लागतो. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात त्याच्याशी निगडीत माहिती त्यात भरणे गरजेचे आहे. रेझ्युमे मध्ये तुमच्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना क्रमाने मांडणे आवश्यक नसते. पण रेझ्युमेमध्ये तुमच्या करियर मधील प्रत्येक गोष्ट लिहिणे गरजेचे नाही.

 

resume-marathipizza
template.net

रेझ्युमे आणि सीव्ही यामधील फरक

रेझ्युमे आणि सीव्ही यामध्ये लांबी, लेआउट आणि ऑब्जेक्टीव्ह यांचा फरक असतो. रिज्यूमे मध्ये तुमची क्षमता, अनुभव याचे कमी वर्णन होते, तर सीव्ही मध्ये ही माहिती विस्ताराने दिली जाते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

3 thoughts on “CV आणि Resume एकच नसतो! जाणून घ्या दोघांमधील फरक!

 • February 8, 2019 at 8:45 am
  Permalink

  Khupach chhan mahiti Hoti,
  Aavdali….

  Reply
 • May 2, 2019 at 3:51 pm
  Permalink

  Very important message

  Reply
 • October 8, 2019 at 5:06 pm
  Permalink

  Thanks for the information. Thank you so much . It was really helpful for me ✌

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?