बॅरीस्टर आणि लॉयर यांमध्ये नेमका फरक काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हा प्रश्न कधीना कधी तरी तुमच्या मनात नक्कीच आला असेल. आपण येथे बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण घेऊ. डॉ. आंबेडकरांनी बॅरीस्टर पदवी घेतली होती हे तर सर्वमान्य आहे, पण ते लॉयर अर्थात वकीलही होते असेही आपल्या वाचनात येते. म्हणजेच आंबेडकरांनी बॅरीस्टर आणि लॉयर या दोन्ही पदव्या मिळवल्या होत्या, मग अश्यावेळेस आपल्या मनात प्रश्न येतो की बॅरीस्टर आणि लॉयर यांच्यामध्ये नेमका फरक काय? आपल्यापैकी बहुतेक जण हेच समजतात की बॅरीस्टर म्हणजेच लॉयर आणि लॉयर म्हणजेच बॅरीस्टर!

चला तर दूर करून घ्या हा गैरसमज!

 

dr.ambedkar-marathipizza01
richardsowersby.com

लॉयर हा तो व्यक्ती असतो जो लॉ (कायदा) प्रॅक्टीस करतो. हा व्यक्ती लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. लॉयर ही पदवी त्या सर्व व्यक्तींसाठी असते ज्यांनी कायद्याचा अभ्यास केला आहे. लॉयर हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. ते कोणत्या तरी एका विषयामध्ये तज्ज्ञ असू शकतात. उदा. अॅडमिनीस्ट्रेटिव्ह लॉयर, कमर्शियल लॉयर, कन्सट्रक्शन लॉयर, कॉन्ट्रॅक्ट लॉयर आणि प्रोपर्टी लॉयर इत्यादी.

बॅरीस्टर हा तो व्यक्ती असतो लीगल प्रॅक्टीशिनीयर (कायदेशीर अभ्यासक) असतो, ज्याचं काम आहे न्यायालायामध्ये आपल्या अशीलाची वकिली करणे.

समजा तुमचा एखादा लघुउद्योग असेल आणि तुम्हाला काही कायदेशीर बाबी पूर्ण करून हव्या असतील, तर तुम्ही बिझनेस लॉयरची मदत घेऊ शकता. तो तुम्हाला कॉन्टॅक्ट ड्राफ्टींग, तुमच्या मालमत्तेचे संरक्षण, एखाद्या विरुद्ध मानहानीचा दावा करणे, तसेच व्यवसाय विषयक इतर अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यास बांधील असतो. म्हणजेच लॉयर हा तुम्हाला कोर्टाबाहेरील सर्व कामांमध्ये सहाय्य करतो.

 

lawyer-marathipizza01
newstrend.news

तुमच्या याचं व्यवसायाचं एखादं प्रकरण समजा जर कोर्टात गेलं किंवा त्याची केस उभी राहिली, तर ती लढवण्यासाठी विशेष वकील नियुक्त करावा लागतो त्याला बॅरीस्टर म्हणतात. न्यायालयातील तुमच्या केस ची सर्व जबाबदारी बॅरीस्टर उचलतात, केस कशी पुढे न्यायाची, दावे-प्रतिदावे कसे सादर करायचे, तुम्हाला न्याय कसा मिळवून द्यायाचा यासाठी बॅरीस्टर बांधील असतात. म्हणजेच कोर्टातील सर्व कामे ही बॅरीस्टरच्या अखत्यारीत येतात.

याचाच अर्थ काय, तर प्रत्येक बॅरीस्टर हा लॉयर असतो. पण प्रत्येक लॉयर हा बॅरीस्टर असेलंच असे नाही.

 

lawyer-marathipizza02
newseastwest.com

पण विद्यमान भारतीय न्यायप्रक्रियेत बॅरीस्टर आणि वकील अश्या स्वतंत्र संज्ञा आढळून येत नाहीत. भारतामध्ये Advocates Act, 1961 नुसार जो कोणी सन्मानीय न्यायालयामध्ये प्रॅक्टीस करण्यासाठी पात्र आहे त्याला अॅडव्होकेट असे म्हणतात आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) डिग्री आहे त्याला लॉयर म्हणतात. Advocates Act, 1961 मध्ये अॅडव्होकेट या संज्ञेशिवाय न्यायालयात वकिली करणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळा शब्द वापरला गेला नाही आहे.

आशा आहे आता तुमची मनातील सर्व संभ्रम दूर झाला असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?