लव्ह मॅरेज V/S अरेंज मॅरेज… काय आहे बेस्ट?!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न” परंपरेच फार मोठ महत्व आहे. आता तुम्ही म्हणालं लग्न ही परंपरा नाही, अहो पण जी गोष्ट व्यक्तीची इच्छा असो किंवा नसो, तो त्यासाठी तयार असो किंवा नसो एक वय झालं की त्याने बाकी आयुष्यात काही नाही केलं तरी चालेल पण लग्न तर करायलाच हवं असं मानल्या जात, मग त्याला परंपरा नाही म्हणायचं तर काय… लग्न म्हणजे दोन व्यक्तींची आयुष्यभरासाठी बांधून दिलेली गाठ… लग्न ही संकल्पना ज्याने कोणी काढली असणार त्याने खरंच एक खूप सुंदर विचार जगाला दिलाय, किती छान ना पृथ्वीतलावरील माणसांचा वारसा समोर जावा. एकटं-एकटं आयुष्य न काढता स्त्री आणि पुरुष यांनी सोबत येऊन आपलं आयुष्य सुखात घालवावं, दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचारही एकत्र येतात, जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी तुमचा सोबती तुमच्या सोबत असतो, खरचं लग्न ही संकल्पनाच मुळात अतिशय सुंदर आहे. पण आपल्या देशात ही केवळ एक संकल्पना नाही तर ती प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा भाग आहे. टेक्निकली लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत असत बरोबर, पण आपल्याकडे ते दोन कुटुंबांत होत असत, हेही बरोबरचं आहे. कारण त्या दोन व्यक्तींबरोबर त्यांचे कुटुंबीयही यात सामील होतात, आता हे कुटुंबीय म्हणजे कोण तर आई-बाबा आणि भाऊ-बहीण सोडून बाकी सर्व. असो… तर आपला आजचा विषय आहे “लग्न”… आता आपल्याकडे ती दोन प्रकारची असतात पहिलं म्हणजे अरेंज मॅरेज आणि दुसरं लव्ह मॅरेज…

marriage01-marathipizza
bollywoodshaadis.com

अरेंज मॅरेज म्हणजे दुसरे जे सांगतील तेच करायचं… पहिल्यांदा मुलगा मुलीला बघायला येतो आणि त्या १-२ तासात कुटुंबीय हे ठरवतात की ही दोघे एकमेकांसोबत आयुष्य घालवतील… बरोबर ना त्यांना एक्सपीरियन्स असतो तसा… मुलीच्या दिसण्यावरून, तिच्या बोलण्यावरून कळतं ना मुलगी किती संस्कारी आहे ते. “अग थोडं चालून दाखव बरं”.. “तुला गाणं गाता येत का ?”, “तुला स्वयंपाक येतो का ?”, “तू शिवणक्लास शिकलीयेस का ?”… बस असे एक दोन प्रश्न विचारले आणि त्याचे मनासारखे उत्तर मिळाले की, मुलगी आम्हाला पसंत आहे आणि मुलाचं काय तर चांगली नोकरी आहे चांगला पगार आहे मग बस झालं, अजून काय हवयं… पण आजच्या जनरेशनच्या डोक्यात ही कॉन्सेप्टच जात नाही… कस बरं शक्य आहे. ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, त्याच फक्त नाव आपल्याला कळलेलं असत आणि त्याच्यासोबतच्या पाहिल्याचं भेटीत हे ठरवायचं की आपण याच्यासोबत लाईफ-टाईम राहायचं. तरी आजकालचे कुटुंबीय बरे आहेत ऍटलीस्ट लग्न होई पर्यंत म्हणजे ४-६ महिने देतात वर आणि वधूला एकमेकांना ओळखायला नाही का…

marriage02-marathipizza
Boldsky.com

आता लव्ह मॅरेज, यात अगदी उलट असत ना, अरेंजमध्ये घरचे मुला-मुलीला भेटवतात, पण इथे मुलं आपल्या कुटुंबियांना भेटवतात. त्यांचं आधीच ठरलेलं असत की, त्यांना लाईफ कोणासोबत घालवायची आहे, काहीएक वर्ष सोबत राहून एकमेकांना समजून ते या निर्णयावर पोहोचतात. यात तुम्हाला ती चालून दाखविण्याची, गाणं म्हणण्याची अशी कुठलीही अग्निपरीक्षा द्यावी लागत नाही. कारण ज्याला तुमच्याशी लग्न करायचयं त्याला या गोष्टींपासून फरकचं पडत नाही, इथे सर्व क्लीअर असत. अरेंज मॅरेजमध्ये मुला-मुलीची नाही तर त्यांच्या घरच्यांचं अप्रूव्हल हवं असत आणि लव्ह मॅरेजमध्ये अप्रूव्हलची गरजच नसते.

अरेंज मॅरेजमध्ये सर्वात महत्वाचा रोल असतो मुलाच्या आईचा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट त्यांना विचारूनच करायची आहे, तर इकडे असतं स्वातंत्र्य एक असं स्वातंत्र्य जे तुम्हाला कुठल्याही बंधनात अडकवत नाही.

marriage04-marathipizza
ndtv.com


त्यानंतर उजाडतो तो लग्नाचा दिवस, अरेंज केलेल्या लग्नात मांडवात प्रत्येक व्यक्ती खूप उत्साही आणि आनंदी असतो, पण ज्यांच्यासाठी तो सोहळा आयोजित केलेला असतो म्हणजेच वर-वधू तेच सर्वात ऑक्वर्ड असतात, कारण त्यांना माहीतच नसत की इथनं समोर त्यांच्यासोबत काय होणार आहे. तर दुसरीकडे लव्ह मॅरेजमध्ये बाकीचे असो की नसो पण वर-वधू जाम खुश असतात कारण त्यांनी स्वतःसाठी निवडलेला व्यक्ती त्यांचा लाईफ पार्टनर होणार असतो.

marriage03-marathipizza
youthensnews.com

अरेंज मॅरेजची नेक्स्ट स्टेप असते “आता पाळणा कधी हलणार हा…” अरे त्यांचं आता लग्न झालयं त्यांना अजून एकमेकांची सवय देखील झालेली नाही आणि लगेचच पाळणा हलवणार, म्हणजे बस एवढचं आयुष्य आहे त्यांचं, की आधी लग्न करा मग पोरं करा आणि मग आपलं संपूर्ण आयुष्य त्या पोरांचं संगोपन करण्यात घालवा. पण त्यातले ते दोघे कुठे असतात. म्हणजे आपली स्वप्न विसरून त्यांनी फक्त दुसऱ्यांची एक्सपेक्टशन्स पूर्ण करत राहायची. दुसरीकडे लव्ह मॅरेज, इथे तुमचा पार्टनर तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कधी फोर्स करत नाही, तुम्हाला तुमची स्पेस मिळते, तुमची स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य मिळतं.

अरेंज मॅरेजमध्ये नवरा/बायको इथपासून तर प्रत्येक गोष्टीत ऍडजस्ट  करावं लागत, पण लव्ह मॅरेजमध्ये तुम्हाला ऍडजस्ट करायची गरजच नसते. कारण तिथे तुम्ही स्वतःहून जात असता, ती लाईफ तुम्ही स्वतः निवडलेली असते.

marriage05-marathipizza
india-forums.com

अरेंज मॅरेजमध्ये गाडी, बांगला, सोन्याची चेन वगैरे गिफ्टच्या नावावर देणं चालतं, त्याला हुंडा नाही मानलं जात. तसेच आई-बापाने आपली आयुष्य भराची कमाई त्या लग्नाला लावायची, जेणेकरून कुणी त्यात त्रुटी काढायला नको, जे कितीही म्हटलं तरी लोक काढतातचं. कर्जबाजारी झालो तरी चालेल पण लग्न थाटात करायचं, का तर तो आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. जर लग्नात काही कमी राहिली तर लोक काय बोलतील, याचा विचार जास्त केला जातो. पण का…? का लग्नासारख्या आनंदी क्षणाला प्रतिष्ठेचा गालबोट लावला जातो. लोकांपेक्षा ज्यांना आयुष्य सोबत घालवायचंय त्या मुला-मुलीचा विचार का केला जात नाही. का अरेंज मॅरेजला एवढं महत्व दिलं जात आणि लव्ह मॅरेजला तुच्छ समजलं जात..? त्यातही डिफरन्शिएट केल्या जात की मुलाने लव्ह मॅरेज केलं तर ठीक आहे पण तेच मुलीने केलं तर मात्र चालणार नाही.

असो… सांगायचा मुद्दा एवढाच की अरेंज असो वा लव्ह लग्न करत असताना किंवा करवून देत असताना ज्यांना आयुष्य सोबत घालवायचं आहे त्यांचा विचार नक्की करा कारण संसार त्यांना थाटायचा आहे…


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?