सेलिब्रिटींचे पॉर्न व्हिडीओज : जगभरातील सेलेब्रिटींमध्ये खळबळ, प्रतिष्ठा धोक्यात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===


गेल्यावर्षी जाहीर झालेल्या एका यादीमध्ये असे दिसून आले की, आपल्या भारताचा पॉर्न पाहण्यामध्ये जगात तिसरा क्रमांक लागतो. आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर पॉर्न पाहिले जाते, असे म्हणायला हरकत नाही. भारतामध्ये पॉर्न बेकायदेशीर आहे. पण अमेरिकेमध्ये पॉर्नला कायद्याने मान्यता दिली आहे आणि याची एक वेगळी इंडस्ट्री आहे.

आपल्याकडे जशा बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन वेगवगेळ्या फिल्म इंडस्ट्री आहेत. तशीच अमेरिकेमध्ये पॉर्न इंडस्ट्री ही आहे. या इंडस्ट्रीचे वेगळे अवार्ड शो देखील होतात.

 

Deepfake Porn.Inmarathi
catchnews.com

रेडीटचा वापर जर तुम्ही केला असे, तर तुम्हाला हे माहीतच असेल की, कंटेंट शेयर करण्याचे हे एक सर्वात मोठे माध्यम आहे. गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला रेडीट युजर डीपफेक्सने /r/deepfakes बनवले ज्याच्या मदतीने लैंगिक सामग्रीला शेयर केले केले जाऊ शकते.

काय आहे deepfakes ?

deepfakes ही काही सामान्य लैंगिक सामग्री नाही. deepfakes अश्या व्हिडीओज आहेत, ज्यामध्ये फेस स्वापिंग म्हणजेच चेहरा बदलण्याचे तंत्रज्ञानाने पॉर्न व्हिडीओजमध्ये दिसणाऱ्या पॉर्नस्टार्सचे चेहरे बदलले जात असत.

या पॉर्न स्टार्सच्या चेहऱ्यावर केरस आणि टेनसोरफ्लो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कोणत्याही प्रसिद्ध सेलिब्रिटी किंवा नेत्याचा चेहरा लावण्यात येतो. असे व्हिडीओ या रेडीट युजर डीपफेक्सने बनवले होते, त्यामुळे त्याच्याच नावावर व्हिडीओचे नाव देखील पडले.

 

संबंधित इमेज

 

या युजरचे काही महिन्यांमध्येच ५० हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आणि येथे सर्रास पॉर्न आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट असलेल्या व्हिडीओज शेयर करण्यात येऊ लागल्या.


अमेरिकेचा अभिनेता निकोलस केजचे कितीतरी व्हिडीओ बनवण्यात आले. यातील बहुतेक व्हिडीओज फेक ऍप नावाच्या डेक्सटॉप ऍप्सने बनवले गेले होते.

पॉर्न बघायचे की नाही हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कोणाच्या परवानगी शिवाय फक्त लाईक्स, डाऊनलोड्स आणि सबस्क्रायबर्ससंख्या वाढवण्यासाठी कोणत्याही लोकप्रिय मनुष्याच्या चेहऱ्याचा वापर पॉर्नस्टारसारखा करणे अत्यंत चुकीचे आहे.

येथे त्याच्या संमतीशिवाय काहीही करणे चुकीचे आहे. प्रत्येक सेलिब्रिटी आपल्या स्वतःच्या मर्जीने पाहिजे ते करू शकतो, पण येथे त्याच्या नकळत त्याला काहीही न विचारता त्याच्या चेहऱ्याचा वापर केला जातो, तोही अशा कामासाठी जे त्याला कदाचित कधीही पटणार नाही.

 

Deepfake Porn.Inmarathi1
images.vice.com

रिव्हेंज पॉर्न बनवणे देखील या तंत्रज्ञानाने खूपच सोपे होऊन जाईल. ऑनलाईन सिक्युरिटीवर तर पाहिल्यापासूनच प्रश्न उभे आहेत आणि यामुळे आता ऑनलाईन सिक्युरिटीचा एक नवीन वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे.

जेव्हा शेकडो रेडिट युजर्स सेलेब्रिटी आणि राजनेत्यांच्या फेक पॉर्न पोस्ट करायला लागले, तेव्हा रेडिटने देखील या प्रकरणाला गंभीरपणे घेतले आणि फेक पोस्टला वेबसाईटवरून हटवायला सुरुवात केली. दुसऱ्या वेबसाईटस जशा Gfycat  आणि डिस्कोर्डने देखील फेक पोस्ट्स आणि व्हिडीओज डिलीट करायला सुरुवात केली.


पॉर्नहबने देखील उचलेली याविरुद्ध काही पाऊले 

रेडिटनेच नाही तर पॉर्न व्हिडीओजसाठी लोकप्रिय असलेली वेबसाईट पॉर्नहबने देखील खरे आणि फेक पॉर्न यामध्ये फरक करण्यास सुरुवात केली आणि आपल्या वेबसाईट्सवरील सर्व नकली पॉर्न व्हिडीओना वेबसाईट्सवरून हटवायला सुरुवात केली. पॉर्नहबने या प्रकरणाविषयी एक विधान जाहीर केले आहे.

 

Deepfake Porn.Inmarathi2
independent.co.uk

पॉर्न हबने जाहीर केलेल्या विधानामध्ये ते म्हणतात की,

“आम्ही कोणत्याहीप्रकारे आमच्या साईटवर फेक पॉर्न खपवून घेऊ शकत नाही. जेव्हा आम्हाला अशी फेक पॉर्नची माहिती मिळते, त्याचबरोबर आम्ही त्याला आमच्या साईटवरून काढून टाकतो.”

पण पॉर्नहबच्या या दाव्यानंतर देखील तुम्हाला deepfakes शोधल्यावर कितीतरी फिल्म स्टार्सच्या पॉर्न व्हिडीओ तुम्हाला मिळून जातील. द रजिस्टरनुसार, पॉर्नहब आणि रेडिटद्वारे बॅन करण्यात आल्यावर देखील deepfakes ला इंटरनेटवर शोधणे खूप सोपे आहे.

कितीतरी अशा वेबसाईट्स आहेत, जिथे सेलिब्रिटींचे फेक पॉर्न उघडपणे शेयर केले जातात.

 

Deepfake Porn.Inmarathi3
nexojornal.com

ही गोष्ट आपल्याला जेवढी सोपी वाटतेय, तेवढी ती नक्कीच नाही. हा एक गंभीर विषय आहे, ज्यामुळे या नेत्यांकडे आणि फिल्म स्टार्सकडे काही वेगळ्या नजरेने पहिले जाते. ह्या सर्व गोष्टींमुळे कधी – कधी त्यांना उगाचच मनस्ताप सहन करावा लागतो. लोक यांचे पॉर्न सर्च करून मजा घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्या त्यांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनावर वाईट परिणाम होऊ होऊ शकतो.
===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?