“रामाने दिलीये सुग्रीवाला श्रद्धांजली..!” श्याम सुंदर कलानी काळाच्या पडद्याआड!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

सध्या जिथे तिथे फक्त कोरोना विषयीच ऐकायला बघायला मिळत आहे,न्यूज चॅनल पासून ते अगदी आपल्या आवडत्या कलाकारांपर्यंत सगळे यावरच बोलताना दिसत आहेत!

यातून लोकांना माहिती मिळत आहेच पण तरीही लोकांना त्या उदासीन बातम्या ऐकून नैराश्य सुद्धा यायला लागलं आहे!

संपूर्ण देश लॉकडाऊन च्या अवस्थेत आहे, रेल्वे बस सेवा, खासगी वाहतूक सेवा सगळं ठप्प आहे, त्यामुळे लोकांनी कित्येक महिन्यांपासून आखलेले बेत फसले आहेत!

लोकांना बाहेर फिरायला जायला बंदी आहे, काही ठिकाणी कर्फ्यू सुद्धा जाहीर झाला आहे, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स सगळच्या सगळं अगदी ठप्प आहे!

 

total lockdown inmarathi
the financial express

 

आता घरात बसून करायचं काय यासाठी लोकं नवीन नवी उपाय काढत आहेत, कुणी सोशल मीडियावर टाइमपास करतंय तर कुणी ऑनलाइन सिरिज बघण्यात मग्न आहे!

पण या लॉकडाऊनच्या काळात मात्र दूरदर्शन चॅनल च्या व्यवस्थापकांनी रामायण आणि महाभारत या सिरियल पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेऊन लोकांना घरी बसायच एक निमित्त दिल आहे!

दूरदर्शन ने रामानंद सागर यांच रामायण आणि बी आर चोप्रा यांच महाभारत पुन्हा दाखवायचा निर्णय घेतला, याशिवाय चाणक्य, सर्कस, शक्तिमान अशाही टीव्ही सिरीयल्स चा यामध्ये समावेश केला गेला आहे!

पण रामायण ही आपल्या देशात बनलेली पहिली मोठी सिरियल, त्या काळात या सिरियलने लोकांना वेड लावले होते!

 

ramayan serial inmarathi
desidime

 

त्या काळात एकाच चॅनल असल्याने अजच्यासारखा २४ तास टीव्ही चालू नसायचा, त्यामुळे जेंव्हा ही सिरियल चालू व्हायची तेंव्हा घरातले सगळेच टीव्हीसमोर गोळा व्हायचे!

रस्त्यांवर शुकशुकाट असायचा, त्यावेळेस टीव्ही ही चैनीची गोष्ट असल्याने एकाच घरात टीव्ही यायचा मग शेजारी पाजारी मिळून या सिरियल्स चा आनंद घ्यायचे!

लोकं तर या सिरियल मधल्या काम करणाऱ्या अभिनेत्यांना खरच देव मानून टीव्हीची हार घालून पूजा करत किंवा रामाच्या भूमिकेत अरुण गोविल दिसले की नतमस्तक होत, या अशा गोष्टी आपण ऐकल्या असतील!

आणि विशेषकरून या लॉकडाऊनच्या काळात या सिरियल्स चालू झाल्याने लोकांनी जुन्या गोष्टींना पुनः उजाळा दिला आहे! अरुण गोविल यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबासमवेत रामायण बघतानाचा फोटो सोशल मीडिया वर टाकला आहे!

 

arun govil inmarathi
amar ujala

 

पण आज तुम्हाला याबद्दलच एक वाईट गोष्ट सांगायची म्हणजे, 

रामायण सिरियल मध्ये काम सुग्रीव आणि बालि या दोन्ही भूमिका निभावणारे कलाकार श्याम सुंदर कलानी यांचे निधन झाले आहे!

आज रामायण पुन्हा प्रसारित होत असल्याने त्यात काम करणारे सगळेच कलाकार पुन्हा चर्चेत आले आहेत आणि अशातच श्याम सुंदर कलानी यांच्या निधनाची बातमी लोकांच्या मनाला चटका लावणारी आहे!

श्याम सुंदर जी हे एका सिंधी परिवारातले असून ते मूळचे जबलपूर मध्य प्रदेशचे होते! श्याम सुंदर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण रामानंद सागर यांच्या रामायण या सिरियल मधूनच केले होते,

सिरियलच्या अभूतपूर्व यशानंतर आणि इतका सुंदर अभिनय करून सुद्धा त्यांना पुढे कुठलेच काम मिळाले नाही, पण तरी त्यांच्या या भूमिका लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिल्या!

 

shyam sundar kalani inmarathi

 

श्याम सुंदर कलानी हे सुद्धा एक पैलवान होते, आणि सेट वर ते हनुमानाची भूमिका करणाऱ्या दारा सिंग यांना सतात कुस्ती पंजा लावण्यासाठी उद्युक्त करत असत!

कदाचित ते विसरले होते की आपण एका वर्ल्ड चॅम्पियन ला हुलकावणी देत आहोत!

एक दिवशी दारा सिंग यांनी श्याम सुंदर यांचा चॅलेंज घेऊन कुस्ती लढण्याचे ठरवले आणि श्याम सुंदर यांना त्यात सपशेल हरवले!

दारा सिंग यांच्या खेळीमुळे श्याम सुंदर ४ दिवस बेड वर निजूनच होते, त्यानंतर मात्र त्यांनी दारा सिंग यांना चिडवणे थांबवले!

आज इतके वर्षांनी रामायण पुन्हा टीव्हीवर लागले आणि सगळ्या चॅनल्स चा रेकॉर्ड ब्रेक करत सर्वात जास्त टीआरपी मिळवणारी सिरियल म्हणून रामायण आज अग्रेसर आहे!

लोकांनी दूरदर्शनच्या या उत्कृष्ट कृतीला उत्तम प्रतिसाद देत दाखवून दिले की त्यांना आजही या जुन्या सिरियल्स जास्त भावतात!

रामायणात रामाची भूमिका करणारी अरुण गोविल तसेच, लक्ष्मणाची भूमिका करणारे सुनील लहरी यांनी सुद्धा श्याम सुंदर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत ट्विट केले आहे!

 

arun govil tweet inmarathi
twitter

 

आज कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे, जमावबंदी आहे आणि या अशा काळात अशा कलाकाराच्या निधनाच्या बातमीने शोककळाच पसरली आहे!

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सामाजिक अंतर यामुळे त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांचे अंतिम दर्शन घेता येणे मुश्किल आहे!

या लॉकडाऊनच्या काळात लोकांना पुन्हा त्या जुन्या सिरियल्सचा आनंद देणाऱ्या दुरदर्शनचे आभारआणि सुग्रीव या भूमिकेतून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या श्याम सुंदर कलानी यांना सर्व रसिक प्रेक्षकांडून भावपूर्ण आदरांजली!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?