भारत सरकारचा भीम पराक्रम – एका वर्षात वाचवले तब्ब्ल २७००० करोड रूपये!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आधार कार्डने प्रत्येक भारतीय व्यक्तीला ‘आधार’ दिला असे म्हटले तर वावगे ठरू नये. जेव्हा २००९ साली सरकारने आधार कार्ड योजना राबविण्यास सुरुवात केली, तेव्हा ती कितपत यशस्वी होईल ही शंका होती. कारण भारतासारख्या भल्यामोठ्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला ‘आधार’शी जोडणे काही साधेसुधे काम नाही. पण ते करणे भाग होते, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा थेट सरकारशी जोडली जाणार होता. काळानुसार सरकार बदललं, कॉंग्रेस सरकारने शक्य तितक्या प्रयत्नाने लोकांना ‘आधार’ देण्याचा प्रयत्न केला, पण भारतातील काही जनता मात्र अजूनही ‘आधार’पासून वंचित राहिली आणि उर्वरित काम पूर्ण केलं नवनिर्वाचित भाजपा सरकारने!

InMarathi Android App

आता प्रत्येक व्यक्ती हा ‘आधार’शी जोडला गेला आहे असं जर विधान केलं तर ती अतिशयोक्ती होऊन नये इतक्या दूरवर ‘आधार’ची पाळंमुळं रुजलेली आहेत. आणि या कामगिरीचं संपूर्ण श्रेय दोन्ही सरकारला समान रीतीने जातं.

aadhar-marathipizza
http://www.financialexpress.com

आधार सारखीच किंबहुना आधारच्या जोरावर पुढचं पाऊल असलेली एक महत्त्वकांक्षी योजना म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर – अर्थात – DBT. ही योजना कॉंग्रेस सरकारने त्यांच्या काळात राबवण्यास सुरू केली. या योजनेचा आणि आधारचा फार जवळचा सबंध आहे, कारण ज्यांच्याजवळ आधार कार्ड आहे त्यांचे बँक खाते वैयक्तिक आधार क्रमांकाशी जोडून DBT अंतर्गत लाभधारकाच्या खात्यात थेट पैसे पाठवण्याची ही संकल्पना आहे. त्यामुळे मधली भ्रष्ट्राचारी यंत्रणा पूर्णपणे संपुष्टात येणार होती. प्रत्येक व्यक्तीला सरकारकडून मिळणारी सबसिडी, परतावा इत्यादी थेट त्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. ही योजना राबविल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत सरकार बदललं आणि कॉंग्रेसची महत्त्वकांक्षी योजना नवीन भाजपा सरकारच्या हातात आली. भाजप सरकारने आधार सारखाच ह्या DBT ला जोर लावला. त्यांनी देखील DBT ला योग्य ते महत्व देत शहरापासून खेड्यापाड्यातील नागरिकांना पहिले आधारशी आणि त्यानंतर DBT योजनेशी जोडले.

DBT-marathipizza
http://www.aadhaarnews.com

म्हणतात ना, काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो, त्या पसरत जातात आणि हळूहळू त्यांचे परिणाम उलगडतात. असेच काहीसे आधार आणि DBT योजनेसोबत झाले आहे. आज या योजनांचा अभूतपूर्व असा परिणाम दिसून येत आहे.

द हिंदू बिझनेस लाईनच्या वृत्तानुसार,

सरकारने गेल्या एका वर्षात विविध योजनांतील लाभार्थ्यांचे लाभ, त्यांची सबसिडी DBT योजने अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करून तब्बल २७००० करोड रुपयांची बचत केली आहे.

सरकारच्या या कौतुकास्पद यशामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे आधार कार्ड आणि DBT योजनेने! एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भात पुढे आली आहे की खोट्या लाभार्थ्यांचा देखील यामुळे सुपडा साफ झाला आहे. म्हणजेच खोट्या व्यक्तींच्या नावावर पैसे लाटणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांची दुकाने बंद झाली आहेत.

aahdhar-DBT-marathipizza
http://www.bbc.com

१.६ करोड बोगस रेशन कार्ड्स रद्द केल्यामुळे १०,००० करोड रूपयांची आणि पहल योजनेमध्ये नोंदणीकृत असणारे ३५ करोड बनावट लाभार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे १४,००० करोड रुपयांची बचत झाली आहे.

भारताच्या वाड्या वस्त्यांमध्ये पसरलेल्या मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांना देखील थेट बँक खात्यामध्ये त्यांचा मोबादला मिळत असल्याने सरकारी निधी खिशात घालणाऱ्या ठेकेदारांना देखील चाप बसला आहे. ज्यातून जवळपास ३००० करोड रुपयांची बचत झाली आहे.

अश्या या दोन योजना हळूहळू संपूर्ण भारतामध्ये आपले पाय रोवत आहेत. आजही काही नागरिक या योजनांपासून वंचित असले तरी लवकरच त्यांना या योजनांअंतर्गत सामावून घेण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या काळात २७००० करोडचा हा आकडा दुप्पट तिप्पटीने वाढेल अशी आशा करायला हरकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *