ह्या रोजच्या वापरातील वस्तूंना औषधांसारखीच एक्सपायरी असते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


 

आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी वापरतो. लहानसहान गोष्टींपासून अगदी मोठमोठ्या गोष्टींपर्यंत सर्वच गोष्टींची आपल्याला गरज असते. आपण घरात स्वयंपाकघरात वापरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट पाहतो, कारण आपल्याला आपल्या घरच्यांची आणि स्वतःच्या शरीराची काळजी असते. आउट डेटेड पदार्थ वापरून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आजाराला सामोरे जावू लागू नये, यासाठी आपण हा सर्व खटाटोप करतो. फ्रीजमधील जास्त दिवस झालेले पदार्थ देखील आपण न खाता कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून देतो. या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे एक चांगली सवय आहे.

पण आपल्या घरामध्ये काही असे सामान देखील असते, ज्यांचा वापर आपण रोज करतो आणि वर्षानुवर्ष करत असतो. आपण प्रत्येकवेळी या गोष्टी साफ करतो आणि परत त्याचा वापर करतो. पण यातील काही गोष्टी अशा असतात, ज्यांना काही काळानंतर फेकून देणे गरजेचे आहे. फक्त खाण्याच्या पदार्थांचेच नाहीतर, रोजच्या वापरातील वस्तूंच्या देखील एक्सपायरी डेट असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तूंबद्दल सांगणार आहोत, ज्या कालांतराने फेकून देणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया, या गोष्टी कोणत्या आहेत आणि किती काळाने बदलायच्या त्याबद्दल…

१. टूथब्रश

 

Daily use products.Inmarathi
smilesaintlouis.com

टूथब्रशचे ब्रिसल्स जेव्हा पूर्णपणे घासून जातात तेव्हा आपण त्याला फेकतोच. पण एक टूथब्रश हा फक्त ३ महिनेच वापरायचा असतो. त्यातच, जर तुम्हाला मधेच सर्दी, खोकला किंवा ताप आला असेल, तर ब्रश बदलणे हाच योग्य पर्याय असतो.

२. हेयर ब्रश

 

Daily use products.Inmarathi1
photobucket.com

हेयर ब्रश हे लवकर खराब होतात, यांना आठवड्यातून एकदा तरी धुणे गरजेचे आहे. तसेच, यांचा एक वर्षापेक्षा जास्त वापर देखील करू नये. तो एका वर्षाच्या आत बदलावा.

३. ब्रा

 

lingerie-inmarathi
thirdlove.com

ब्रा लूज झाल्यावर किंवा तिचा आकार बदलल्यावर तिला वापरू नये. त्याजागी नवीन ब्रा आणावी. ब्रा जर चांगली टिकली, तर तुम्ही ती १ ते २ वर्ष वापरू शकता.

४. टॉवेल

 

Daily use products.Inmarathi3
sndimg.com

आपल्याला स्वच्छ करणारा टॉवेल हा खूप किटाणूंनी भरलेला असतो. या टॉवेलला १ ते ३ वर्षापेक्षा जास्त वापरू नये.

५. पॅसिफायर

 

Daily use products.Inmarathi4
mdpcdn.com

लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या तोंडामध्ये पॅसिफायर टाकून ठेवण्यात येते. हे आजकाल सगळीकडेच होताना दिसत आहे. यांना वेळोवेळी कोमट पाण्याने धुतले देखील जाते. पण हे पॅसिफायर तुटल्यास किंवा यामध्ये होल झाल्यास याला लगेचच बदलावे. असे झाले नाही, तरी देखील २ महिन्यापेक्षा जास्त याचा वापर करू नये.

६. स्पंज

 

Daily use products.Inmarathi5
dishwashersguide.com

जास्तकरून भांडी धुण्याचा स्पंज जोपर्यंत पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत वापरला जातो. स्पंज पाणी लवकर शोषून घेत असल्यामुळे त्यामध्ये लगेचच बुरशी पकडते, त्यामुळे २ आठवड्यांवर स्पंज वापरू नये.

७. स्लीपर्स

 

Daily use products.Inmarathi6
thegentlemansjournal.com

स्लीपर्स या खूप लवकर फंगल इन्फेक्शन पसरवतात. या स्लीपर्सना वेळोवेळी धुवत राहणे गरजेचे आहे. तर चप्पल ६ महिन्यांनंतर बदलल्या पाहिजेत.

८. पॉवर सॉकेट

 

Daily use products.Inmarathi7
independent.ie

पॉवर स्ट्रिप्स आणि पॉवर सॉकेटच्या बॉक्सवर कोणत्याही प्रकारची एक्सपायरी डेट लिहिण्यात आलेली नसते. पण काही काळानंतर या गोष्टी बरोबर काम करत नाहीत आणि धोकादायक होतात. त्यामुळे यांना ४ ते ५ वर्षांमध्ये बदलून घेतले पाहिजे.


९. रनिंग शूज

 

Daily use products.Inmarathi8
lepfitness.co.uk

जर तुम्ही नियमितपणे रनिंग आणि जीमिंग करत असाल, तर तुम्हाला तुमचे स्नीकर्स किती चालतील, हे लक्षात असणे गरजेचे आहे. २५० – ३०० मैलानंतर कुशनिंग कमी होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या तळव्यांवर जोर पडतो, म्हणून स्नीकर्स १ वर्षानंतर बदलले पाहिजेत.

१०. उश्या

 

Daily use products.Inmarathi9
sailrite.com

उश्या पण आपण जोपर्यंत पूर्णपणे खराब होत नाहीत, तोपर्यंत वापरतो. खूप वेळ वापरत असल्याने या उशांवर धूळ आणि घन बसते. त्याचबरोबर त्यांचा आकार बदलल्यामुळे मानेला त्रास होतो. त्यामुळे उश्याही २ ते ३ वर्षांमध्ये बदलणे गरजेचे आहे.

अश्या या वस्तू जरी एक्सपायरी डेटसोबत येत नसतील, तरी देखील त्यांचा वापर फक्त काही काळापर्यंतच करणे कधीही चांगले असते.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?