चीनमध्ये “कोरोना” पुन्हा उफाळला? बरे झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

कोरोनाव्हायरस हा चीन मधून आला आणि जगभर पसरला आणि आता अमेरिकेत, युरोपात या व्हायरसचं थैमान सुरू आहे.

कोरोनाव्हायरसची पहिली केस चीनमध्ये सापडली ती डिसेंबर महिन्यात. चीनमधल्या वूहान प्रांतातून त्याची सुरुवात झाली, तिथल्या एका मासळी बाजारातून हा व्हायरस पसरला असं समजलं जातं.

संपूर्ण जानेवारी महिन्यात या कोरोनाचा चीनमध्ये हुबई प्रांतात धुमाकूळ सुरू होता.

चीन सरकारने हुबई आणि वुहान प्रांत, चीनमधल्या इतर भागांपासून अक्षरश: वेगळा केला. तिथली सगळी वाहतूक व्यवस्था थांबवण्यात आली. कुणालाही शहराच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला.

 

corona in china inmarathi

 

 

जे पेशंट मिळत होते त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मृत्त पेशंटच्या प्रेताची नीट विल्हेवाट लावली जात होती. कोरोना पॉझिटिव्ह पेशंटना वेगळं ठेवण्यात येत होतं.

त्यांच्यावर उपचार होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही क्वारंटाईन करण्यात येत होतं.

नंतर हळूहळू फेब्रुवारीच्या मध्यानंतर तिथली परिस्थिती पूर्ववत व्हायला लागली. सापडणारे रुग्ण कमी व्हायला लागले आणि मार्चमध्ये तर तिथे कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण मिळणे बंद झाले.

चीनने वूहान प्रांतात या कोरोनाव्हायरस साठी हॉस्पिटल्स तयार केले होते तेदेखील नंतर बंद करण्यात आले, कारण आता रुग्ण मिळत नव्हते.

तिथल्या सगळ्या सोयीसुविधा पूर्ववत सुरू करण्यात येऊ लागल्या. तिथले काही कारखाने उद्योगधंदे सुरू करण्यात येऊ लागले याच्या बातम्या देखील येत होत्या.

त्यानंतर जगभरात मात्र कोरोनाचा हाहाकार उडालेला आपण पाहतो आहोत. अगदी आता आपल्या देशातसहित जगातल्या सगळ्या देशांमध्ये आता कोरोना पोहोचला आहे.

 

corona breakdown inmarathi
outlook india

 

अमेरिकेत आता त्याचं केंद्र झाल्यागत स्थिती आहे. अमेरिकेतले जवळजवळ दोन लाख लोकांना त्याची लागण झाली आहे आणि मृतांचा आकडा देखील साडेतीन हजाराच्या वर पोहोचला आहे.

त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या कोरोना व्हायरसला “चिनी व्हायरस” असं संबोधतात. चीनने हे मुद्दामच घडवलं असं आता म्हटले जाते.

चीन कोणाशीही समोरासमोर आता युद्ध करणार नाही, कारण आताची परिस्थिती वेगळी असून असे युद्ध करणं शक्य होणार नाही.

म्हणून मग ‘बायोवेपन’ म्हणजेच ‘ जैविक अस्त्र’ याचा वापर चीनने केला असण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आहे.

कारण वूहानमध्ये जी लॅबरोटरी आहे तिथेच हा विषाणू तयार करण्यात आला असावा, अशी देखील शंका लोकांना येते.

 

corona virus 9 inmarathi
business magzine

 

चीनचे सगळे उद्योग आता सुरळीत सुरु झाले अशा बातम्या येत असतानाच आता नवीनच बातमी परत आलेली आहे. जी आपल्या सगळ्यांचा काळजाचा ठोका चुकवणारी आहे.

ती म्हणजे चीनमध्ये वूहान प्रांतात ज्या रुग्णांना आधी कोरोना झालेला होता आणि जे आता कोरोना निगेटिव्ह आहेत, त्यातील काही रुग्णांना परत कोरोना झालेला असून ते आता कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

आणि त्यांच्यामुळे परत काही जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे.

१८ मार्च ते २२ मार्च या कालखंडात चीन मधल्या हुबई प्रांतात एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही, या गोष्टीचे तिथे सेलिब्रेशन हे करण्यात आलं.

मात्र त्यानंतर चार दिवसातच, आधी ज्या रुग्णांना कोरोना होता त्याच्यामध्ये परत कोरोनाची लक्षणे दिसून आली. टेस्ट केल्यावर ती पॉझिटिव्ह आली.

 

corona virus 12 inmarathi
the financial express

 

याचाच अर्थ असा आहे की, कोरोनाचा पेशंट बरा झाला तरी आणि त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू हा असतो आणि तो दुसऱ्याला हा आजार देऊ शकतो.

म्हणून जरी टेस्ट निगेटिव्ह आली तरी आता त्या रुग्णांना परत अलगीकरण कक्षात पंधरा दिवस ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला कोरोना नाही असं समजण्यात येणार आहे.

वूहान प्रांतांमध्ये ८० हजार लोकांना कोरोना ची लागण झाली होती. त्यापैकी ३३०५ लोक मृत्युमुखी पडले तर बाकीचे आजारातून रिकवर झाले.

आता या बऱ्या झालेल्या लोकांपैकी ५% ते १०% लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याचाच अर्थ असा पण आहे की, हे बरे झालेले रुग्ण आहेत ते या कोरोनाव्हायरसचे वाहक आहेत. म्हणजे त्यांना स्वतःला त्याचा त्रास होणार नाही, पण हे लोक इतरांना कोरोना व्हायरस देऊ शकतात.

म्हणजे वूहान मधली परिस्थिती आटोक्यात आली असं जरी आपण समजत असतो तरी ती तशी नाही. तिकडे जर काळजी घेतली नाही तर पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो.

सध्याच्या ज्या चार केसेस येथे मिळेल मिळाल्या आहेत, त्यामध्ये २ दोन डॉक्टर आहेत. ज्यांना कोरोना रुग्णांवरती उपचार करताना कोरोनाची लागण झाली.

 

corona virus inmarathi 2
business insider

 

त्यातून ते बरे झाले त्यांची टेस्ट निगेटिव आली. पण आता ते परत कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत म्हणजे ताप किंवा कोरडा खोकला दिसत नाही तरीही टेस्ट पॉझिटिव आली आहे.

ही टेस्ट देखील त्यांनी आता वैद्यकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी मेडिकल सर्टिफिकेट देण्यासाठी केली आहे. दुसरे दोघेही वूहानचे रहिवासी आहेत.

म्हणजे ही कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची दुसरी फेरी असू शकेल का? तज्ञांच्या मते, इतक्या लवकर त्याविषयी काहीही मत बनवणे योग्य होणार नाही, परंतु काळजी घेणे आवश्यकच आहे.

Covid-19 च्या प्रतिबंधासाठी जी मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यानुसार, चीन मध्ये किती नवीन केसेस येतात त्यात जुने रुग्ण किती आहेत या सगळ्या सगळ्या घटकांचा समावेश केला पाहिजे.

परंतु चीन त्याचं पालन करत नाही.

“चीनमधील ऑथॉरिटी या नवीन केसेस का मोजत नाही, हे मला माहीत नाही पण मला नक्कीच धक्का बसला आहे”. असं दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

corona inmarathi
says.com

 

आता त्या चारही जणांना विलगीकरण हा कक्षात ठेवलं आहे. गेल्या सोमवारपासून चीनमध्ये बऱ्या झालेल्या १५०४ रुग्णांना परत एकदा १४ दिवसांकरिता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

हे रूग्ण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह झाले, की त्यांची पहिल्याच टेस्टचा रिझल्ट चुकीचा आला हे कळत नाहीये.

कारण डॉक्टर ली. वेनलियांग ज्यांनी हा विषाणू शोधला आणि या कोरोना मुळेच त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला त्यांच्या देखील सुरुवातीच्या कोरोनाच्या टेस्ट या निगेटिव येत होत्या.

टेस्टचा रिझल्ट चुकीचा येऊ शकतो, हे covid-19 च्या बाबतीत होऊ शकतं. कारण चीनमध्येच वुहानमध्ये फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या ३० ते ५० टक्के टेस्ट हे चुकीचे रिझल्ट दाखवत होते.

चीन मध्ये सध्या काही पॉझिटिव्ह पेशंट सापडत आहेत परंतु चीन सरकार त्यावर जास्त काही बोलत नाही.

परंतु चीन मधल्या एका वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार तिथे एका दिवसात १२ कोरोना पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आहेत.

खरा धोका पुढे आहे कारण आता वूहान मधून नागरिकांना चीनमध्ये आणि बाहेरच्या देशातही जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. लॉक डाऊन संपत आहे.

 

corona in south korea 2

 

परंतु वूहानच्या बाहेर पडण्याआधी प्रत्येक नागरिकाने कोरोनाची चाचणी निगेटीव्ह दाखवणे गरजेचे आहे. म्हणजे कोरोना निगेटिव माणूसच चीन मधुन बाहेर जाऊ शकतो.

पण प्रश्न हाच आहे की यामध्ये जे वाहक आहेत त्यांना ओळखणे कठीण आहे.

कारण जरी एखाद्याला कोरोनाव्हायरस असेल आणि त्याची लक्षणं नसतील तरी त्याच्यामुळे इतरांना कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता आहेच.

परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ज्या पेशंटमध्ये कोरोनाव्हायरस ची लक्षणे दिसतात, तेच लोक कोरोना व्हायरसचा संसर्ग इतरांना करू शकतात.

ज्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरस ची लक्षणे दिसत नाहीत, परंतु त्यांना कोरोनाव्हायरस असतो, ते हा व्हायरस पसरवण्याचा मुख्य स्त्रोत असू शकत नाहीत.

म्हणजेच जगासमोरचा धोका अजूनही संपलेला नाही. हेच यातून दिसून येतंय.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?