चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या..

===

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय चित्रपट सृष्टीद्वारे जगातील सर्वात जास्त चित्रपट तयार केले जातात.

InMarathi Android App

दरवर्षी शेकडो चित्रपट तयार होतात आणि प्रत्येक चित्रपटाला उत्कृष्ट बनविण्यासाठी फिल्ममेकर्स देखील खूप मेहनत घेत असतात. मग ते डायलॉग्स असो किंवा गाणी सर्वच जबरदस्त असाव असं चित्रपट दिग्दर्शकाला वाटत असतं.

 

Best Bollywood Movies.Inmarathi9
ytimg.com

आपल्या बॉलीवूड चित्रपटांचे चाहते हे केवळ आपल्याच नाही जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात आहेत. तेव्हाचं तर आपले चित्रपट एवढ्या करोडोंची कमाई करण्यात यशस्वी ठरतात.

===
===

पण चित्रपट बनविण्यासाठी दिग्दर्शक आणि इतरांनी कितीही आटापिटा केला तरी तो तसाच रिलीज होणार की नाही हे सेन्सर बोर्डावर अवलंबून असते.

चित्रपट बनविताना काही नियम-कायद्यांचे पालन करणे महत्वाचे असते, त्या कायद्यांची आखणी ही सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन करत असतो. ज्याला आपण सेन्सर बोर्ड म्हणून ओळखतो.

हीच संस्था ठरवते की कुठल्या चित्रपटाला कुठलं सर्टिफिकेट दिलं जावं.

 

padmavati-poster-inmarathi
jammulinks.news

बॉलीवूड चित्रपटांना सर्टिफिकेट जारी करणे हे सेन्सर बोर्डाच काम आहे. पण मागील काही वर्षांपासून सेन्सर बोर्ड चित्रपटांना सेन्सर करण्याचं काम देखील करत आहेत.

ज्यात ते चित्रपटांमधील काही सिन्स कापतात, जे सिन्स त्यांना पब्लीकली दाखविण्यासाठी योग्य वाटत नाहीत त्या सिन्सवर सेन्सर बोर्ड कात्री चालवतो.

सर्वात नवीन उदाहरण म्हणजे पद्मावत (पद्मावती) ह्या चित्रपटातील सिन्सच नाही तर चित्रपटाच्या नावाला देखील कापण्यात आले आहे.

तसेच उडता पंजाब, लिपस्टिक अंडर माय बुरखा सारख्या चित्रपटांवरदेखील सेन्सर बोर्डाने बऱ्यापैकी कात्री चालवली. आणि त्यानंतर उरलेला चित्रपट रिलीज करण्यात आला.

 

censor board-inmarathi03

 

सर्टिफिकेशन आणि सेन्सरशिप ह्यात खूप फरक असतो. सेन्सरशिप म्हणजे एखाद्या चित्रपटांच्या विषयानुरूप त्याच्या वस्तुस्थितीवर लक्ष देऊन तो चित्रपट लोकांना दाखविण्यासारखा आहे की नाही.

पण आता प्रत्येक चित्रपट हा प्रत्येकाला आवडेल किंवा नाही आवडणार हे ठरवणे अशक्य आहे. कारण प्रत्येकाची आपली एक वेगळी आवड असते.

काही मर्यादित आणि ठराविक गोष्टींसाठी ही जबाबदारी सेन्सर बोर्डाकडे असायलाच हवी. पण त्याहून जास्त नाही. कारण त्यामुळे चित्रपट बनविण्याचे कला स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकते, जे की आता होताना दिसून येत आहे.

 

censor board-inmarathi04

 

सर्टिफिकेशन म्हणजे एखाद्या चित्रपटाला त्याच्या विषयानुसार त्याला सर्टिफिकेट जारी करणे. म्हणजे कुठला चित्रपट हा वयस्क लोकांसाठी आहे, कुठला चित्रपट लहान मुलं देखील बघू शकतात वगैरे.

ह्यासाठी चित्रपट सृष्टीतील काही लोकांची निवड केली जाते. जे चित्रपट बघून हे ठरवितात की, त्या चित्रपटाला कुठलं सर्टिफिकेट देण्यात यावं.

गरज पडल्यास चित्रपटातील काही दृश्य काढून टाकण्याचे आदेशही दिले जाऊ शकतात. जेव्हा सेन्सर बोर्ड कुठल्या चित्रपटातील काही सिन्स कापते तेव्हा त्या चित्रपटाच्या सर्टिफिकेटवर एक त्रिकोणी चिन्ह बनलेलं असते.

सेन्सर बोर्ड चित्रपटाला एकूण चार प्रकारचे सर्टिफिकेशन देते :

यू (अप्रतिबंधित सार्वजनिक प्रदर्शन) :

 

censor board-inmarathi02

 

साधारणपणे कौटुंबिक चित्रपटांना यू सर्टिफिकेट देण्यात येते.

ड्रामा, लव्ह स्टोरी, शैक्षणिक, अॅक्शन, सायन्स फिक्शन अश्या चित्रपटांमध्ये अडल्ट कंटेंट नसतो, त्यामुळे त्या चित्रपटांना यू सर्टिफिकेट देण्यात येते.

विषयानुरूप जर चित्रपटात थोड्याफार प्रमाणात हिंसा किंवा सेक्स सिन्स असतील तर तेवढ चलून जातं पण ते अति असायला नको.

 

यू/ए (१२ वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांनी आपल्या आई-वडिलांसोबत बघावा) :

 

censor board-inmarathi

 

ज्या चित्रपटामध्ये थोडाफार अडल्ट किंवा हिंसक कंटेंट असेलं आणि जे लहान मुलांच्या दृष्टीने चांगले नसेल त्या चित्रपटांना यू/ए सर्टिफिकेट देण्यात येते. म्हणजे असे चित्रपट लहान मुले बघू शकतात पण एकटे नाही.

जर चित्रपटातील काही सिन्स हे १२ वर्षाखालील मुलांच्या दृष्टीने योग्य नसतील तर सेन्सर बोर्ड ते सिन्स काढू शकतो.

 

ए (केवळ प्रौढांसाठी) :

 

censor board-inmarathi01

 

ज्या चित्रपटात खूप जास्त प्रमाणात अडल्ट कंटेंट असतो त्या चित्रपटांना ए सर्टिफिकेट देण्यात येते. हे चित्रपट १८ वर्षांवरील लोकच बघू शकतात.

कारण ह्या चित्रपटांत न्युडीटी, डबल मिनिंग शब्द, शिवीगाळ, हिंसा आणि अडल्ट सिन्स असल्याकारणाने हे चित्रपट लहान मुलांसाठी योग्य समजले जात नाहीत. पण अश्याही चित्रपटातील सिन्स सेन्सर बोर्ड कापू शकते.

 

===
===

एस (एका विशिष्ट समूहासाठी) :

 

censor board-inmarathi05
narayanahealth.org

एस सर्टिफिकेट असणारे चित्रपट हे सामान्य लोकांसाठी नसतात. हे चित्रपट एका विशिष्ट समूहासाठी बनवले जातात आणि त्यांनाच दाखवले जातात.

जसे की डॉक्टर, इंजीनियर, साइंटिस्ट सारख्या एका समूहाच्या लोकांना असे चित्रपट बघण्याची मुभा असते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *