स्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरी लोकांविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

साधू संतांविषयी आपल्या मनात नेहमीच आदर असतो.

त्यांचे आदर्श आणि शिकवण लोकांना नेहमी काही न काही चांगल्या आणि हिताच्या गोष्टी शिकवत असतात.

 

ramdas swami

 

संतसाहित्याचा अभ्यास आज अनेकांकडून केला जातो. श्लोक, ओव्या, भक्तीगीतं यांमधून देवाची मनोभावे आराधना केली जाते.

आजही देवळात दिसणा-या साधुंची पुजा केली जाते, दक्षिणा देत, नमस्कार करत त्यांचा आशिर्वादही घेतला जातो.

पण आपल्या समाजामध्ये असेही काही साधू आहेत, जे याच्या विपरीत आहेत.

त्यांच्या राहणीमानामुळे आपल्याला त्यांची भीती वाटते, घृणा येते, ते साधू म्हणजे अघोरी.

अघोरींविषयी नेहमी काही न काही विचित्र किस्से सांगितले जातात. त्यांच्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा सुद्धा केला जातो.

चला जाणून घेऊया या अघोरींविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी!

 

aghori-inmarathi
cdninstagram.com

 

१. अघोरी खरंच मृतदेहांबरोबर संभोग करतात का?

संभोगाविषयीचा अघोरींचा दृष्टीकोन पूर्णपणे भिन्न आहे.

स्मशानामध्ये अघोरी निषिद्ध लैंगिक कृती करताना आढळतात, अगदी मृत शरीरासोबत संभोग करताना सुद्धा दिसतात. त्याला नेक्रोफिलीया असं म्हटलं जातं.

मृत शरीराबरोबर सोबत संभोग करताना हे अघोरी विविध वाद्ये वाजवून मोठमोठ्याने मंत्रोच्चार सुद्धा करतात. असं केल्याने त्यांच्या अलौकिक शक्ती वाढतात, असा त्यांचा दावा आहे.

२. अघोरी मृत शरीरे खातात

अघोरी विचित्र खाण्याच्या सवयींकरता प्रसिद्ध आहेत. या खाण्याच्या सवयींमध्ये स्मशानातील मृतदेह खाणे हे सुद्धा आलेच.

अघोरींचे म्हणणं आहे की, मृतदेह कच्चे किंवा भाजून खाल्याने अलौकिक शक्ती प्राप्त होते.

असं केल्याने भगवान शंकर देव प्रसन्न होतात हा त्यांचा विश्वास असतो.

कोणतीही विधी करण्यासाठी अघोरी हे स्मशानाचीच निवड करतात.

 

aghori-marathipizza02
3.bp.blogspot.com

 

४. मृतांची राख ते शरीरावर फासतात

मृत व्यक्तीच्या शरीरावरील किंवा त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या जवळ ठेवलेल्या कपड्यांनी अघोरी आपले शरीर झाकतात.

अघोरी हे मृत शरीराची राख आपल्या संपूर्ण अंगावर लावतात.

असं केल्यानं सगळ्या रोगांपासून आपला बचाव होतो, तसेच या कृतीमुळे मृतांशी संवाद साधता येतो, त्यांना वश करता येतं असं अघोरींचं म्हणणं आहे.

५. अघोरी चरस ( Marijuana) ओढतात.

अघोरी म्हणतात की, चरस ओढल्याने त्यांना शंकर देवाचा आशीर्वाद लाभतो.

तसंच त्यामुळे त्यांची मंत्रशक्ती वाढते आणि त्यांनी केलेल्या साधनेचे त्यांना उत्तमप्रकारे फळ मिळते.

 

cdninstagram.com

 

चरस मन शांत ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे आणि यामुळे उन्नत आध्यात्मिकतेकडे वाटचाल करणे सोपे जाते असा ते दावा करतात.

६. त्यांच्याकडे प्रत्येक रोगाचे औषध असतं

साधा ताप असो वा एड्ससारखा जीवघेणा रोग असो.

सर्व रोगांवर या अघोरींकडे औषध असते, असे म्हणतात.

स्मशानामधील मृतदेहांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक तेलाचा उपगोय करून कोणताही आजार बरा केला जाऊ शकतो असा देखील अघोरी दावा करतात.

त्या व्यतिरिक्त काळ्या जादूच्या सहाय्यानेही असाध्य रोग तात्काळ बरे करण्याची हातोटी आपल्याकडे असल्याचा प्रचार ते करत असतात.

७. प्रत्येक अघोरी एक कवटी घेऊन भटकत असतो.

अघोरींची अशी श्रद्धा आहे की, कवटी हे त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी साधन आहे.

 

aghori-marathipizza05
photoshelter.com

 

या कवटीचा सर्वात जास्त उपयोग त्यांना मंत्र साधनेमध्ये होतो.

आपण असे खूप अघोरी पाहतो, ज्यांच्याकडे कवटी असते किंवा त्यांनी कवटीची माळा घातलेली असते.

ते त्या कवटीला हातात धरून मंत्रोच्चार करत असतात.

स्मशानामधील जळक्या प्रेतांच्या या कवट्या असतात. ते या कवट्यांचा उपयोग दारू पिण्यासाठी, पूजेसाठी, अन्न खाण्यासाठी आणि भिक्षा मागण्यासाठी करतात.

तर मंडळी असे आहेत हे अघोरी, ज्यांच्याबद्द्दल उपरोक्त गोष्टी सत्य आहेत.

पण त्याबद्दल ते जे काही दावे करतात ते मात्र बिलकुलही न पटणारे आहेत.

सध्या तर स्वत:ला अघोरी म्हणवून लोकांना लुबाडणाऱ्या मांत्रीकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अश्या भूलथापांना बिलकुल बळी पडू नका!

श्रद्धा हा प्रत्येकाचा अधिकार असला, तरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातला फरक वेळीच ओळखं गरजेचं आहे.

अंधश्रद्धेचा पुरस्कार करणारे किंवा अंधश्रद्धेच्या मदतीने इतरांना फसविणा-या लोकांना कायद्याने कडक शिक्षा केली जाते, त्यामुळे अशा लोकांपासून सावध रहा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “स्मशानवासी गूढ आणि रहस्यमयी अघोरी लोकांविषयी काही विचित्र पण सत्य गोष्टी!

 • August 9, 2017 at 11:41 am
  Permalink

  अघोरी प्रथा आहे आणि ते लोक मारिजुआना म्हणजे गांजा व अफू पिता जे की भारतात बंद आहे. सगळे अंधश्रद्धा आहे आणि हे सगळं बंद केले पाहिजे….. कायदा न मानणारे कडक शिक्षा झाली पाहिजे..

  Reply
 • January 23, 2018 at 10:48 pm
  Permalink

  काहीही फालतूपणा… कुठल्या अघोर्याने हे सर्व सांगितले तुम्हाला? निरर्थक पोस्ट

  Reply
  • January 24, 2018 at 9:02 am
   Permalink

   नेहरूंवर लेख लिहायचा असेल तर “नेहरूंनी कधी सांगितलं हे सगळं तुम्हाला?” अश्या प्रश्नांची पण तयारी ठेवावी काय?

   Reply
 • December 9, 2019 at 7:20 pm
  Permalink

  अजुन सुद्धा लोक यावर विश्वास ठेवतात म्हणून याला खतपाणी मिळतेय…

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?