' PoK आणि अक्साई चीनच्या मध्यभागी असलेल्या “सियाचीन” या सर्वात धोकादायक युद्धभूमीबद्दल… – InMarathi

PoK आणि अक्साई चीनच्या मध्यभागी असलेल्या “सियाचीन” या सर्वात धोकादायक युद्धभूमीबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सियाचीन म्हणजे जगातील सर्वात उंचीवर वसलेली युद्धभूमी होय. येथील हवामान, भौगोलिक परीस्थिती आणि मानवी शरीरासाठी प्रतिकूल स्थिती यांमुळे ही युद्धभूमी जगातील सर्वात धोकादायक युद्धभूमी म्हणून देखील ओळखली जाते. येथे तैनात असणाऱ्या सैनिकांना किती कष्टप्रद जीवन जगावे लागते ते आपल्याला इथे बसून कळण्यासारखे नाही.

पुढील नकाशा नीट बघा. आपल्या मनात स्थापित असलेल्या भारताच्या देखण्या नकाशावर PoK आणि अक्साई चीन चा डाग आहे. काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने बळकावला आहे आणि काही चीनने. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये आहे – सियाचीन.

 

siachen-map-marathipizza
daytodaygk.com

View Post

 

भारतासाठी सियाचीनचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. या भागाच्या एका बाजूला पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला चीन स्थित आहे आणि या दोन्ही शेजाऱ्यांचे आपल्या भारताशी असणारे संबंध किती जटील आहेत ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे गेल्या ३० वर्षांपासून भारतीय सैन्य आपल्या या भूमीचे संरक्षण करीत आहे. अश्या या सर्वांसाठीच कुतूहल बनून राहिलेल्या युद्धभूमीबद्दल आज काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया!

समुद्रसपाटीपासून तब्बल २०,००० फुट उंचावर वसलेल्या या युद्धभूमीवर भारत आणि पाकिस्तान “No-Win” युद्ध लढलेले आहेत.

 

siachen-marathipizza01
bbc.co.uk

भारतासाठी सर्वच दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या युद्धभूमीवर भारताचे १०,००० सैनिक रक्षण करीत आहेत.

 

siachen-marathipizza02
news18.com

येथील तापमान ० पेक्षा खाली असून ते तब्बल उणे ६० अंश सेल्सियस एवढे खाली जाऊ शकते.

विचार करा, आपल्याकडे १० अंशावर तापमान आलं की आपली काय अवस्था होते आणि इथे आपले सैनिक अवजड शस्त्रे आणि पेहरावाचा भार सहन करून वावरत असतात. सियाचीन मध्ये सामान्य स्थितीच्या तुलनेत केवळ १०% ऑक्सिजन आहे. हे प्रमाण प्रत्येक मानवी शरीराला मानवेलच असे नाही. त्यामुळे या स्थितीमध्ये वावरणाऱ्या आपल्या बहादूर सैनिकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

 

siachen-marathipizza03
topyaps.com

 

===

हे सुद्धा वाचा: प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावणाऱ्या भारतीय वायूसेनेबद्दल काही रंजक गोष्टी

===

येथील बर्फाची वादळे तशी १०० किमीच्या वेगाने वाहतात. वर्षभरात येथे ३ फुट एवढी बर्फवृष्टी होते.

 

siachen-marathipizza04
thebetterindia.com

येथे तैनात असणारा प्रत्येक सैनिक हा धातूच्या वस्तूंपासून दूरच राहतो.

कारण एवढ्या बिकट हवामान परिस्थितीमध्ये धातू केवळ १५ सेकंदामध्ये शरीराला अश्या प्रकारे चिटकतो की त्याला शरीरापासून दूर करण्यासाठी प्रसंगी त्वचा ओरबाडून काढावी लागते. वाचून केवळ कल्पनेनेच अंगावर शहारे येतायेत ना?!

 

siachen-marathipizza05
topyaps.com

सियाचीन मध्ये आपल्या सैनिकांचा नंबर १ शत्रू कोण असेल तर – शत्रूराष्ट्र नसून, येथील हवामान आहे!

आपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना येथे कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. तसेच एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मेंदूवर इतका भयंकर परिणाम होऊ शकतो की माणसाचा स्मृतिभ्रंश देखील होऊ शकतो.

 

siachen-marathipizza06
ssbcrack.com

येथील सैनिकांना सर्व आवश्यक गोष्टी या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पोचवल्या जातात.

या युद्धभूमीवर रस्ते मार्गाने पोचणे फारच कठीण आहे. सैनिक त्यांच्या जवळ असलेले अन्नपदार्थ टीनच्या कॅन्समध्ये साठवून ठेवतात, कारण बाहेर कोठे ठेवले तर ते अन्नपदार्थ काही क्षणातच दगडासारखे कडक होऊन जातात.

===

हे पण वाचा: भारतीय सैन्याबद्दल १३ रंजक गोष्टी ज्या वाचून अभिमानाने ऊर भरून येतो

===

siachen-marathipizza07
storypick.com

सरकारी आकडेवारीनुसार मागील तीन वर्षांमध्ये तब्बल ५० जवानांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे.

येथील नुब्रा नदीच्या किनाऱ्यावर एक वॉर मेमोरियल उभारण्यात आले आहे. जेथे आजवर या युद्धभूमीवर शहीद झालेल्या भारतीय सैनिकांची नावे कोरून ठेवलेली आहेत.

 

siachen-marathipizza08
news.bbcimg.co.uk

 

अशी ही अतिघातक युद्धभूमी जी तिचे रक्षण करणाऱ्या रक्षणकर्त्यांवरच सूड उगवते. पण तिचे हे रक्षणकर्ते कोणतीही तक्रार न करता केवळ तिच्या रक्षणासाठीच डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात.

अश्या या वीरांना इनमराठीचा मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?