' दूध मिळावं म्हणून माणूस गौ-मातेला ज्या यातना देतो त्या पाहून मन सुन्न झाल्याशिवाय रहाणार नाही… – InMarathi

दूध मिळावं म्हणून माणूस गौ-मातेला ज्या यातना देतो त्या पाहून मन सुन्न झाल्याशिवाय रहाणार नाही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

भारतीय संस्कृतीत गायीला खूप महत्वाचं स्थान आहे. गाईची गोमाता म्हणून पूजन केले जाते. दिवाळीतल्या वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरु यांची पूजा गावांपासून शहरांपर्यंत केली जाते.

खेड्यापाड्यांत तर रोजच गाईची पूजा होते, दारासमोर आलेल्या गाईला तिच्या हक्काचा घास दिला जातो. गाईच्या पोटात ३३ कोटी देवांचा वास असतो अशी श्रद्धा आहे.

 

modi and cow inmarathi
hindustan times

 

भारतात गायीसाठी आपल्या जेवण्यातला घास रोज ठेवला जातो. भारतात गोहत्या बंदीचा कायदा आहे. दुभत्या गाईंना मारण्यास बंदी आहे, त्याबरोबरच धार्मिक भावना दुखावतात म्हणूनही गोहत्या बंदी आहे.

 

cow inmarathi
abp live

 

एखादी गाय मारली तर त्या माणसाला मारायलाही कमी केले जात नाही. गोहत्याबंदी वरून भारतात दंगेही होतात.

अगदी सावरकरांच्या, “गाय हा उपयुक्त पशु आहे” या विधानाचाही राजकारणी लोक केवळ राजकारण करण्यासाठी वापर करतात.

भारतात आधीपासूनच शाकाहाराचे महत्त्व असल्यामुळे बहुतांशी लोकसंख्या ही शाकाहारी आहे. आणि जे मांसाहारी लोक आहेत त्यातील बरेच जण गोमांस खात नाहीत.

कारण एकच, गाईला ‘गोमाता’ समजलं जातं. तसंच भारतात दूध प्राशनालाही खूप महत्व आहे. त्यातही गाईच दुध रोज पिणं म्हणजे शक्तिवर्धक पेय  प्यायलासारखं आहे.

गाईच्या दुधाला भारतात ‘पूर्ण अन्न’ म्हटलं जातं. म्हणजे जर तुमचं लहान मूलं जेवण करत नसेल पण गाईचे दूध पीत असेल तरी असा समज आहे की, गाईचे दुध प्यायल्याने त्याला सर्व प्रकारचे पोषण मिळते.

 

cow inmarathi 1
CT

 

भारतात खूप लोकांचं जेवण हे शाकाहारी असतं. इकडे अहिंसेचा प्रचार झाल्यामुळे लोक बऱ्यापैकी शाकाहारी आहेत. माणसाच्या शरीराला आवश्यक असणारे घटक, पोषणतत्व ही पालेभाज्या, फळभाज्या, फळं, कडधान्य यांच्यातून मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.

परंतु त्याबरोबरच आवश्यक असणारे कॅल्शियम, विटामिन डी सारख्या गोष्टी मिळवण्यासाठी मात्र दुग्धजन्य पदार्थांचा वापर केला जातो.

म्हणून भारतात दूध, दही, लोणी, ताक, तूप यासारख्या पदार्थांबरोबरच पनीर, चक्का, खरवस, खवा, चीज हे पदार्थदेखील दुधापासून बनवले जातात, आणि खाल्ले जातात.

 

milk products inmarathi
exporters india

 

परंतु आपल्या महत्वाच्या, ‘इंडियन डेअरी इंडस्ट्री’ मध्ये हे दुग्धधारक पदार्थ बनवण्यासाठी लागणारे गाईचे दूध कशा पद्धतीने काढले जाते हे जर पाहिलं तर आपलीच आपल्याला लाज वाटते.

याची कधीही माहिती करून दिली जात नाही किंवा त्याची टीव्हीवर दाखवण्यात येत नाही. त्याविषयी कोणतीही माहिती सामान्यांसाठी उपलब्ध नसते.

तसं पाहिलं तर गाय किंवा म्हैस या जेव्हा गाभण राहतात, तेव्हा त्यांचं जीवनही एखाद्या प्रेग्नेंट बाई सारखं असतं.

दिवस भरल्यावर एका बाळाला जन्म देणं आणि त्या बाळाच्या पालनपोषणासाठी त्याला दूध देणे, हे जे एक स्त्री करते तसंच त्यांच्याही बाबतीत असतं.

परंतु दूध मिळवण्यासाठी, गाय गाभण राहण्यासाठी जर काय केलं जात असेल हे जर पाहिलं तर खरंच लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

गाय गाभण राहावी म्हणून तिचे मुद्दाम एखाद्या वळू बरोबर मिलन घडवले जाते. ही तिच्यावर जबरदस्तीच आहे, इच्छा असो अथवा नसो पण हे तिच्यावर लादलं जातं.

 

cow inmarathi 3
pinterest

 

भारतासारख्या अहिंसेचं प्रस्थ असणार्‍या देशात या कृत्याला काय म्हटले जाईल? जेव्हा एखाद्या स्त्री बरोबर ही घटना घडते तेव्हा त्याला भारतात काय म्हणतात तर ‘बलात्कार’ म्हणजेच गाईवर देखील हा एक प्रकारे बलात्कारच केला जातो.

परंतु ‘गाईवर बलात्कार’ असं जर म्हटलं तर देशात पुन्हा गदारोळ उठेल.

गायीच्या दुधापासून मिळणारा फायदा होणार नाही, म्हणून मग त्याला एक गोंडस नाव आपल्या देशात दिलं जातं, आणि ते म्हणजे “कृत्रिम रेतन”.

 

cow inmarathi 2
youtube

 

दुग्ध उत्पादकासाठी कृत्रिम रेतनामुळे आमचं दुग्ध उत्पादन वाढलं ही अभिमानाने सांगायची गोष्ट असते.

भारतात गोहत्येला बंदी तर आहेच परंतु त्याच बरोबर गाईला कोणत्याही प्रकारे त्रास देणे, तिला मारणं याही गोष्टी निषिद्ध समजल्या जातात. गोहत्या करणे म्हणजे तर तो गुन्हा एका मनुष्यवधाप्रमाणेच गणला जातो.

गाय गाभण राहते त्यातून तिला जे अपत्य होतं ते जर नर असेल तर त्याची थोड्याच दिवसात कत्तलखान्यात रवानगी होते.

त्याच्या मांसाचा खाण्यासाठी आणि त्याच्या कातडीचा लेदर बॅग, शूज बनवण्यासाठी वापर केला जातो.

जर गाईला वासरू जर स्त्री जातीचं असेल तर त्या वासराला गाईचं, तिच्या आईचं दुध हे पिऊ दिले जात नाही. आणि तेच दूध सगळीकडे विकायला बाहेर येते.

 

cow inmarathi 4
india today

 

आणि हे एका गाई बरोबर तिच्या पाच वर्षाच्या काळातच होतं. या पाच वर्षात दरवर्षी तिला गाभण करण्यात येतं. दरवर्षी तिच्या पिलांचा वापर केला जातो, तिचं दूध विकलं जातं, त्यापासून पैसा मिळवला जातो.

अगदी प्रत्येक दिवसांचा हिशेब ती गाय देत असते. तिच्यापासून मिळणार दूध वाढावं म्हणून तिला इंजेक्शन्स देण्यात येतात आणि दुग्धोत्पादन वाढवण्यात येतं.

हे अत्याचार पाच वर्ष सतत तिच्यावर चालू असतात. आणि जेव्हा पाच वर्षानंतर ही गाय थकते, तिची प्रजननक्षमता कमी होते त्यामुळे तिच्यापासून मिळणारे दूध पण संपतं.

मग अशी गाय ठेवून काय उपयोग? असा व्यवहारी विचार माणूस करतो. प्रत्येक दिवसाचा हिशोब करणारा माणूस मग अशा गाईला कत्तलखान्यात पाठवतो.

आणि ह्या गायीचा मांस उत्पादनासाठी वापर केला जातो, आणि तिच्या कातडीचा जॅकेट्स,पर्सेस, शूज, बेल्ट तयार करण्यासाठी वापर होतो.

भारतात दुग्धक्रांती झाली आणि भारत हा दुग्ध उत्पादन करणारा जगातील दुसरा देश बनला आणि बीफ बनवणारा आणि त्याची निर्यात करणारा जगातील पहिला देश बनला.

 

cow inmarathi 5
kinder world

 

म्हणजे जी गाय दुग्धोत्पादनासाठी येते त्या प्रत्येक गाईचा बीफ उत्पादनासाठीही वापर केला जातो.

हे सगळं ऐकून, समजूनही जर तुम्ही दूध पिणार असाल तर केवळ भावनेच्या आहारी जाऊन गोमांस खाण्याला विरोध करणं योग्य आहे का? तुम्ही शाकाहारी किंवा मांसाहारी असाल तरी तुम्हाला हे पटणार नाही.

आम्ही कधीच गाईला मारू शकत नाही आणि गोमांस खाऊ शकत नाही असं तुमचं म्हणणं असू शकतं.

परंतु त्या गाईसाठी मात्र या कशानेच फरक पडत नाही तिचं आयुष्य हे ती जिवंत असताना केवळ माणसांना दूध देण्याकरिता असतं.

ती मेल्यानंतरही तिच्या मांसाचा आणि कातडीचा वापर माणूस करतो हे वागणं माणसाच्या दांभिकपणाचं दर्शन घडवतं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?