Cow Startups – गुजरात मधील नवीन करियर ऑप्शन

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला पवित्र मानून, गोमाता म्हणून तिची पूजा केली जाते. इतकेच नव्हे तर गोमय (शेण), गोमुत्र, गायीच्या दुधापासून बनवलेले तूप हे सुद्धा धार्मिक कार्यात, होम हवनासाठी वापरले जाते. घरात काही अपवित्र गोष्ट घडल्यास गोमुत्र शिंपडून घर पवित्र केले जाते. नैवेद्य सुद्धा गोग्रास दिला तरच देवापर्यंत पोचतो अशी धारणा आहे. शिवाय पोळा, वसुबारस ह्या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. थोडक्यात आपला देश कृषिप्रधान असल्याने तसेच त्यांच्यापासून मिळणाऱ्या विविध गोष्टींमुळे गाय, बैल ह्यांना लोकांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये त्यांना पवित्र मानतात.

 

indian-cow-worship-marathipizza
pagalparrot.com

हल्लीच गोरक्षणासाठी भारत सरकारने कायदे कडक केले आहेत. पण ह्याही पुढे जाऊन गुजरात मध्ये आता गोधनापासून नवीन व्यवसाय सुरु करण्यास प्राधान्य दिले जात आहे. Cow Startups मुळे cow-based industry निर्माण होण्यास चालना मिळेल. ह्यामुळे अनेकांना रोजगार मिळेल, नवीन व्यवसायाचे क्षेत्र खुले होईल शिवाय गोवंशाचे रक्षण सुद्धा होईल.

गुजरात सरकारचा असा विचार आहे की,

गोमूत्र, गायीचे दूध, तूप आणि गोमय ह्यांना इकॉनॉमी मध्ये अंतर्भूत केले जाऊ शकते. त्याने छोटी गावे, शहरे ह्याठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन विकासाला चालना मिळू शकेल.

 

cow-startup-marathipizza01
yourstory.com

गायीचे दूध, तूप व गोमुत्र औषधी आहे हे आयुर्वेदात सांगितले आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या रिसर्च मध्ये सुद्धा हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच अनेक सौंदर्य उत्पादनांच्या व औषधांच्या निर्मितीमध्ये ह्या गोष्टींचा उपयोग केला जातो. ह्या स्टार्टअप चा उद्देश हा आहे की गायीपासून मिळणाऱ्या वस्तूंचे नवीन माध्यमांद्वारे branding व मार्केटिंग करणे.

ह्यात गोपालन, दुध व इतर दुग्धजन्य पदार्थ जसे तूप वगैरे ,तसेच गोमुत्र ,गोमय ह्यांची विक्री करणे ह्या सर्वांचा समावेश होतो.

गोधनाचा वापर उत्पन्न मिळवण्यास करण्यासाठी गुजरात मध्ये गो-सेवा आयोगाची निर्मिती केली आहे आणि ते मोठ मोठ्या उद्योगपतींकडून आणि इंडस्ट्रीमधील लोकांकडून ह्यासाठी सपोर्ट मागत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की


आजवर गोधनाकडे एक प्रोडक्ट ह्या दृष्टीने बघितले गेलेले नाही, गोधनामुळे व्यापार उद्योगाला चालना मिळू शकते. खेड्यातील लोकांना कुठेही बाहेर न पडता हक्काचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

 

cow-startup-marathipizza02
navodayatimes.in

गौसेवा आयोगाचे चेअरमन डॉक्टर वल्लभ काठीरिया म्हणतात की

गो पालन आणि गोधनाचा उपयोग करून अनेक प्रोडक्ट्सची निर्मिती होऊ शकते. हे प्रोडक्ट्स व्यावसायिकरीत्या मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकतात. फक्त ह्याचे व्यवस्थित branding आणि मार्केटिंग व्हायला हवे. ह्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळेल. आजवर ह्या पद्धतीने विचारच केला गेला नव्हता.

काठीरिया पुढे म्हणतात –

आम्ही गोधनापासून निर्माण झालेल्या उत्पादनांच्या स्टार्टअप्स चा प्रसार आणि प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या ‘मेक इन इंडिया’ ह्या योजनेचाही प्रसार करणार आहोत. लवकरच आम्ही मोठ्या उद्योगपतींना, व्यापारी मंडळांना तसेच औद्योगिक संघटनांना Cow based स्टार्ट अप्स यशस्वी करण्यास मदत करण्यासाठी पाचारण करण्यात आहोत. आमचा MSME (Micro, Small and Medium Enterprises) ह्यांच्यासोबत काम करण्याचा विचार आहे.

ह्या गो उत्पादनांची विक्री मोठ्या शहरांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन द्वारे करण्याला मोठा वाव आहे. तसेच हे स्टार्ट अप्स छोट्या गावांमध्ये तसेच लहान शहरांमध्ये सुरु करण्यासही खूप वाव आहे. ह्यामध्ये गो पालन करणारे स्त्रियांचे गट सहभागी होतील अशी आशा आहे.

 

cow-startup-marathipizza03
india.com

हा आयोग “गौ संत संमेलन” आयोजित करण्याच्या देखील विचारात आहे. ह्या संमेलनातून गोरक्षणासंबंधी नवीन झालेल्या कायद्यांविषयी जनजागृती करण्यात येईल. आणि ह्या नव्या व्यवसायाचा लोकांमध्ये प्रचार करण्यात येईल.

जर हे स्टार्ट अप्स यशस्वी झाले तर खरच एक नवीन व्यवसाय सुरु होऊन गावातील व लहान शहरातील अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि गोधनाचे रक्षण व संवर्धन सुद्धा आपसूकच होईल.

हे देखील वाचा: (ह्या भारतीय जातीच्या गाईं समोर विदेशी हायब्रीड गायी अगदी फिक्या आहेत)


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?