बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१२ वी हा निकाल लागला आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यावरच एक टेन्शन कमी झालंय, पण त्याचवेळेस त्यांच्या डोक्यामध्ये दुसर टेन्शन भुंग्यासारखं थैमान घालत असणार, ते टेन्शन म्हणजे १२ वी तर झाली आता पुढे काय करू??? कोणता कोर्स घेऊ? करियर नीट झालं पाहिजे, नाहीतर खरं नाही….वगैरे विचार स्वस्थ बसू देत नाहीत. हेच टेन्शन पालकांना ही सतावत असतं.

बरं, आपल्या मुलाचं भलं व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते, पण सोबत ही देखील चिंता असते की त्याने योग्य तो कोर्स निवडावा नाहीतर उगा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये.

अश्या प्रकारे पालक आणि विद्यार्थी दोन्ही सध्या टेन्शनमध्ये आहेत. त्याचं हेच टेन्शन काहीसं हलकं करावं, त्यांना करियर निवडताना जास्त अडचण येऊन नये यासाठी आम्ही घेऊन आलोय हा मार्गदर्शनपर लेख!

यात आम्ही तुम्हाला काही हटके डिप्लोमा कोर्सबद्दल माहिती सांगणार आहोत.

 

diploma-course-marathipizza01
cedp-edu.com

 

कोर्स निवडण्याआधी सर्वात प्रथम विद्यार्थ्याने खालील प्रश्न स्वत:ला विचारणे गरजेचे आहे..

१) मला काय करायला आवडते?

२) मी त्या कोर्सचा अभ्यास करू शकतो का? मला तो अभ्यास करताना मजा येईल का?

३) मी जे काही करेन त्या जोरावर आर्थिकदृष्ट्या मी सक्षम होऊ शकेन का?

या सर्व प्रश्नांना तुमच्या अंतर्मनाने आत्मविश्वासाने हो अशी उत्तरे दिली पाहिजेत, उगाच मित्र घेतोय किंवा कोणी सल्ला दिलाय म्हणून कोणताही कोर्स निवडू नये.

उदाहरण म्हणून १२ वी नंतर करता येतील असे डिप्लोमा कोर्स पुढे देत आहोत. ह्यांमधून पुढे तुम्ही स्वत:चं करियर घडवू शकता!

 

१) Diploma in Fashion Designing:

 

diploma-course-marathipizza02
ncftglobal.com

या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला फॅशन जगताबद्दल आवड असयला हवी. या क्षेत्रात आल्यावर डिजाईन आणि स्टाइल या दोन गोष्टींवरच तुमचं करियर अवलंबून असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्केच करणं देखील शिकावं लागेल.

 

२) Diploma in Computer Application:

 

diploma-course-marathipizza03
cscmoolakkadai.blogspot.in

जर तुम्हाला कॉम्प्युटर सोबत खेळण्याची (गेम नव्हे, तंत्रज्ञान) आवड असेल तर हा कोर्स तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या क्षेत्रात तुम्हाला computer software आणि languages वर काम करायला मिळेल.

 

३) Diploma in Yoga:

 

diploma-course-marathipizza04
healthinstitute.edu.au

सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योगा आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे असे समजा.

 

४) Diploma in Banking:

 

diploma-course-marathipizza05
financewalk.com

ज्यांना सायन्सची आवड नसते त्यापैकी बरेच जण बँकिंग क्षेत्राकडे वळतात, पण प्रत्येक जण या क्षेत्रात यशस्वी होतोच असे नाही, त्याचे कारण म्हणजे विद्यार्थी बँकिंग क्षेत्राला अतिशय हलक्यामध्ये घेतात. तुम्हाला बँकिंग संबंधित कार्यांची आवड असेल तरच या क्षेत्रात या, अन्यथा डेटा एन्ट्री करण्यात अख्ख आयुष्य जाईल.

 

५) Diploma in Financial Accounting:

 

diploma-course-marathipizza06
midtraining.com

बहुतेक जण हे क्षेत्र आणि बँकिंग क्षेत्र एकच असल्याचे समजतात, पण तसे बिलकुल नाही. सध्या या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. जर तुम्हाला आकडे आणि हिशोब यांच्या संगतीत राहायला आवडत असेल तर बिनधास्त करा हा कोर्स.

 

६) Diploma in Industrial Safety:

 

diploma-course-marathipizza07
dsps.wi.gov

चाकोरीबाहेरचा करियर ऑप्शन म्हणून याकडे पाहता येईल. प्रत्येक उद्योगामध्ये या क्षेत्राचा समावेश असल्याने बेरोजगार वगैरे राहण्याचा प्रश्नच येत नाही. उद्योगक्षेत्र प्रत्येक आपत्तीपासून सुरक्षित राखणे म्हणजे Industrial Safety

 

७) Diploma in Physiotherapy:

 

diploma-course-marathipizza08
accessiblethailand.com

हा डिप्लोमा खास करून सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी! जर तूम्हाला रुग्णांची काळजी घेण्याची आवड असेल तर तेच काम हटक्या पद्धतीने करून तुम्ही त्यांना बरे कसे करू शकता ते शिकवते Physiotherapy

 

८) Diploma in 3D Animation:

 

diploma-course-marathipizza09
animschool.com

या क्षेत्राबद्दल तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. इमॅजीनेशन आणि मेहनत या दोन गोष्टी या कामात अतिशय महत्त्वाच्या! जर तुम्ही कार्टून वेडे असाल आणि अॅनिमेशनचे फॅन असाल तर बॉस हा कोर्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, पण यात पैसा देखील भरपूर लागतो बरं!

 

९) Diploma in Interior Designing:

 

diploma-course-marathipizza10
घर सजवायची आवड आहे? घरात नवनवीन प्रयोग करून घर सुंदर कसं ठेवता येईल हाच विचार तुम्ही सतत करत असाल, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही चमकण्याचे चान्सेस जास्त आहेत.

 

१०) Diploma in Advertising and Marketing:

 

diploma-course-marathipizza11
mediamakers.me

हे तर आजचं सर्वात आघाडीचं क्षेत्र! गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र इतकं भरभराटीला आलं आहे की जाहिरात आणि मार्केटिंगच्या पलीकडे गेलं आहे. जर तुमच्याकडे संवाद कला आहे किंवा लोकांना कन्वीन्स करण्याची पॉवर आहे तर या क्षेत्रात नशीब आजमावून बघण्यास हरकत नाही.

 

११) Diploma in Various Languages:

 

diploma-course-marathipizza12
indiaeducation.net

या क्षेत्रात सहसा कोणी पाउल ठेवत नाही कारण हे क्षेत्र तितकं फॅन्सी नाही ना! पण विश्वास ठेवा, यात करियर करण्यास तुम्हाला जास्त कॉम्पीटीशन नाही. तसेच पैसे हि जबरदस्त मिळतात, आणि परदेशातून संधी चालून आली तर जमलं की सगळं!

हो पण तुम्हाला विविध भाषा शिकण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल.

असे अजून अनेक कोर्स आहेत. पण लक्षात ठेवा तुमच्या आवडीनुसारच कोर्स निवडा. आवड म्हणजे वरवरची नको.

खरंच त्यात स्वत:ला झोकून देण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी असेल आणि जे करताना तुम्हाला आनंद मिळेल असंच क्षेत्र करियर म्हणून निवडा, यातच तुमचे यश आहे!

तुम्हाला देखील या व्यतिरिक्त अजून काही कोर्सेस बद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, म्हणजे आपल्या विद्यार्थी मित्रांना त्याचा फायदाच होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ११ “हटके” डिप्लोमा कोर्सेसकडे नजर टाकलीच पाहिजे!

 • May 2, 2019 at 5:09 pm
  Permalink

  Animation diploma kelya nantr job opportunity aahet kiti percent aahe??

  Reply
 • May 15, 2019 at 3:33 pm
  Permalink

  Mazhe marketing ka bhut shok hai. Isliye mazhe vahi krna hai.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?