मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सध्या राफेल मुद्द्यावर देशभरात वातावरण ढवळून निघाले आहे.

संसदेपासून गल्लीपर्यंत इतकंच काय फेसबुकपासून व्हाट्सअँपच्या ग्रुप्सपर्यंत सगळीकडे राफेल मुद्द्यावर सरकार समर्थक आणि सरकारच्या विरोधकांमध्ये खडाजंगी होते आहे.

 

modi-ambani-rafale-jet-truth-inmarathi

 

ह्या प्रकरणात मोदी दोषी असून ते चोर आहेत असा आरोप विरोधी पक्ष करतोय तर सत्ताधारी म्हणताय की हे आरोप धादांत खोटे असून आरोप करणारे लोकच चोर आहेत.

तर वातावरण प्रचंड पेटलेलं आहे. खरं कोण आणि खोटं कोण हे बाहेर येईलच पण त्यापूर्वी ह्या मुद्द्यावर एक मोठा रंजक किस्सा समोर आला आहे.

एका मोदी समर्थक तरुण उद्योजकाने आपल्या लग्न पत्रिकेवर राफेल घोटाळा झाला नाही आणि मोदींवर केले जाणारे आरोप धादांत खोटे असल्याची माहिती छापली आहे.

इतकंच नाही ह्या तरुणाने त्या पत्रिकेच्या माध्यमातून मोदींना पुन्हा मत द्या अशी मागणी देखील केली आहे!

 

wedding-card-namo-inmarathi
odishabytes.com

काही महिन्यांपूर्वी एक लग्न मुलीने मुलगा मोदी समर्थक आहे म्हणून तोडून टाकलं होतं, त्यानंतर घडलेला हा दुसरा रंजक किस्सा आहे.

राफेल प्रकरणावर मोदी कसे बरोबर आहेत हे सांगणारी पत्रिका काढून ह्या मुलाने षटकार ठोकला आहे. एकंदरीत लग्न सराईत सुद्धा राजकारणाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.

युवराज पोखरणा, हा सुरत मध्ये राहणारा तरुण उद्योजक असून लवकरच तो साक्षी अग्रवाल ह्या तरुणीशी विवाहबद्ध होणार आहे.

आपल्या लग्न पत्रिकेच्या माध्यमातून आपण आपल्या लाडक्या नेत्याची नरेंद्र मोदींची बाजू मांडावी ह्या उद्देशाने ह्या तरुणाने एक स्पेशल लग्न पत्रिका छापली आहे.

राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी निर्दोष असून काँग्रेस करत असलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. अशी ह्या तरुणाची धारणा आहे. त्यातूनच ह्या लग्नपत्रिकेचा जन्म झाला आहे.

युवराज जिच्याशी लग्न करणार आहे त्या साक्षी अग्रवालने देखील आपल्या होणाऱ्या पतीच्या ह्या निर्णयाला ग्रीन सिग्नल देत त्याचं स्वागत केलं आहे.

युवराजने काढलेल्या ह्या पत्रिकेवर बरीच रंजक आणि महत्वपूर्ण माहिती राफेल प्रकरणावर देण्यात आली आहे. ह्यात राफेल प्रकरणातील अनेक तथ्य अगदी सोप्या भाषेत मांडण्यात आले आहेत.

 

yuvraj-marriage-card-inmarathi
timesofindia.indiatimes.com

ह्यात पूर्ण घटनाक्रम व्यवस्थित मांडण्यात आला असून ह्या प्रकरणी राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर केलेले आरोप हे कसे बिनबुडाचे आहेत हे नमूद करण्यात आले आहे.

सोबतच पत्रिकेच्या शेवटी “वोट फॉर मोदी इन 2019” असा संदेश देत मोदींना मतदारांनी पुन्हा संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

सोबतच “नमो अँप’ डाउनलोड करून मोदींच्या अभियानाशी जोडलं जावं असं आवाहन देखील त्याने केलं आहे.

ही पत्रिका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून त्याला बरेच शेयर मिळाले आहेत. ह्या पत्रिकेची कीर्ती जस जशी पसरली तस तशी युवराजला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे.

मीडियाशी बोलताना युवराज म्हणतो की,

“राफेल प्रकरणावर मोदींना मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मी व माझी होणारी पत्नी साक्षी ह्या प्रकणातील सर्व फॅक्टस लोकांपर्यंत पोहचवू इच्छित आहोत. त्यासाठी आम्ही लग्नपत्रिकेचा वापर करतोय.

राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत हे आम्हाला जन सामान्यांपर्यंत पोहचवायचं आहे. मी भाजपाचा सदस्य म्हणून नाही तर एक जागरूक करदाता भारतीय नागरिक म्हणून हा निर्णय घेतला आहे.”

युवराजल जेव्हा त्याच्या ह्या पत्रिकेला मिळालेल्या प्रसिद्धी बद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा तो म्हटला की,

“मला हे अपेक्षित नव्हतं, पण जे झालं ते योग्य झालं, लोकांपर्यंत सत्य पोहचेल, ह्या प्रकरणानंतर मला अनेकांचे फोन आलेत. अनेकांनी अभिनंदन केलं. माझ्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांची संख्या देखील वाढली आहे. पण संदेश पोहचला याचा आनंद आहे.”

युवराज हा सुरत आणि अहमदाबादमध्ये कोचिंग क्लासेस चालवतो. त्याचा स्वतःचा व्यवसायही आहे. तो साक्षीशी अरेंज मॅरेज करतो आहे.

 

yuvraj-pokharna-inmarathi
opindia.com

दोघेही कट्टर मोदी समर्थक आहेत असं एकूण त्यांचा वागण्या बोलण्यातून नेहमी दिसून आलं आहे. त्याची होणारी पत्नी साक्षी म्हटली की,

“मोदी हे सुपरमॅन आहेत व प्रचंड कष्टाळू आहेत, त्यांच्यासारखा नेता होणे नाही.”

युवराजने पत्रिकेवर राफेल बरोबरच “बेटी बचाओ, बेटी पढाओ” चा संदेश दिला आहे. पण त्याने केलेली राफेल प्रकरणाची चिरफाड वाखाण्याजोगी आहे.

अश्याप्रकारे लग्नसराईत प्रचार करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील अनेक लोकांनी असे वेगवेगळे संदेश लग्न पत्रिकेच्या माध्यमातून दिले आहेत.

मागे राजस्थानातील एका व्यक्तीने मोदींना मत द्या हा संदेश असलेली पत्रिका छापली होतो.

 

namo-inmarathi
newindianexpress.com

पण मोदींवरील आरोप खोडून राफेल घोटाळा नसून विरोधी पक्षाचं खोटं कारस्थान आहे, असं सांगणारी पत्रिका छापून ह्या सुरतेच्या युवराजने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मोदी समर्थक जोडप्याने लग्नाच्या पत्रिकेवर जे छापलंय ते पाहून लोक राजकीय मतं कुठवर नेतात हे कळतं!

  • January 15, 2019 at 11:36 am
    Permalink

    sir please write a blog on BEST history

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?