' ह्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी हे ५ गॅजेट्स तुम्हाला नक्की मदत करतील – InMarathi

ह्या उन्हाळ्यात कुल राहण्यासाठी हे ५ गॅजेट्स तुम्हाला नक्की मदत करतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

उन्हाळा हा कदाचित लहान मुलांना सोडून इतर कोणालाही आवडत नसावा. लहान मुलांना तो ह्यासाठी आवडतो, कारण त्यांना उन्हाळ्यात सुट्टी असते आणि शाळेचा अभ्यास करावा लागत नाही. पण मोठं झालं की ते सुख देखील आपल्याकडून हिरावून घेतलं जातं.

आपल्याला दर वर्षीचा उन्हाळा हा गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा जास्त जाणवतो. दरवर्षी उकाड्याने हैराण झालेलो आपण मग ह्यापासून सुटका मिळविण्यासाठी अनेक शक्कली लढवत बसतो.

पण आता उन्हाळा आहे तर सूर्य तर तापणारच. भेलेही आपण सूर्याला शांत करू शकत नसलो तरी तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्याच्या ह्या प्रकोपापासून तर नक्कीच वाचू शकतो.

कारण सध्या बाजारात अशी अनेक उपकरणे उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून आपण ह्या उकाड्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो.

१. Skyleo USB fan

 

cool gadgets-inmarathi
gadgets.com

जर तुम्ही अश्या कुठल्या ठिकाणी जात आहात जिथे गर्मिपासून बचावासाठी पंखा, कुलर, किंवा एसी नाही. तर तुम्ही स्वतःबरोबर हा Skyleo USB fan नक्की घेऊन जाऊ शकता. हा पंखा USB आणि मायक्रो USB ने कनेक्ट होतो. याचा वापर तुम्ही गर्मिला दूर पळविण्यासाठी नक्कीच करू शकता. हा पंखा ऑनलाईन साईट्स वर उपलब्ध आहे.

२. पोर्टेबल Generic Mini PC USB refrigerator

 

cool gadgets-inmarathi02
plugnpoint.pk

जर तुम्ही ह्या उन्हाळ्यात कुठे बाहेर फिरायला जाण्याचा किंवा कामाने कुठे बाहेर जायचा प्रपंच करत आहात तर तिथे तुमच्या पाण्याला अथवा कोल्ड्रिंकला थंड ठेवण्यासाठी तुम्ही हा फ्रीज नेऊ शकता. USB ने चालणाऱ्या ह्या गॅजेटमध्ये तुम्ही तुम्हाला हवं ते तापमान सेट करू शकता.

३. USB LED clock fan

 

cool gadgets-inmarathi03
amazon.it

फ्लेक्सिबल नेक असलेला हा USB पंखा कुठेही अगदी सहज अॅडजस्ट केला जाऊ शकतो. ह्यात असणारी LED क्लॉक ह्याला एक सुपर कुल गॅजेट बनवते. हा पंखा देखील तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन साईट वर मिळेल.

४. Solar Powered Fan Cap

 

cool gadgets-inmarathi04
theecostore.co.uk

नाईलाजाने जर तुम्हाला उन्हात वेळ घालवायचा असेलं, तर Solar Powered Fan Cap हे तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय ठरेल. ही कॅप घालून उन्हात जाताच ह्यात लागलेले सोलर पॅनल उर्जा निर्मिती करू लागतात ज्याच्या मदतीने ह्या कॅपमध्ये असलेला पंखा फिरायला लागतो आणि तो तुमच्या चेहऱ्यावर हवा फेकू लागतो. ही कॅप देखील तुमच्या डोक्यानुसार अॅडजस्ट होऊन जाते.

५. True Vino Mod Accordion Cooling Carrier

 

cool gadgets-inmarathi05
truevino.in

उन्हाळा आहे, म्हणजेच मुलांच्या शाळांना सुट्टी, अश्यातच मग बाहेर फिरायला जाण्याचा बेत होतोच. पिकनिकला जाताना आपण सोबत फळ, ज्यूस इत्यादी सर्व घेत असतो. पण एवढ्या उकाड्यात ह्या सर्वांना थंड ठेवणे हा एक मोठा प्रश्न असतो.

ह्यावर ही True Vino Mod Accordion Cooling Carrier एक उत्तम पर्याय ठरू शकते. ह्या लाईटवेटेड पिकनिक बॅगमध्ये एक इंस्युलेटेड लेयर लागलेली आहे जी खाण्यापिण्याच्या वस्तूंना दीर्घकाळ थंड ठेवण्यात मदत करते.

मग ह्या उन्हाळ्यात हे कुल गॅजेट्स वापरा आणि उकाडाही एन्जॉय करा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?