' “काश्मीरला कोणापासून धोका?” फरूक अब्दुल्ला यांच “ते” विधान आठवतंय? – InMarathi

“काश्मीरला कोणापासून धोका?” फरूक अब्दुल्ला यांच “ते” विधान आठवतंय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांनी काही वर्षांपूर्वी अशी काही विधाने केली होती, ज्यावर वाद निर्माण झाले होते. त्यामुळे सर्वांकडून त्यांची अवहेलना झाली होती. डॉक्टर अब्दुल्ला म्हणाले की,

‘पाकिस्तान प्रशासित काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, तर भारत प्रशासित काश्मीरचा भाग हा आपला आहे.’

यानंतर त्यांनी म्हटले की,  ‘जर भारताने ऑटोनोमी दिली, तर लोकं स्वातंत्र्य मागतील.’

 

Farooq-Abdullah.Inmarathi1
indianexpress.com

 

डॉक्टर अब्दुल्ला यांनी ही विधाने आणि काश्मीरचे आताचे हाल – हवालच्या विषयावर बीबीसी ने त्यांच्याशी काही वर्षांपूर्वी खास संवाद साधला होता, चला तर बघूया त्यांनी नक्की काय उत्तरं दिली होती ते!

प्रश्न : तुमच्या विधानांवर वाद का होतात ?

उत्तर : वाद ?

प्रश्न : तुम्ही अलीकडेच सांगितले होते की, ‘पाकिस्तान प्रशासित काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे, तर भारत प्रशासित काश्मीरचा भाग हा भारताचा आहे. पण भारत तर बोलतोय की, पाकिस्तान प्रशासित काश्मीरचा भाग देखील भारताचा आहे ?

उत्तर : हो बोलत आहेत. ७० वर्षांमध्ये काय केले त्यांनी त्यांच्याकडून याला घेण्यासाठी ? चार युद्ध झाले पण सीमा तर तिथेच उभी आहे. त्याऐवजी जो हाजी पीरचा भाग यांनी मिळवला होता.

तो देखील जेव्हा भारताचे पंतप्रधान रशियाला गेले होते आणि तिथे पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान आणि येथून गेलेले शास्त्री साहेब हे भेटले.

तेव्हा तो भाग पाकिस्तानला द्यावा लागला होता.

जर तुम्ही तो भाग मिळवला होता, तर मग तो तुम्हाला परत का द्यावा लागला ? यात वादाचा प्रश्न काय आहे ? त्यांच्याकडे आहे तो भाग आणि आपल्याकडे आहे हा भाग यात कोणताही बदल झालेला नाही.

 

Farooq-Abdullah.Inmarathi1
indianexpress.com

 

प्रश्न : तुम्ही अजून एक विधान केले होते आणि भारताला म्हटले होते की, जर तुम्ही ऑटोनोमी दिली नाही तर लोकं स्वातंत्र्य मागतील. पण येथील जास्तकरून लोकं स्वातंत्र्य मागतात ?

उत्तर : काय अर्थ स्वातंत्र्य ? काय स्वातंत्र्य ? काय आहे स्वातंत्र्य ? तुम्ही लँड लॉक म्हणजे चारही बाजूंनी बांधलेले असणे. एकीकडे चीनकडे अणुबॉम्ब आहे. भारताकडे अणुबॉम्ब आहे.

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आमच्याकडे काय आहे ? आमच्याकडे सुरी देखील नाही आहे. स्वातंत्र्य कशाने घेणार ? बोलणे खूप सोपे आहे. ‘असेच चालत राहिल तर काश्मीर भारताच्या हातून निसटेल’.

प्रश्न : डॉक्टर साहेब तुम्ही उरीला सांगितले होते की, पाकिस्तानने बांगड्या घातलेल्या नाहीत. ते पाकिस्तान प्रशासित काश्मीर घेऊ देणार नाही. त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे, भारताकडे पण अणुबॉम्ब आहे ?

उत्तर : मी दोन्ही गोष्टींना सांगितले. दोघांकडे देखील अणुबॉम्ब आहे, जे ते वापरू शकत नाहीत. इकडे कोट्यावधी लोक मारले जातील आणि तिकडेही कोट्यावधी लोक मारतील.

पण ही दोघांमधील सीमा तिथेच उभी राहील.

चार युद्ध लढून देखील ही सीमा तिथेच उभी आहे, तर पुढे जाऊन कोणते युद्ध लढून ही सीमा बदलणार आहे? हे होणार नाही. ही तर योग्य गोष्ट आहे, जी आपल्या समोर आहे. यामध्ये कसला वाद आहे.

 

Farooq Abdullah.Inmarathi2
intoday.in

 

प्रश्न : बिहारच्या न्यायालयाने आपल्या विधानावर तुमच्या विरुद्ध केस दाखल करण्याचे आदेश दिले आहेत ?

उत्तर : हो दिला आहे. कितीतरी न्यायालयांमध्ये केसेस येतात. आता मी त्यांना घाबरून राहू आणि मी माझ्या शब्दापासून मागे फिरेन, त्यातला फारूक अब्दुल्ला नाही.

प्रश्न : असे देखील म्हटले जाते की, तुम्ही बातम्यांमध्ये झळकत राहण्यासाठी अशी विधाने करता. काय हे सत्य आहे?

उत्तर :  जे बोलतात त्यांनाच हे तुम्ही विचारा. कोणत्या पुराव्यावर विचारतात ते ? त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नसेल.

प्रश्न : डॉक्टर साहेब ऑटोनोमीचा प्रस्ताव तुमच्याच जमातीने विधानसभेमध्ये पास केला होता आणि दिल्लीने त्याला मानले नाही. मग तुमच्या जमातीने तेव्हाच राजीनाम दिला का नाही ?

उत्तर : का नाही मानलं ? काय म्हणता तुम्ही नाही मानलं ? यावर बोलणी चालू आहेत.

 

Farooq Abdullah.Inmarathi3
thenewshimachal.com

 

प्रश्न : पण त्या गोष्टीचे काय झाले ?

उत्तर : एक न एक दिवस होईल. त्याबद्दल बोलणी अजूनही सुरूच आहे.

प्रश्न : कश्मिरी लोकांना धोका आहे, पाकिस्तानकडून की आरएसएसकडून ?

उत्तर : आरएसएसकडून कश्मीरलाच काय, संपूर्ण देशालाच धोका आहे. पाकिस्तानकडून आम्हाला कोणताच धोका नाही आहे. पाकिस्तानमध्ये एवढा दम नाही की तो आम्हाला घेऊ शकेल.

आम्हाला धोका तर आतून आहे, ज्याला आम्ही आरएसएस बोलतो. महाराष्ट्रात हिंदुंवर हल्ला होत आहे, मुसलमानांवर हल्ला होत आहे.

गौ रक्षक हल्ला करत आहेत, हे कोण लोक आहेत? आरएसएस तर पूर्ण देशामध्ये अशी आग लावत आहे की, अल्लाहलाच माहिती याचा परिणाम काय होईल? हे अजून किती पाकिस्तानी बनवणार.

 

Farooq Abdullah.Inmarathi4
cloudfront.net

 

प्रश्न : भारत सरकार म्हणते की, नोटबंदीनंतर काश्मीरमध्ये दगडफेक कमी झाली आहे. या वितर्कांसह तुम्ही सहमत आहात ?

उत्तर : तुम्ही मला हे सांगा की, आज जे तरुण बंदूक उचलत आहेत, हे नोटबंदीने झाले ? ह्यांना काय वाटते की, स्थलांतरण बंद झाले आहे ? कारण यांनी नोटबंदी केली.

हे त्या जगात राहतात, जिथे आंधळे आणि बहिरे राहतात.

अशी प्रश्न उत्तरांची मुलाखत डॉक्टर फारूक अब्दुल्ला यांनी बीबीसीला दिली होती. त्यांच्या या म्हणण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे, याचा अंदाज तुम्हीच लावा.

आता अर्थात या मूलाखतीला देखील ३ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला, तरीही आज सुद्धा काश्मीर मुद्दा हा काही सुटलेला नाही, किंवा त्याची दाहकता कमी झालेली दिसत नाही!

कित्येक सरकारे येतील जातील पण हा मुद्दा कधी निकालात काढणार याच प्रतीक्षेत प्रत्येक भारतीय आहेत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?