‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सेक्स थेरपिस्ट अथवा सेक्सोलॉजिस्ट च्या आयुष्यबद्दल आपल्या मनात बरंच कुतूहल असतं. सेक्स अथवा लैंगिकता हा विषय भारतात बऱ्यापैकी खाजगी समजला जातो. त्याची उघड वाचता कोणी सहजासहजी करत नाही. केलीच तर लोक संशयास्पद नजरेने बघतात.

पण सेक्स थेरपिस्ट अथवा लैंगिक विकार तज्ञ मात्र दिवसभर प्रणय, लैंगिक समस्या या विषयांवरच लोकांशी संवाद साधत असतात. अर्थातच तो त्यांचा कामाचा भाग आहे.

आपल्या नेहमी प्रश्न पडत असतो की जेव्हा एखादा पेशंट या लैंगिक विकार तज्ज्ञांकडे जातो तेव्हा तो नेमकं त्याचा अत्यंत खाजगी अश्या शारीरिक समस्येविषयी डॉक्टरांना कसा सांगत असेल.

याहीपेक्षा तो डॉक्टरांना नेमका काय प्रश्न विचारतो हे जाणून घेणे पण कुतूहलाचे आहे.


 

social-taboos-inmarathi
responsibleanarchist.files.wordpress.com

बऱ्याचदा लैंगिक समस्या घेऊन जाणारे लोक त्यांचा अत्यंत खाजगी बाबी उघड करतातच सोबत त्यांचा आयुष्यातल्या घडामोडींचा त्यांचा लैंगिकतेवर झालेल्या परिणामाबद्दल देखील ते लैंगिक विकार तज्ज्ञाशी संवाद साधतात. अश्यावेळी त्या लैंगिक रोग तज्ञाला मानसशास्त्रज्ञाची दुहेरी भूमिका पार पाडावी लागते.

लैंगिक विकार तज्ञ दिवसभरात अनेक लैंगिक समस्यांवर चर्चा करतात. त्यात लोकांच्या जननेंद्रियांचा आकारापासून प्रणय विफलते पर्यंत सर्व गोष्टीवर चर्चा होत असते.

परंतु लैंगिक विकारतज्ज्ञ काही विशिष्ठ प्रकारच्या प्रश्नांना वारंवार तोंड देत असतात. ते प्रश्न कोणते हे जाणून घेणे अधिक रंजक आहे.


चला तर आपण त्या आठ काही प्रसिद्ध प्रश्नांबद्दल जाणून घेऊयात ज्याचा सामना लैंगिक विकार तज्ज्ञ करत असतात.

१) मी नॉर्मल आहे ना?

बऱ्याचदा लोकांना त्यांचा लैंगितेविषयी शंका असतात. जश्या प्रकारे ते विडिओमध्ये बघतात, कल्पना करतात त्या साच्यात जर त्यांची लैंगिकता बसत नसेल. तर त्या व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होउ लागतात. मग ती जननेंद्रियांचा आकारापासून त्यांचा कॅपॅसिटीपर्यंत!

 

happy-man-inmarathi
youtube.com

अनेक लैंगिक विकार तज्ज्ञांचा म्हणण्यानुसार त्यांचाकडे येणाऱ्या पेशंटला जेव्हा ते सांगतात की तो लैंगिक दृष्ट्या सक्षम आहे तेव्हा त्यांचा पेशंटचा आनंद गगनात मावत नसतो.

कारण त्यांचा मनातील सर्व शंका दूर झालेल्या असतात. कधी कधी तर ते उत्साहात उड्या देखील मारतात.

२) चरमानंद (ओर्गासम) म्हणजे काय?

ओर्गासम काय असतं हे बऱ्याच महिलांना कळत नसतं, त्यात नेमकं काय होतं , ओर्गासमला पोहचण्यासाठी काय करावं लागतं हे जाणून घेण्याची महिलांना उत्सुकता असते. त्याबद्दल त्या नेहमी लैंगिक विकार तज्ज्ञाकडे येत असतात.


 

sex-foreplay-inmarathi
lifecrust.com

अश्यावेळी त्यांना बऱ्याचदा समजून सांगावं लागतं कि ते काय आहे. बऱ्याचदा नवऱ्याचा लवकर पतनामुळे स्त्रीला चरमा पर्यंत पोहचता येत नाही.

अश्यावेळी नेमका ओर्गासम कसा होतो हे जाणून घेण्यासाठी लैंगिक विकार तज्ज्ञ त्यांना सेक्स टोईज वापरायला लावतात. ज्यामुळे त्यांना चरमानंदाची अनुभूती घेता येत असते.

३) मी माझ्या पार्टनरला चरमानंद कसा देऊ शकतो?


हा बऱ्याचदा पुरुषांकडून विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यांना प्रश्न पडलेला असतो की ते त्यांच्या जोडीदाराला अपेक्षित ओर्गासम कसा देऊ शकतील? त्यांना शरीर सुख कसं देऊ शकतील?

ह्या प्रश्नावर लैंगिक तज्ज्ञांच्या मतानुसार कामुकता वाढवणारे संवाद घडले पाहिजे.

 

sex-freuency-inmarathi
evanmarckatz.com

चांगली काम क्रीडा घडून आली पाहिजे. जशी काम क्रीडा व एरोटिकनेस वाढेल तसा चरमानंद खुलत जात असतो.


खरंतर ही गोष्ट वैयक्तिक असते, तिचा संबंध त्या व्यक्तीशीच असतो तरी ह्या गोष्टी करून बघायला हरकत नाही.

४) माझ्या लिंगाचा आकार छोटा आहे का?

आकाराला खरंतर इतकं महत्व नाही. अनेक पुरुषांना जरी असं वाटत असलं तरी लिंगाच्या आकाराला इतकं महत्व नाही. परंतु तरी अनेक लोक हि समस्या घेऊन लैंगिक विकार तज्ज्ञा कडे येत असतात.

 

afraid-inmarathi
pivotpointenterprises.com

बऱ्यापैकी लोक हे पॉर्न व्हिडिओ बघून स्वतःला कमी वा कमजोर वाटवून घेतात आणि त्या बाबतच्या वाटणाऱ्या भीतीमुळे लैंगिक विकार तज्ज्ञांची वाट धरतात.

परंतु आकाराचा तसा प्रणयाशी इतका गहन संबंध नसल्याचं मत अनेक लैंगिक विकार तज्ज्ञ व्यक्त करतात.

५) माझ्या जोडीदाराला आता प्रणय करावासा वाटत नाही?

अनेकदा नात्याला खूप वर्ष झाल्यावर, प्रणय करण्यातील लोकांचा इंटरेस्ट कमी कमी होत जातो. त्यात अनेकांचे जोडीदार स्त्री असो वा पुरुष हे आयुष्यात घडत असलेल्या गोष्टींची चिंता करतात, भविष्याची चिंता करतात त्यामुळे प्रणय हि गोष्ट नगण्य वाटू लागते.


 

unsatisfied-sex-inmarathi
Huffingtonpost.com

अनेकदा मुलं बाळ झल्यावर जोडीदाराचा इंटरेस्ट बदलतो व तो मुलांचे संगोपन आणि भविष्य याचा चिंतेत गुंततो.

अश्यावेळी लोक घाबरतात कि त्यांच्यात काही कमतरता नाही राहिली ना?हीच भीती घेऊन ते लैंगिक विकार तज्ज्ञांची भेट घेतात.

६) विवाहबाह्य संबंधानंतर पुन्हा संबंध प्रस्थापित करता येतो का?

विवाहबाह्य संबंध त्यानंतर पुन्हा नातं जुळणं या गोष्टी खूप किचकट असतात. यात भावनिक भाग जास्त गुंतलेला असतो. तुमच्यातील दुरावा मिटवून पुन्हा नव्याने सुरुवात करणे अवघड असते. त्यात पण शरीर संबंध पुन्हा स्थापन करणे तर अग्निदिव्यच असतं.


अश्यावेळी त्रस्त होऊन लोक लैंगिक विकार तज्ज्ञाकडे येतात आणि असं प्रकरण त्या तज्ञाला सुद्धा शिताफीने सांभाळाव लागतं.

 

extramarital-inmarathi
indiamart.com

त्यांना एकमेकांना वेळ द्यायला सांगावा लागतो, जे झालं ते कटू आठवण म्हणून विसरन जायला सांगावं लागतं. परत एकदा कामुकता वाढवण्याला सांगितलं जातं.

यातून संबंध आजून दृढ होतात. पुन्हा प्रणय घडून येऊ शकतो. पण खूप संयमाने व संवेदनशिलतेणे अशी प्रकरण डॉक्टर्स ला सांभाळावी लागतात.

७) आम्ही आमचं लैंगिक आयुष्य जिवंत कसं ठेवू?


प्रत्येक चांगल्या गोष्टीप्रमाणे यासाठी देखील तुम्हाला काम करावं लागतं. हे सर्व अचानक होत नाहि. आधी एकमेकांना वेळ द्यावा लागतो. थोडं रोमँटिक पद्धतीने वावरावे लागतं.

 

sex-inmarathi
onlymyhealth.com

कायम एकमेकांना स्पर्श करत राहणे, एकमेकांना गोंजारणे सर्वात महत्वाचे म्हणजे ऍक्टिव्हपणे दोन्ही बाजूने सहभाग असला पाहिजे. उत्साह असला पाहिजे. बॉण्ड असला पाहिजे तर लैंगिक आयुष्य दीर्घायुषी होतं.

८) मी माझ्या लिंगाच्या व्यवहारावर पुनर्नियंत्रन कसं करू?

अनेक लोकांना लिंग उद्दीपणात त्रास होतो अथवा विफलता येते. अशी अवस्था असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरुण पानातील काही चुकांमुळे लिंगावरील नियंत्रण हरवंत आणि त्याचा परिणाम भविष्यात होतो.

ही समस्या घेऊन अनेक लोक लिंग विकार तज्ज्ञाकडे येत असतात.

आजारपण, दुर्बलतेमुळे जी स्थिती उदभवते. मानसिक रोगही याला कधी कधी जबाबदार असतात.

 

sex-problems-inmarathi
host.co.uk

जश्या प्रकारचं कारण त्या समस्येचं असेल तश्या प्रकारची ट्रीटमेंट डॉक्टर करत असतात. यासाठी रुग्णाला विश्वासात घेऊन काम करावे लागतं. त्यांना कारण समजावून सांगावं लागतं.

मग एकदा का त्यांचा विश्वास बसला आणि मनोधैर्य उंचावलं कि ट्रीटमेंट दिली जाते.

अश्याप्रकारे लैंगिक रोग तज्ञाला रुग्णाच्या शारीरिक समस्येबरोबर मानसिक स्थितीला समजून काम करावं लागतं. प्रसंगी मानसशास्त्रज्ञ होऊन कार्य करावं लागतं. तेव्हा कुठे लैंगिक विकारावर उपाय निघतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved. 
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?