सेक्सबद्दल हे गैरसमज तुमच्या मनात देखील आहेत का? हे गैरसमज दूर होणं आवश्यक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्याकडे असणाऱ्या खजुराहो लेण्या आणि कामसूत्र सारख्या प्रणयावरील सर्व माहिती देणाऱ्या ग्रंथांची समृध्द परंपरा आहे. तरी प्रणयाबद्दल असणाऱ्या गैरसमजांच्या बाबतीत आपण इतर देशांच्या तुलनेत बरेच पुढे आहोत. त्याची कारणे अनेक आहेत.

चुकीच्या लैंगिक समजुती, लैंगिक शिक्षणाचा अभाव, अर्धवट माहिती असलेल्या मित्र-मैत्रिणींकडून लैंगिक गोष्टींबद्दल माहिती घेणे आणि शेवटपर्यंत ती प्रमाण मानणे ही प्रमुख कारणे सांगता येतील.

चुकीच्या धारणा असल्यामुळे कित्येक लोक आज सेक्समधून मिळणाऱ्या आनंदाला मुकत आहेत. आपण काहीतरी मौल्यवान गोष्ट मिस करतोय हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते हे अजून खेदजनक !

 

khajuraho-lovemaking-inmarathi
fineartamerica.com

हे गैरसमज अनेकदा मोठ्या समस्येला कारणीभूत ठरतात. हे गैरसमज नुसते नुकसान करणारे नाहीत तर हास्यास्पद असतात. त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नसतो. फक्त ऐकीव माहितीवर लोक विश्वास ठेवत असतात.

असेच काही हास्यास्पद गैरसमज कोणते ते या लेखात पाहू.

१. संभोगाचा उद्देश केवळ संतती मिळवणे आणि वंश वाढवणे

सर्वात मोठा गैरसमज म्हणजे संभोगातून संतती मिळवणे आणि वंश वाढवणे याशिवाय दुसरा काहीच फायदा माहित नसणारे पुरुष भारतात सर्वात जास्त आहे.


वंश वाढवणे हे एक साध्य वगळता प्रणय नावाची गोष्ट त्यांना तितकी महत्वाची किंवा आनंद देणारी वाटत नाही.

घरातील मोकळीक नसणारे वातावरण, लहानपणापासून या विषयाबद्दल मौन बाळगून असणे, आई वडिलांकडून या विषयाबद्दल अश्लील, अनैतिक असल्याचा ठोकळेबाज विचार मनात बसवला जाणे अशी यामागची अनेक कारणे आहेत.

काही सुशिक्षित आईवडील आपल्या मुलांना वयात येताना या गोष्टींचा व्यवस्थित परिचय करून देतात. पण असे काही मोजके अपवाद वगळता या विषयावर बोलण्याची उदासीनता ठळकपणे दिसून येते.

 

sex-education-marathipizza00

 

२. अवयवांचा आकार

मोठी असलेली कोणतीही गोष्ट उत्तम असते अशी सगळ्यांची एक चुकीची धारणा आहे. त्यामुळेच प्रणयातील सुख हे अवयवांच्या मोठ्या किंवा लहान आकारावर अवलंबून असते हा एक अत्यंत चुकीचा समाज आपल्याकडे प्रचलित आहे.


शास्त्रीय दृष्ट्या योनिमार्गातील फक्त चार सेंटीमीटर म्हणजे एकुणापैकी फक्त एक तृतीयांश भाग हा स्त्रियांचे उद्दीपन करण्याचे काम करतो.

तो वगळता इतर भाग त्या दृष्टीने निरुपयोगी असतो. त्यामुळे पुरुषाच्या अवयवांचा आकार जास्त असायला हवा हा एक अनाकलनीय गैरसमज आहे.

 

penis-size-inmarathi
undesten.mn

३. काही खाद्यपदार्थांच्या सेवनाने आणि कामोत्तेजक साहित्याने उद्दीपन होते

अनेकदा असा समज असतो की चोकलेट, स्ट्रॉबेरीसारखे पदार्थ खाल्ल्याने लैंगिक उद्दिपानाचा वेग आणि तीव्रता वाढते. पण हाही अत्यंत चुकीचा समाज आहे. कुठलाही खाद्यपदार्थ कामोत्तेजक नसतो.


तसे असेल तर केवळ तो खाद्यपदार्थ खाल्ल्याने उद्दीपन व्हायला हवे. पण तसे होत नाही. त्यामुळे प्रचलित असणाऱ्या कामोत्तेजक पदार्थांचा आणि लैंगिक उद्दिपानाचा काहीही संबंध नाही.

 

Aphrodisiac-inmarathi
infospeak.org

४. सेक्सबद्दल पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त विचार करतात

हा एक खरंच हास्यास्पद असा गैरसमज आहे. सेक्सबद्दल विचार करणे या गोष्टीला आपल्याकडे एक अनैतिकतेची किनार आहे. त्यामुळे ते उघड मान्य करायला कुणीच धजत नाही.


आणि असा समाज आहे की प्रणयाबद्दल पुरुष स्त्रीयांपेक्षा जास्त विचार करत असतात. पण हे चूक आहे.

जितका विचार स्त्रिया सेक्सबद्दल करतात तितकाच पुरुष करतात. वयाच्या अठराव्या वर्षी हा विचार करण्याचे प्रमाण दोन्हींमध्ये सर्वात जास्त असते. तिशीनंतर साधारण हा विचार करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते.

प्रत्येक वेळी प्रणयासाठी पुरुष पुढाकार घेतो हा गैरसमज यातूनच आला असावा. स्त्री सुद्धा प्रणयासाठी पुढाकार घेत असते.


 

skeptic.com

५. प्रणयातील भावनोत्कटता

प्रणयाच्या सर्वोच्च क्षणी स्त्रीला हवे तसे भावानोत्कट करण्यात पुरुष असमर्थ ठरला तर तो नॉर्मल नाही, त्याच्यात काहीतरी कमी आहे असे मानण्याचा अत्यंत चुकीचा प्रघात आपल्याकडे आहे..

मुळात भावनोत्कट होण्याची आणि परमोच्च आनंदाची प्रत्येक स्त्रीची व्याख्या वेगळी असते. अनेक स्त्रीयांना आपण त्या आनंदाप्रत पोहोचलो आहोत हेच समजत नाही.


याच्यात असाधारण काहीच नाही. हे नैसर्गिक आहे. त्यामुळे जर तो क्षण अनुभवता आला नाही तर पुरुष असमर्थ आहे असे नसते. तो पूर्णपणे सामान्य असतो.

 

Foreplay-Holder-inmarathi
rebelcircus.com

६. सेक्स आणि नात्यातील अंतर 

ज्याअर्थी प्रणयाचा आनंद घेता येत नाहीये, दोघांनाही किंवा दोघांपैकी एकाला समाधान मिळत नाही त्याअर्थी आपल्या नात्यात काहीतरी गडबड आहे असा जवळपास सगळ्याच जोडप्यांचा समज असतो.


परंतु प्रणय ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. तुमचे नाते कितीही घट्ट असले तरी, प्रणय तेवढा उत्तम असेलच असे नाही.

पूर्णपणे समाधान देणाऱ्या प्रणयासाठी एकमेकांच्या शरीराला समजून घेणे, आपल्या जोडीदाराला कशाने जास्त आनंद मिळतो याचा अभ्यास असणे आणि नवनवीन गोष्टी करणे आवश्यक असते.या गोष्टी सरावाने आणि सततच्या शारीरिक संबंधाने आत्मसात करता येऊ शकतात.

 

couple-inmarathi
webcit.com.br

असे अनेक गैरसमज तज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर समोर आले आहेत. हे गैरसमज हास्यास्पद आहेत. गंभीर बाब ही आहे की याच्यामुळे कित्येक लोकांचे लैंगिक जीवन उध्वस्त होते.


आपण त्या बाबतीत कमी पडत असल्याची भावना इतर क्षेत्रात काम करताना, दैनंदिन कामकाजात सुद्धा समस्या निर्माण करते.

हा न्यूनगंड व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे यावर जागृती होणे आणि असे गैरसमज दूर होणे गरजेचे आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?