सेक्स करताना हमखास होणाऱ्या या सहा चुका प्रत्येकाने टाळल्याच पाहिजेत !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

प्रणय करताना चुकीचं आणि बरोबर असं काहीच नसतं. तो एक प्रकारचा जैविक संबंध असतो. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुमच्या शरीराला माहिती असतं की कश्याप्रकारे दुसऱ्या व्यक्तीला आकर्षित करायचं.

आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे जोडप्यांवर वेगवेगळी बंधन प्रेम करताना येतात.

 

sex-foreplay-inmarathi
lifecrust.com

 

आपल्या मनात रुजवलं जातं की प्रणय करणे ही गोष्टच मुळात वाईट आहे.

चुकीच्या लैंगिक धारणांमधून ही गृहीतके आलेली आहेत आणि त्यांचा आपल्या वैयक्तिक जीवनावर जबरदस्त पगडा आहे.


याच गोष्टी काही अशा चुकांना जन्म देतात, ज्या आपण प्रणयादरम्यान बहुतेकदा करतो. आणि त्याने आपले लैंगिक जीवन विस्कळीत होण्याची शक्यता असते.

अशा नेहमी होणार्या आणि टाळायलाच हव्यात अशा चुका कोणत्या, ते आपण पाहूयात..

१ ) संमती

कधी कधी आपल्याला आपल्या पार्टनर कडे बघितल्यावर वाटतं की आपल्या पार्टनरला प्रणय करायचा आहे. कधी कधी पार्टनरच्या हालचालींच वा शारीरिक बदलांचा चुकीचा अनुमान लावल्याने आपण जोडीदारावर जबरदस्ती प्रणय करायला जातो.

त्यासाठी आवश्यक संमती आपल्या त्याची नसते पण आपल्या घाईमुळे आपल्या पार्टनरला जबरदस्ती केल्यासारखं वाटतं.

 

concent-inmarathi
tamlyhoctoipham.com

त्यामुळे शारीरिक बदलांवरून अनुमान लावण्या ऐवजी त्याला/तिला विश्वासात घेऊन प्रेमळ भाषेत “हो” किंवा “नाही” च्या भाषेत विचारणा करा.

संमती असेल तरच पुढे व्हा नाहीतर थांबा. कारण यातून तुमचं जीवन व लैंगिक आयुष्य निरस होईल.

२ ) कामक्रीडेची घाई

आपल्या प्रणयादरम्यान चित्रपट अथवा पॉर्न फिल्ममध्ये बघितल्याप्रमाणे कामक्रीडा करण्यात येते अर्थातच तो प्रणयाचा अविभाज्य भाग आहे.

प्रणय करतांना नेहमी आपल्या पार्टनरला विश्वासात घ्या, त्याच्या/तिच्या सर्वांगाला गोंजारा, डोळ्यांत डोळे घाला.

 

foreplay-inmarathi
scoopwhoop.com

हे सर्व करताना नेहमी एक काळजी घ्या की तुमच्या पार्टनरचा क्रीडेदरम्यानचा रिस्पॉन्स नक्की टिपत रहा.

यातून तुम्हाला तुमच्या कामक्रीडेला किती मर्यादा असावी व प्रणयाला किती वेळ द्यायचा याचा अंदाज येईल.

३) जे अपेक्षित नाही ते टाळा

ओरल सेक्स ज्याला मुख प्रणय म्हणतात, हा सुद्धा कामक्रीडेचा भाग आहे. बऱ्याच लोकांना ह्या प्रकारे प्रणय संबंध प्रस्थापित करायला आवडतं देखील!

परंतु याबाबत जर तुम्ही पूर्णपणे परिपक्व असाल तरच होकार द्या नाहीतर याकडे जाऊ नका.

 

oral-inmarathi
artmajeur.com

बऱ्याचदा ओरल सेक्स साठी आपले अवयव हवे तसे स्वच्छ नसतात अथवा कधी कधी आपली तशी तयारी नसते त्यामुळे तो प्रकार टाळणे यथोचित ठरते.

प्रणय हा आनंद आहे. त्यात जबरदस्ती नसेल तर तो आतून खुलत जातो.

४) त्वचेला त्वचेचा स्पर्श करण्याआधी

प्रणय करताना आपल्याला कुठल्याच प्रकारची अडवणूक नको असते. परंतु हे करताना एक काळजी नक्की घ्या –

लैंगिक आजारांपासून बचाव करणारी प्रतिबंधक साधने जसे की कोन्डोम्स वापरायला विसरू नका.

 

condom-couple-inmarathi
avert.org

कारण जेव्हा बाह्य संबंध ठेवतो,

जेव्हा आपण अनोळखी व्यक्ती सोबत प्रणय करतो तेव्हा आपली अपेक्षा ही प्रणयाचा अविस्मरणीय अश्या आठवणी सोबत न्यायची असते, लैंगिक आजार नाही.

त्यामुळे बाह्य संबंध प्रस्थापित करतांना ही काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

५) मला प्रोटेक्शनची गरज नाही

जर तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल विश्वास नसेल तर तुम्ही प्रणयाआधी निरोध अथवा इतर गर्भधारणा रोखणाऱ्या यंत्राचा वापर केला पाहिजे.

तुम्ही ऐकलं असेल की वीर्याच्या आधी निघणाऱ्या पदार्थापासून देखील गर्भधारणा होऊ शकते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत निरोध वापरावं.

 

Condom-man-inmarathi
womensrepublic.net

बऱ्याचदा निरोध देखील पुर्णपणे खात्रीलायक नसतं पण तरीही ते वीर्यपतना आधीच प्रणय थांबण्याचा त्रासा पेक्षा बरं आहे. यामुळे आनंद पण उपभोगता येत असतो.

६) तिच्या मासिक पाळी दरम्यान प्रणय टाळा!

जर तुम्ही मासिक पाळी दरम्यान प्रणयाची इच्छा ठेवत असाल तर तुम्हाला स्वतःचा मानसिक इलाज करण्याची सख्त गरज आहे.

मासिक पाळीच्यादरम्यान प्रणय ही विकृती तर आहेच सोबत असंख्य इन्फेक्शनला आमंत्रण आहे.

 

menstruation-inmarathi

 

त्यामुळे प्रणय हा अत्यंत सुरक्षितरित्या मासिक पाळीचे दिवस वगळता करा. त्या काळात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा व तुमच्या पार्टनरला संपूर्णपणे आराम द्या.

तुमची प्रणय क्रीडा तुमच्या शारीरिक शक्ती अनुसारच असावी. जर त्यावर गेली त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होतात व शरीराला व्याधी जडतात त्यामुळे आपण आपली सीमारेषा निश्चित केलेली बरी ठरते.

तुमच्या शयनगृहातील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्या गोष्टीची गरज नाही ते टाळण्यातच भलाई आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *