‘मोदी’ची मिमिक्री करणे पडले महागात! लाफ्टर शो मधून कॉमेडीयनची घरवापसी

===

===

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रियालिटी शोमध्ये किती रियालिटी असते हे तर आता जगजाहीर आहे. तरीदेखील हे रियालिटी शोज खूप प्रसिद्ध होतात. त्यातच सर्वात जास्त जर कुठले रियालिटी हिट होत असतील तर ते म्हणजे कॉमेडी शोज. गेल्या काही वर्षांतच टीव्ही इंडस्ट्रीमध्ये या कॉमेडी शोजचं उत आलं आहे. जवळजवळ प्रत्येक चॅनेलवर एक ना एक कॉमेडी शो असतोच. याच कॉमेडी शोजमुले आपल्याला कपिल शर्मा, सुनील पाल, सुनील ग्रोवर, भारती सिंघ यांसारखे कॉमेडीयन मिळालेत. एवढच नाही तर यामुळे कित्येक कॉमेडी आर्टिस्टना काम देखील मिळू लागले.

InMarathi Android App

 

shyam_rangila-InMarathi01
bhaskar.com

प्रत्येक कॉमेडीयनची कॉमेडी करण्याची आपली एक स्टाईल असते आणि तो त्यासाठीचं ओळखला जातो. पण कधी कधी या कॉमेडीयन्सची प्रतिभाच त्यांच्या अंगलट येते. असचं काहीसं झालं आहे कॉमेडीयन श्याम रंगीला बरोबर.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची मिमिक्री करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कॉमेडीयन श्याम रंगीला याला नुकतेच  ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आले आहे. त्यासोबतच त्या एपिसोडमध्ये त्याने केलेली मिमिक्री ऑन एअर देखील दाखवली जाणार नाही.

===
===

 

shyam_rangila-InMarathi03
shyamrangeela.com

मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करता येणार नाही, तुला शोसाठी नवीन कंटेंट तयार करावा लागेल, असं श्यामला सांगण्यात आलं. कंटेंट तयार करण्यासाठी त्याला फारसा वेळही देण्यात आला नाही आणि अखेर त्याचं एलिमिनेशन करण्यात आलं.

या प्रकारामुळे २२ वर्षीय श्याम प्रचंड चिडला असून त्याने कार्यक्रमाच्या टीमवर नाराजी व्यक्त केली आहे.

‘मोदींची नक्कल करता येणार नाही, हे त्यांनी आधी सांगितलं होतं. सुरुवातीला राहुल गांधींची फिरकी घेतल्यास चॅनेलची हरकत नव्हती. मात्र अचानक त्यांनी राहुल किंवा मोदी, यापैकी कुणाचीही मिमिक्री करता येणार नाही, असे सांगितले. मी पंतप्रधानांना शिव्या तर घातल्या नव्हत्या ना. मी तर फक्त मिमिक्रीच केली. मग त्यात काय एवढ वावगं?’

असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तसेच..

‘मी मोदींची नक्कल करण्यात पटाईत असल्याचं त्यांना माहित होतं. मग त्यांनी मला शोमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रणच का दिलं.’

असेही तो म्हणाला…

 

shyam_rangila-InMarathi
intoday.in

प्रसिद्ध कॉमेडियन आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ च्या पहिल्या सीजनचा विजेता ठरलेला सुनील पाल यांने श्याम रंगीलाची बाजू उचलून धरली. यासंबंधी पाल म्हणाला की…

‘नेत्यांची मिमिक्री करण्यात काहीच हरकत नाही, फक्त तो निखळ विनोद असायला हवा.’

‘मी नाना पाटेकर, इरफान खान यांसारख्या अनेक अभिनेत्यांची मिमिक्री केली आहे, पण कोणी कधीच आक्षेप घेतला नाही.’ असेही त्याने सांगितले. ‘चॅनेलने हा एपिसोड दाखवायला हवा होता. मला खात्री आहे मोदींना यावर कुठलाही आक्षेप नसता. मोदींविषयी त्याने कोणताही अपशब्द काढला नाही, की त्यांना काही वाईटही बोलला नाही’ असे स्पष्टीकरणं सुनील पालने दिले.

 

shyam_rangila-InMarathi02
indiatimes.com

राजस्थानचा रहिवासी असलेला श्याम रंगीला हा एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यातल्या रायसिंहनगरमधील मोहकमवाला गावात तो लहानाचा मोठा झाला. २००४ साली शाळेतूनच त्याने मिमिक्रीला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्याला कॉमेडियन होण्याची इच्छा होती. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी त्याने मिमिक्री करणं सुरु केलं. पण त्याच्या स्वप्नाला मोदी नावाने जणू ग्रहणचं लावले आणि त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखल्या गेलं.

 

shyam_rangila-InMarathi05
bhaskar.com
===
===

श्याम रंगीलाचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे. ज्यावर त्याचे जवळपास ३० हजार फॉलोवर्स आहेत. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ मधून एलिमिनेट झाल्यानंतरही त्याच्या प्रसिद्धीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाहीये. त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत.

कुठल्याही कलाकाराला त्याची कला स्वतंत्रपणे सादर करण्याचा हक्क आहे. जर तो कलाकार त्याच्या मर्यादा न ओलांडता त्याच्या कलेच सादरीकरण करतो आहे तर त्यात चुकीचं असं काहीच नाही. अश्या शोजमध्ये राजकारण्यांची मिमिक्री करणे हे काही नवीन नाही. मग केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केली म्हणून एखाद्या कलाकाराला अशी वागणूक देणे हे कितपत योग्य आहे..?

तरी यावर ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शो तर्फे कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेलं नाही…

श्याम ने केलेली मोदींची मिमिक्री इथे पाहू शकता :

 

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *