' चंद्रावर लवकरच होणार आहे माणसांना राहण्यासाठी कॉलनी ! – InMarathi

चंद्रावर लवकरच होणार आहे माणसांना राहण्यासाठी कॉलनी !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आज विज्ञान खूप पुढे गेलेले आहेत, ज्या गोष्टींचा कधी मानव विचार देखील करू शकत नव्हता अशा गोष्टींचा वापर तो आज करत आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या विचार शक्तीच्या पलीकडे आहेत. संशोधकांमुळे मानवी जीवनाला एक वेगळे वळण मिळाले आहे. संशोधनाने पृथ्वीवरच नाही तर अंतराळात देखील आश्चर्यकारक शोध लावलेले आहेत.

 

Colonies and humans will cultivate on the moon.Inmarathi
bigthink.com

जिथे अजून एक अंटार्क्टिक ग्लेशियर विरघळल्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना चिंता निर्माण झाली आहे, तिथेच दुसरीकडे जमिनीची कमतरता होत असल्यामुळे आपल्या पृथ्वीचे भविष्य धोक्यात आहे. असे म्हटले जात आहे की, ग्लेशियर विरघळल्यामुळे जगभरातील समुद्रांच्या पाण्याची पातळी वाढेल आणि कितीतरी उपमहाद्वीप बुडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेमुळे जिथे पृथ्वीची त्रिज्या कमी होत आहे, तिथेच शास्त्रज्ञ याच्यावर उपाय शोधायला लागले आहेत. असा दावा केला जात आहे की, येणाऱ्या २०३० वर्षापर्यंत चंद्र आणि मंगळ यांसारख्या ग्रहांवर कॉलनी तयार करण्यात येईल. जिथे मनुष्य आपले घर बसवू शकतील.

चंद्रावर होणार कॉलनीचे निर्माण

प्रदूषण, पाणी, रस्ता, आणि एक चांगले घर शोधणे या कितीतरी लोकांच्या आज समस्या बनलेल्या आहेत. आपण नेहमीच अशाप्रकारच्या कोणत्या ना कोणत्या समस्यांनी वेढलेले असतो. मिडियाच्या बातम्यांनुसार, जपानचे पहिले अंतराळातील प्रवासी ६६ वर्षीय चिआकी मुकाईचे मानले तर, त्यांच्यानुसार पृथ्वीवर या समस्या अजून काही दिवसच राहणार आहेत.

 

Colonies and humans will cultivate on the moon.Inmarathi1
wikimedia.org

जवळपास ५०० तासांपेक्षा जास्त काळ अंतराळामध्ये घालवलेल्या चिआकी मुकाई अंतराळामध्ये कॉलनी बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. तीस सदस्य असलेली ही टीम टोक्यो युनिव्हर्सिटी ऑफ सायन्सच्या हाय – टेक लॅबमध्ये या दिवसांमध्ये या गोष्टींवर अभ्यास करत आहेत की, शेवटी भविष्यात मनुष्याला चंद्र आणि मंगळावर कसे जिवंत ठेवले जाऊ शकते. एवढेच नाही तर मुकाई भविष्यात अंतराळात एक कॉलनी तयार करण्यावर देखील काम करत आहे.

मुकाईचे यांचे म्हणणे आहे की, “आपल्या सर्वांसाठी आता पृथ्वी ही लहान पडत चालली आहे, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या अशा ग्रहाला शोधणे गरजेचे आहे, जिथे मनुष्य सहजपणे राहू शकतो. त्यांनी सांगितले की, अंतराळामध्ये जीवन शोधण्याचे काम आता खूप प्रगतीपथावर चालू झाले आहे आणि एका वेगळ्या पातळीवर पोहोचले आहे.”

 

Colonies and humans will cultivate on the moon.Inmarathi2
comicbookl.com

अंतराळामध्ये जेवण बनवणे आणि शेती तयार करण्याच्या पद्धतीवर जोर

मुकाई यांनी दावा केला आहे की, २०३० या वर्षापर्यंत चंद्रावर कॉलनी स्थापन करण्यात येईल. त्याच बरोबरच असलेली दुसरी टीम अंतराळात जेवण बनवणे आणि धान्य निर्माण करण्याच्या नवनवीन पद्धतींवर जोर देत आहे. त्यांनी सांगितले आहे की, या प्रक्रियेसाठी एका खाऱ्या सोल्युशनमध्ये हाय व्होल्टेज वीज सप्लाय करून तरल प्लाज्मा तयार करण्यात येईल, ज्याचा उपयोग खाण्याच्या गोष्टी तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

कॉलनीमध्ये लागणार हा खास प्रकारचा सेन्सर

मुकाई यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या संशोधकांनी थर्माइलेक्ट्रिक सेन्सरचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी एक खास सिस्टम तयार केली आहे. या सिस्टमचा आकार एका आयपॉड नॅनोसारखा असेल. त्यांनी हे देखील सांगितले आहे की, या सेन्सरला या कॉलनीमध्ये एकदम सहजपणे लावण्यात येईल.

 

Colonies and humans will cultivate on the moon.Inmarathi3
tmgrup.com.

त्यांनी सांगितले आहे की, संपूर्ण अंतराळातील कॉलनीमध्ये गरजेच्या हिशोबानेच कॉलनी बनवण्यात येईल, अंतराळात माणसाला स्थायिक करण्यात येऊ शकेल आणि तिथे सहजपणे धान्य उत्पन्न करता येईल, यासाठी संशोधक खाद्य उत्पादनाच्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहेत. ज्यामध्ये मातीची गरज नसेल.

यावरुन हे समजत आहे की, लवकरच आपल्याला अंतराळामध्ये देखील राहण्याची संधी मिळू शकते आणि मनुष्य आपले वेगळे साम्राज्य तिकडे निर्माण करू शकतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?