जेव्हा Coldplay बॅन्ड गातो ‘वंदे मातरम’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===कोल्डप्ले हा जगभरात नावाजलेला बॅन्ड ! त्यांच्या प्रत्येक गाण्याला युट्युबवर करोडो व्ह्यूज मिळतात. संपूर्ण जगभरातील तरुणाईमध्ये कोल्डप्लेची इतकी जबरदस्त क्रेझ आहे की त्यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून त्यांचे चाहते अक्षरक्ष: एकमेकांवर उड्या घेतात. याच कोल्डप्ले बॅन्डचं कॉन्सर्ट भारतामध्ये आणि ते देखील मुंबईमध्ये होणार म्हटल्यावर मुंबईकर कोल्डप्ले चाहत्यांचा नुसता दंगा सुरु झाला. सुमारे महिनाभर हा कोल्डप्ले चा फिवर पहायला मिळाला आणि अखेर तो क्षण आला जेव्हा कोल्डप्लेचे बेधुंद स्वर मुंबईच्या गारव्यात मिसळले आणि जल्लोषाला उधान आलं !!

ग्लोबल सिटीझन इंडिया इनीशीएटीव्ह २०१६ अंतर्गत कोल्डप्ले बॅन्डने भारतात येण्याचे आमंत्रण स्वीकारले. मुंबईच्या MMRDS ग्राउंडवर सुमारे एक तास कोल्डप्लेचा परफॉर्मन्स सुरु होता आणि दर्शक भान हरपून त्याचा आस्वाद घेत होते. पण आश्चर्यचकित करून टाकणारा क्षण तर तेव्हा आला जेव्हा कोल्डप्ले बॅन्डच्या ख्रिस मार्टिनने संगीतकार ए.आर.रेहमानच्या साथीने ‘वंदे मातरम’ चे सुरु आळवले.

प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेल्या एका विदेशी गायकाने आपल्या सुमधुर साथीने भारतमातेला वाहिलेली ही सुरमयी श्रद्धांजली डोळ्याचं आणि कानांचं देखील पारण फेडणारी ठरली. ख्रिस मार्टिनच्या प्रत्येक सुराच्या साथीने कॉन्सर्टला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर उमटणारा अभिमान ठळकपणे दिसत होता.

coldplay-sing-vande-mataram-marathipizza01

स्रोत

ख्रिस मार्टिनने त्याला लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आभार मानले आणि भारतामध्ये येऊन माझी कला सादर करण्याचं स्वप्न पूर्ण झालं असं देखील तो म्हणाला. या कॉन्सर्टला बड्या बड्या बॉलीवूड हस्तींनी देखील उपस्थिती लावली होती. चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील कॉन्सर्टला हजेरी लावणार होते, पण वेळेअभावी त्यांनी अखेर व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

 ===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?