' १२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग! – InMarathi

१२ वी मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवून देखील या तरुणाने निवडलाय अध्यात्माचा मार्ग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जर तुम्हाला बारावीच्या बोर्डात ९९.९ टक्के मिळाले असते, तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असती? नक्कीच तुम्ही आनंदाने वेडे झाला असता, नाही का? देशातील कोणत्याही महाविद्यालयात शिकण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण झाले असते आणि तुमच्यासाठी देशा-परदेशात नोकरीच्या विविध संधी देखील उपलब्ध झाल्या असत्या. परंतु मनुष्य होण्याची सुंदरता ही आहे की, प्रत्येक माणसाची विचार करण्याची क्षमता वेगवेगळी असते.

एवढे गुण मिळाल्यानंतर सामान्य मनुष्य आपले करियर घडवण्यासाठी अजून सतर्क झाला असता, परंतु ९९.९ टक्के गुण मिळवणारा युवक सामान्य कसा असू शकेल? अहमदाबादच्या अश्याच एका असामान्य तरुणाने जगाच्या मोहमायेपेक्षा वेगळा असा मार्ग  निवडला आहे, त्याचा तो मार्ग ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

 

varshil-shaha-marathipizza01

 

जेव्हा १२ वी चे निकाल घोषित करण्यात आले, तेव्हा वर्शील जिगरभाई शाह राज्यातील सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्यांमध्ये होता, पण वर्शीलच्या घरातील वातावरण एकदम सामान्य होते. कारण, या १७ वर्षाच्या तरुणाने सीए किंवा डॉक्टर बनण्याचे नाही तर एक जैन मुनी बनण्याचे ठरवले आहे.

वर्शीलने सुरत मध्ये शेकडो जैन मुनींच्या उपस्थितीत नुकतीच दीक्षा घेतली आहे. वर्शीलने सांगितले की,

त्याचे गुरु कल्याण रत्नाविजयसुरी महाराजांनी त्याला या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा दिली आहे. जेव्हा तो त्याच्या गुरूच्या सहवासात वेळ घालवतो तेव्हा समकालीन मुद्द्यांवर त्यांचे असणारे विचार आणि जैन धर्माच्या प्रासंगिकतेबद्दल त्यांचाकडून ऐकतो तेव्हा माझा मुनी बनण्याचा निश्चय अजूनच पक्का होतो.

वर्शील असेही म्हणतो की, जगातील कोट्यावधी लोक आनंद मिळवण्यासाठी भौतिक वस्तूंचा आधार घेतात, परंतु ते तुम्हाला तुमच्या जीवनात खरा आनंद देऊ शकत नाहीत. वर्शीलचे गुरु आता ३२ वर्षांचे झाले आहेत, पण त्यांनी दीक्षा वर्शीलच्या वयाचे असतानाच घेतली होती.
वर्शीलची लहानपणापासूनच धार्मिक घडामोडींकडे खूपच ओढ होती.

 

varshil-shaha-marathipizza02

 

यावर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण  वर्शील जेव्हा चार वर्षाचा होता तेव्हाच त्याने ठरवले होते की, तो मोठा झाल्यावर जैन मुनी होईल. नवकर पब्लिक शाळेत शिकणाऱ्या वर्शीलच्या काकांनी सांगितले की,

वर्शीलला मिळालेल्या आश्चर्यकारक गुणांचे त्याला अप्रूप नाही. त्याला ह्या गुणांची काहीच पर्वा नाही, त्याने अजून शाळेतून आपली गुणपत्रिका देखील आणलेली नाही.

===

===

विशेष गोष्ट तर ही आहे की, वर्शीलच्या आई-वडिलांचा त्याच्या या निर्णयाला पाठींबा आहे. वर्शील आणि त्याच्या कुटुंबातील लोक ध्यान केंद्रित करण्याच्या क्षमतेसाठी जैन धर्माच्या अनुयायांना श्रेय देतात. वर्शीलचे वडील जिगरभाई आयकर विभागात अधिकारी आहेत. त्याची मोठी बहिण आणि आई अमिबेन शाह सकट पूर्ण कुटुंब पूर्वीपासून जैन धर्माच्या शिक्षेचे पालन करते आहे.

 

Muni-marathipizza

 

कोणालाही नुकसान न करता जगात शांततेचा शोध घेणे, हा वर्शीलचा हेतू आहे. वर्शीलचे म्हणणे आहे की, कोणत्याही व्यवसायाच्या आणि नोकरीच्या माध्यमातून तो आपला हेतू साध्य करू शकत नाही. त्यामुळे त्याने जैन मुनींचा मार्ग स्वीकारला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये हा दीक्षा समारंभ नुकताच पार पडला. येथे जैन आचार्य कल्याणवर्तनाविजय आणि विजयनरचंद्रसुरी यांनी भाग घेऊन वर्शीलला आशिर्वाद दिला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?