या खाद्यपदार्थांची सवय लावा आणि सिगारेटला ‘रामराम’ करा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सिगारेटचं व्यसन खूप वाईट! एकदा लागलं की ते सुटायचं नावचं घेत नाही. मग एकदा का त्याचे दुष्परिणाम दिसू लागले की कुठून कुठून काय काय शक्कल शोधून सिगारेट सोडायचे आपले प्रयत्न सुरु होतात. पण बहुतेक वेळा हे प्रयत्न देखील अपुरे पडतात आणि पुन्हा तेच ‘ये रे माझ्या मागल्या’!

तुम्ही देखील असे अनेक प्रयत्न करून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला जी हटके गोष्ट सांगणार आहोत ती करून बघा आणि आम्हाला खात्री आहे की त्याचा नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.

एका संशोधनातून ही हटके गोष्ट सिद्ध झाली आहे ती गोष्ट म्हणजे- रोजच्या दैनंदिन खाद्यपदार्थांच्या सेवनाने देखील सिगारेट सुटू शकते. काय?

आहे की नाही एकदम मस्त बातमी! म्हणजे आता उगाच बाहेरचे प्रयत्न नको आणि त्यात पैसा घालवायला देखील नको.

मोसंबीचा रस

 

mosambi-juice-marathipizza

स्रोत

सिगारेटमुळे शरीरातील व्हिटॅमिन ‘सी’वर परिणाम होतो. याची भरपाई निकोटिन करू लागतो. अशा वेळी जर सिगारेटपासून लवकर सुटका मिळवू इच्छित असणार्‍यांना मोसंबीचा रस किंवा रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन केले पाहिजे.

या कामामध्ये लिंबू, डाळिंब मदत करू शकतात.

च्युइंगम

 

chewing-gum_-marathipizza

स्रोत

सिगारेटच्या तलफीवर शुगर फ्री च्युइंगम एक चांगला पर्याय ठरू शकतो.

 

दूध

milk-marathipizza

स्रोत

दुधाला आपण एका पौष्टिक पदार्थाच्या रूपात ओळखतो. दुधापासून शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्त्वे मिळतात. दूध आपल्या या सवयीला सोडण्यात मदत करील.

ड्युक्स विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार सिगारेट ओढण्यापूर्वी एक ग्लास दूध घेतले तर आपल्याला सिगारेट घेण्यास आनंद येणार नाही. कारण याचा धूर कडू लागेल.

एकदा हे करून पाहा. सिगारेटला दुधाच्या ग्लासमध्ये बुडवून घ्या, नंतर सुकवून तीच सिगारेट ओढा. तिचा धूर इतका कडू लागेल की दुसरा झुरका घेण्याची इच्छाच होणार नाही. या प्रयोगानंतर कोणीही सिगारेटला नको म्हणेल.

 

चविष्ट खाद्यपदार्थ

Korean-Ginseng-marathipizza

स्रोत

आपल्याला सिगारेटची तलफ लागेल तेव्हा चविष्ट पदार्थ नाही तर चिमूटभर मीठ चाटून पाहा. तलफ नाहीशी होईल.

जिनसेंग- ही चिनी जडी-बुटी फक्त वजन कमी करण्यासाठीच उपयोगी नाही, तर निकोटिनद्वारे शरीरात जाणार्‍या डोपामाइनच्या प्रभावालासुद्धा कमी करण्यास मदत करते, पण याचे नियमित सेवनही नुकसानदायक ठरू शकते. महिन्यात तीन किंवा चार वेळेस घेऊ शकता.

.
भाज्या

vegetables-marathipizza

स्रोत

दुधाप्रमाणेच गाजर, दोडका, काकडी आणि वांगे खाल्ल्यानंतर सिगारेट पिण्याची इच्छा होत नाही. तज्ज्ञांच्या मते, या भाज्यांची जास्त मात्रा निकोटिनवर प्रभाव टाकते.

सिगारेट सोडण्याच्या अभियानापासून वटाणे आणि मक्यासारख्या भाज्यांना दूरच ठेवले पाहिजे. या भाज्यांत असणारी शर्करा याची तलफ जास्त वाढवू शकते.

आता जर आपल्याला सिगारेट पिण्याची तलफ लागली तर एक गाजर खा, नाही तर पालक खा. या भाज्यासुद्धा आपली सिगारेट पिण्याची इच्छा दूर करू शकतात.

पण एक गोष्ट मात्र नक्की, जर तुम्हाला खरोखरच सिगारेट सोडायची असेल तर प्रबळ इच्छाशक्ती असणे देखील गरजेचे आहे. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?