' ‘डॉलरचं’ वर्चस्व कमी व्हावं म्हणून चीनची ही नवी ‘खेळी’ बदलू शकेल जगाची आर्थिक गणितं – InMarathi

‘डॉलरचं’ वर्चस्व कमी व्हावं म्हणून चीनची ही नवी ‘खेळी’ बदलू शकेल जगाची आर्थिक गणितं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चीनमधून सगळीकडेच पसरलेला कोरोना व्हायरस संपूर्ण जगात ठाण मांडून बसला आहे! देश लॉकडाऊन अवस्थेत आहेत!

त्यामुळे कित्येक मोठमोठ्या देशांसामोर एक प्रचंड आर्थिक संकट उभं राहिलं आहे! व्हायरस घालवण्यासाठी तज्ञ औषध शोधतच आहेत पण या कोलमाडणाऱ्या अर्थव्यवस्थेला औषध मिळणं कठीण आहे!

कित्येक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत, नव्याने चालू झालेले बिझनेस पुन्हा शून्यावर आले आहेत, कित्येक लोकं अर्ध्या पगारावर काम करत आहेत, छोटे लघुउद्योग तर डबघाइलाच आले आहेत!

एकंदरच कोरोनामुळे उद्भवलेलं हे आर्थिक संकट कमी होण्या ऐवजी आणखीनच बिकट होत जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे!

 

china corona inmarathi
the economic times

 

कोविडच्या या महामारीच्या काळात डॉलरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी चीन डिजिटल करन्सीच्या चाचण्या घेतंय.

डिजिटल चलनाची ओळख ही चायनाची अमेरिकन डॉलरला मात देण्याची एक नवी खेळी आहे.

आणि डॉलरच्य सेटलमेंटला पर्याय म्हणून गुंतवणुकदार आणि व्यवसाय यांना पर्याय उपलब्ध करून देते.

कोविड -१९ च्या दरम्यानच चीनने आपल्या या डिजिटल चलनाला आपल्या चार महत्त्वाच्या शहरांत ट्रायल बेसिसवर आणलेले आहे.

सगळं जग कोरोनाशी सामना करण्यात गुंतलेलं असताना,

तिकडे चायना मात्र आपल्या चार शहरांतून डिजिटल चलनाची चाचणी घेऊन जगभरातल्या चलनांवर मात करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे दिसून येत आहे.

चीनने आपल्या चार मोठ्या शहरांमध्ये नवीन डिजिटल चलन चालवणे सुरू केले आहे आणि असे करणारे ते पहिले राष्ट्र बनले आहे.

 

china digital currency
technode

 

शेन्झेन, सुझोऊ, चेंगडु आणि झिऑन्गन या आपल्या चार शहरांमध्ये आणि २०२२ च्या बिजिंग हिवाळी ऑलिंपिकमधील काही स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या भागांमध्ये या देशाने चाचण्या सुरू केल्याची माहिती आहे.

पैकी शेन्झेन, सुझोऊ आणि चेंगडू या तीन शहरांची लोकसंख्या जवळपास ३८ दशलक्ष इतकी आहे. झिओनगँगचा न्यू एरिया हा एक जिल्हा व आर्थिक विभाग आहे जो बिजींगजवळ विकसित केला जात आहे.

शहरांच्या आर्थिक प्रणालीमध्ये ही डिजिटल चलन औपचारिकपणे स्वीकारलेही गेले आहे.

अशी माहिती चीनच्या दैनिक वृत्तवाहिनीने प्रसिद्धीस दिली आहे.

E-RMB या नावाने ओळखले जाणारे हे डिजिटल चलन एप्रिल महिन्यातील काही सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक नोकरांना पगार देण्यासाठी वापरले जाईल.

डिजिटल चलनाचा उपयोग सुझहूमधील वाहतुकीस अनुदान देण्यासाठी केला जाईल.

परंतु झिओनगँग इथल्या चाचणीमध्ये प्रामुख्याने अन्न आणि किरकोळ वस्तूंवर डिजिटल चलनाचे लक्ष्य केंद्रित केले जाईल असे द गार्डियन’ या अंकाने सांगितले आहे.

या व्यतिरिक्त ग्लोबल गव्हर्नमेंट फोरम या ऑनलाईन पोर्टलने सांगितले की,

झॅकॉनच्या नवीन भागात डिजिटल युआनची चाचणी घेण्यासाठी मॅकडोनाल्ड्स, स्टारबक्स आणि सबवेसह १९ किरकोळ विक्रेत्यांना आमंत्रित केले गेले आहे.

 

digital yuann inmarathi
asiatimes

 

तथापि, त्यानंतर स्टारबक्सने सहभागी व्हायला नकार दिला आहे.

चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, पीपल्स बँक ऑफ चायना (पीबीओसी)च्या निवेदनात असे म्हटले आहे की सध्यातरी डिजिटल चलन हे सार्वजनिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात दिले जाणार नाही.

आणि चलनवाढीचा दुष्परीणाम होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी या चलनाचा विस्तृत वापर करण्यापूर्वी त्याची कार्यक्षमता ऑप्टीमाईझ करून ती सुधारित करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

चीनच्या या डिजिटल चलनाच्या खेळीला डॉलरच्या आक्रमकतेला रोखण्यासाठीची चीनी हालचाल समजली जाते.

आणि गुंतवणुकदार व व्यवसायिक यांना डॉलरच्या सेटलमेंटला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

कोरोनाची सुरूवात चीनमध्ये होऊन नंतर त्याने जगभरातील ३ दश लक्षांहून अधिक लोकांना बाधित केल्यानंतर जगभरातील आर्थिक घडामोडींना चीनच्या कोरोनाने अडचणीत आणले आहे.

या महामारीनंतर जगभरात भयानक मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत.

एक सार्वभौम डिजिटल चलन हे डॉलर सेटलमेंट सिस्टमला एक कार्यक्षम पर्याय देऊ शकते!

 

dollar yuan inmarathi
ledger insights

 

आणि देश किंवा कंपनी या दोन्ही स्तरावर कोणत्याही प्रकारची मंजुरी किंवा वगळले जाण्याचा धोका याचा परिणाम कमी करू शकते.

यामुळे राजकीयदृष्ट्या प्रेरीत व्यत्यय कमी होऊन जागतिक स्तरावर व्यापार केलेल्या चलन बाजारात समाकलन सुलभ होऊ शकते.

कोविड-१९ दरम्यानच्या काळात देखील चिनी युआनचे मार्केटमधील स्थान टिकून होते. त्यामुळे बऱ्याच गुंतवणुकदारांचा सध्या युआनवर विश्वास आहे.

युएस डॉलर्स आणि चायना डिजिटल सिस्टम या दोन्ही सिस्टम्स समांतरपणे कार्य करू शकतील.

आवश्यकता भासल्यास परस्पर आधाराने देखील कार्य बजावू शकतील असे एका चीनी दैनिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभिप्रायात म्हटले आहे.

विकेंद्रीकृत क्रिप्टोकरन्सीज, जसे की बिटकॉइन ही वापरकर्त्यांना कोणत्याही केंद्रिय प्राधिकरणासह किंवा तृतीय पक्षाच्या गुंतवणुकीसह मूल्य हस्तांतरीत करण्यास परवानगी देतात.

 

bitcoin inmrathi
the currency analytics

 

मात्र डिजिटल चलनाचे समर्थन करण्यासाठी सरकार हे चलन मध्यवर्ती बँकेच्या केंद्रियकृत यंत्रणेत ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याचे रोख मूल्य हे स्थिर असेल असे ‘चायना डेली’ने आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे.

जूनमध्येच या डिजिटल चलनाच्या प्रगतीबाबत फेसबूकने केलेल्या घोषणेवरून या चलनाला उत्तेजन मिळाले होते.

पीबीओसी बँक ही या डिजिटल युआनची एकमेव जारीकर्ता असेल. सुरुवातीला वाणिज्य बँक आणि इतर ऑपरेटर्सना डिजिटल पैशांची ऑफर दिली जाईल.

चायना डेलीने दिलेल्या बातमीनुसार सर्वसामान्य जनता त्यांच्या बँकेतल्या ठेवी डिजिटल चलनात रुपांतरित करू शकतील. आणि त्यांच्या ठेवी या इलेक्ट्रॉनिक वॉलेटद्वारे काढण्यास सक्षम असेल.

एका अहवालानुसार, हे तंत्रज्ञान इंटरनेट कनेक्शनशिवाय डिजिटल चलनाची देवाणघेवाण करण्यास वापरता येईल आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट करण्यासाठीही वापरले जाऊ शकते.

परंतु असे असले, तरी अद्याप तिथल्या गव्हर्नमेंटने या डिजिटल चलनाच्या सार्वजनिक वापरासाठीची निश्चित वेळ अजून दिलेली नाही.

परंतु अनेक स्थानिक वृत्तपत्रांच्या सांगण्यानुसार २०२१ च्या मध्यापर्यंत हे लॉन्च झालेलं असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?