….आणि चीनने अख्खं मंदिर उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येक धर्मातील लोकांचे कोणते ना कोणते एक पवित्र स्थान असते आणि त्या धर्मातील लोकांमध्ये त्याच्याबद्दल एक आदराची आणि श्रद्धेची भावना असते. हिंदुचे मंदिर, ख्रिश्चन लोकांचे चर्च आणि मुस्लिम लोकांचे मस्जिद अशी वेगवेगळी देवस्थाने प्रत्येक धर्माची असतात. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माची देखील अशीच महत्त्वाची काही मंदिरे आहेत.

चीनमध्ये बौद्ध धर्माचे लोक राहतात, हे आपल्याला माहित असेलच. त्यांच्यासाठी त्यांची ही मंदिरे त्यांचे देवाचे स्मरण करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.

चीन हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे चीनला खूप समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील चीनचे सरकार नेहमी त्यावर योग्य त्या उपाययोजना करत आहे.

 

shanghai temple transfer.marathipizza

 

आता जर आम्ही तुम्हाला सांगितले की, चीनमध्ये या लोकसंख्येच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील एक मंदिरच त्या जागेवरून हटवून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेले आहे…तर तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे ?

पण आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या पुढे काहीही अशक्य राहिलेले नाही. तुम्ही डिस्कवरी चॅनेल पाहत असल्यास, तुम्ही कधी तरी पाहिले असेल की, त्यामध्ये एखादे घर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अलगद उचलून ठेवले जाते. चला तर मग जाणून घेऊया चीनने हे कसे घडवून आणले!

 

shanghai temple transfer.marathipizza1

 

शांघाईच्या काही कामगारांनी हे ऐतिहासिक काम करून दाखवले आहे.

चीनमधील शांघाई येथे २००० टन वजन असलेल्या एका ९९ वर्ष जुन्या मठाला ते असलेल्या ठिकाणावरून उत्तरेला ३०.६६ मीटर म्हणजेच १०० फुट लांब हलवण्यात आले आहे. या योजनेप्रमाणे हा मंदिराचा भाग दरदिवशी २० फुट हलवण्यात आला आणि हळूहळू उत्तरे कडे नेण्यात आला.

शांघाईमध्ये असलेल्या जेड बुद्ध मंदिराचा द ग्रँड हॉल आपल्या एका जागेवरून दुसरीकडे हलवण्यात आला. वाढत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे हे पाऊल उचलणे त्यांना भाग पडले. हे मंदिर मध्य शांघाईमधील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे.

 

shanghai temple transfer.marathipizza3

 

डेली मेलच्या वृत्तानुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीला हे काम करण्यात आले आहे. २०१४ मध्ये सुरू झालेल्या नुतनीकरण प्रकल्पाच्या अंतर्गत हे काम करण्यात आलेले आहे. एवढ्या मोठ्या वास्तूला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिथे परत प्रस्थापित करणे, हे एक खूपच मोठे कार्य आहे.

या हॉलमध्ये मोठमोठ्या मूर्ती देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. गर्दीमुळे या मंदिराच्या ठिकाणी समस्या निर्माण होतात, म्हणून या हॉलला हटवण्यात आलेले आहे. ४० हायड्रॉलिक जॅक आणि १० ट्रॅक्सच्या मदतीने या हॉलला आपल्या जागेवरून हटवण्यात आलेले आहे.

सप्टेंबरला काम सुखरूप व्हावे ह्यासाठी  बौद्ध प्रार्थना करून कामाची सुरुवात करण्यात आली.

 

shanghai temple transfer.marathipizza2

 

असे म्हटले जाते की, या मंदिरातील बुद्धांच्या मुर्त्या १८८२ मध्ये म्यानमारमधून बनवून आणलेल्या होत्या. त्याचबरोबर इतर ३ मूर्ती देखील आणण्यात आलेल्या होत्या. हे मंदिर चीनमधील जुने असल्याने खूप लोकांची श्रद्धा या मंदिराशी जोडलेली आहे. हे मंदिर अचानक या जागेवरून हलवल्याने येथील लोक थोडी नाराजी व्यक्त करत आहेत.

 

shanghai temple transfer.marathipizza4

 

जगात असे पहिल्यांदाच झाले आहे की, वाढत्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी एखाद्या मंदिराच्या एवढ्या मोठ्या भागाला एका ठिकाणावरून हलवून दुसरीकडे प्रस्थापित केले गेले आहे.

उत्सुकता असेल तर ह्या कामाची व्हिडियो तुम्ही येथे पाहू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?