हे फोटो आपल्याला दाखवून देतात की यशस्वी लोक मुळात तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नुकताच बाल दिन होऊन गेला आणि सर्व जण आपापले लहानपणीचे फोटोज सोशल मेडियावर पोस्ट करताना दिसत आहेत. तर आम्ही आपल्या मनात घर करून राहिलेल्या व्यक्तीचे काही फोटोज मिळवले आणि ते तुम्हाला दाखवावेसे वाटले.

तुम्ही असा कधी विचार केला आहे का, की हे लोक लहानपणी कसे असतील किवा कसे दिसत असतील. आता आमच्याकडे त्यांचे काही फोटोज आहेत ते पहा आणि बघा ओळखू येतायेत का?

 

Modi-In-Childhood Inmarathi
SuccessStory

चहावाला ते पंतप्रधान असा ज्या व्यक्तीचा प्रवास आहे. ज्या व्यक्तीने एका मोठ्या राजकीय पक्षांचं अस्तित्व धोक्यात आणलं. जे आजकाल ट्रॅव्हल फ्रिक पंतप्रधान म्हणून पण ओळखले जातायेत. असे ५६ इंच छातीचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत ते…

 

A.P.J. Abdul Kalam Inmarathi
samacharnama.com

या मुलाचे आयुष्य सर्वाना प्रेरणा देण्यासाठीच होतं असं म्हणायला हरकरत नाही. ज्यांना मॅन विथ नो हेटर्स असंही म्हणलं जातं. या फोटो मध्ये दिसणारा हा पेपर बॉय दुसरा कोणी नसून आपल्या भारताचे मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आहेत. त्यांचा सायकल ते रॉकेट हा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे.

 

Lata Mangeshkar Childhood InMarathi

 

भारताच्या संगीत क्षेत्राबद्दल विषय निघाला तर या मुलीचं नाव घेतल्याशिवाय ते सुरूच होऊ शकत नाही. भारताची गान कोकिळा, जिचा आवाज ऐकला की आजही अंगावर काटा येतो, मग ते राष्ट्रभक्ती पर गीत असो किंवा एखादं रोमँटिक गाणं. ज्यांच्या गळ्यात सरस्वती आहे असं म्हणलं जातं अश्या त्या लता दीदी आहेत.


 

amitabh bachchan Inmarathi
in.com

“हम जहाँ खडे होते हैं, लाईन वहिसे शूरु होती हैं” आजही हा डायलॉग तितकाच फेमस आहे जितका तो तेव्हा होता. या निरागस चेहऱ्याकडे पाहून कधी वाटतं का, की याला “द अँग्री यंग मॅन” असं म्हणलं जाईल.

हे तेच आहेत ज्यांच्या चित्रपटाला आजही तितकीच गर्दी असते जितकी त्यांच्या जुन्या चित्रपटांना होती, असे हे आपल्या सगळ्यांच्या आवडते अमिताभ बच्चन आहेत.

 

 

Sachin tendulkar Childhood InMarathi
India TV

हे कुरळ्या केसाचं बाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या खेळाचा देव आहे. खरंतर भारताने क्रिकेट हे जास्त इंटरेस्ट ने पाहायला सुरुवात केली ती या लहान बाळामुळेच.

पाकिस्तानी बॉलर्सच्या नाकात दम करणारा हा मुलगा आख्या जगाचा आवडता फलंदाज ठरला, असा हा सचिन तेंडुलकर. जो आज खेळत जरी नसला तरी त्याचे रेकॉर्डस् अजूनही क्रिकेट मध्ये सर्वोच्च स्थानावर आहेत.

 

madhuri-dixit_InMarathi
Radio City

एक अशी नटी जी खरतर मराठी आहे पण तिने बॉलीवूडमध्ये आपलं अढळ स्थान निर्माण केलं. ही तीच आहे जिचं सौंदर्य हे अप्सरेलाही लाजवेल असं होतं. तिने नृत्य करावे आणि ते बघतच रहावे अशी काहीतरी जादूच होती तिच्यात. तिचा अभिनय हा खरंच उल्लेखनीय आहे.


एवढ्या सुंदर अभिनेत्री बॉलीवूड मध्ये असून आजकालच्या नायकांना देखील हिच्या बरोबरच काम करण्याची इच्छा असते. ती हीच लहानपणीची माधुरी दीक्षित.

 

Rahul Dravid InMarathi
SuccessStory

ज्याला “द वॉल” असं म्हणलं जायचं. कसोटी सामन्यात तो बॅटिंगला आला की १ ते २ दिवस आउट होत नसे, बॉलर्स वैतागुन जायचे पण हा व्यक्ति तसाच उभा रहायचा. त्याचा खेल अगदी त्याच्या स्वभावसारखा होता म्हणजे शांत. हा आहे आपल्या क्रिकेट टीम चा खंदा बॅट्समन राहुल द्रविड.

 

A.R.rahman InMarathi
flickr.com

या मुलाने भारताला संगीताची एक वेगळी ओळख करून दिली, संगीताची जादू अनुभवायला मिळाली ती या माणसामुळेच. खूप शांत असा स्वभावाचा माणूस आहे हा. जास्त बोलत नाही फक्त सगळीकडचे निरीक्षण करत असतो आणि आजूबाजूच्या आवाजातुनच बऱ्याच वेळा तो त्याची धून बनवतो.

हा आहे आपला लाडका आणि खूप टॅलेंटेड ए.आर.रहमान!

 

Shahrukh Khan InMarathi
Twitter

चुकून दोन्ही हात बाहेर निघाले तर ती बॉलीवूडची स्टेप केल्याशिवाय माणूस हात खाली घेत नाही. अशा त्या फेमस स्टेपचे आपण सर्वच चाहते आहोत, तसच ती स्टेप करणाऱ्याचे देखील आपण चाहते आहोत. ती व्यक्ती म्हणजे – शाहरुख खान…! ये नाम तो सुना ही होगा…! हा त्याचा बालपणीचा फोटो…!


हे सगळे फोटो बघून एक गोष्ट मनापासून पटते…ती म्हणजे…

आज आकाशाला गवसणी घालणारे, यशाची उत्तुंग शिखरे गाठणारे लोक, मुळात तुमच्या आमच्यासारखेच सामान्य असतात!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?