छोटा राजनचा गणपती – कुंग फु पांडा च्या गावात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

विविध मंडळांच्या विविध प्रकारच्या गणरायाच्या मूर्ती आणि त्यांनी उभारलेले देखावे हे प्रत्येक गणेशोत्सवाचं खास आकर्षण असतं. विसर्जनानंतर कित्येक आठवडे ह्या देखाव्यांच्या चर्चा झडत असतात.

ह्या वर्षी मुंबईत सर्वात जास्त चर्चा असणाऱ्या मंडळांमधे अग्रणी आहे – सह्याद्री गणेश मंडळ – ज्याला छोटा राजनचा गणपती देखील म्हटल्या जातं.

ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे – गणपतीचं रूप दरवर्षी सारखंच असतं – त्यात कुठलाही बदल होत नाही.

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-002

 

ही आहे ह्या वर्षीची गणरायाची साडे सहा फुट उंच मूर्ती. गणपतीरायावर तब्बल १५ किलो वजनाचे सोन्याचे दागिने आहेत!


ह्या वर्षी सह्याद्री गणपती मंडळाने एक आगळावेगळा देखावा उभा केलाय – कुंग फू पांडा व्हिलेज.

ज्यांना Kung Fu Panda ह्या animated चित्रपट सिरीजची माहिती आहे, त्यांना हे माहिती असेल की लेटेस्ट, तिसऱ्या चित्रपटात आपल्याला पांडांच्या “सिक्रेट व्हिलेज” ची सफर घडली होती. पांडांची निसर्गरम्य वातावरणातील गमतीशीर जीवन शैली बघून लहान-मोठे सगळेच खुश झाले होते.

हेच मस्त गाव सह्याद्री गणपती मंडळाने उभं केलंय!

ह्या देखाव्याचे खास फोटोज, Marathi Pizza चे वाचक विरल शहा ह्यांनी आम्हाला पाठवले आहेत.

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-01

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-001

 

मंडळाचे अध्यक्ष, श्री राहुल वाळूंज म्हणतात –

मुंबईत मुलांना खेळण्यासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही, किमान ह्या १० तरी, मुलांसाठी हे थीम-पार्क च्या धर्तीवर कुंग फु पांडा व्हिलेज उभं केलं आहे.

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-02

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-03

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-04

 

हे गाव उभं करायला दोन महिन्यांचा कालावधी लागला आहे.

बांबू वापरून उभं केलेलं हे गाव आकर्षक रंगसंगतींमुळे खूप उठून दिसतं.

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-05

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-06

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-07

 

sahyadri-ganesh-mandal-kung-fu-panda-village-marathipizza-08

 

ह्या देखाव्यावर लक्ष ठेवण्यासाठी ३०० हून अधिक सुरक्षाकर्मी आणि स्वयंसेवक तैनात केलेले आहेत. त्याचबरोबर ३० cctv कॅमेरादेखील लावण्यात आलेले आहेत.

सह्याद्री मंडळाच्या ह्या गणपतीचीर ABP माझा ने देखील दखल घेतली आहे:

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 234 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *