‘बिग बॉस-11’ मध्ये कोणाला किती मानधन मिळत? जाणून घ्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

टीव्ही वरील सर्वात प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनमध्ये नेहेमीप्रमाणे यावेळीही धुमाकूळ माजलेला आहे. त्यातच झुबेर खानमुळे हा शो आणखी चर्चेत आला, जेव्हा त्याने चक्क सलमान खानवर एफआयआर केली. तसा या कार्यक्रमातील वाद काही नवीन नाही, खरेतर या कार्यक्रमाचा फॉरमॅटचं आहे तो. पण हे सर्व बघून आपल्याला नेहेमी एक प्रश्न भेडसावत असतो, तो म्हणजे एवढं भांडून, ओरडून आपली इमेज खराब करून काय मिळत असेल बरं… तर आज तुमच्या याच प्रश्नच उत्तर घेऊन आलो आहोत आम्ही…

InMarathi Android App

तुम्हाला काय वाटत की हे सर्व सेलिब्रिटी उगाचच भांडून, एकमेकांना शिव्या देऊन आपली टीव्ही वरील चांगली इमेज खराब करत असतील, तर अस नाहीये. त्यांना यासाठी तेव्हढेच चांगले मानधन दिल्या जाते.

चला तर मग जाणून घेऊ या ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनमध्ये कुणाला किती मानधन मिळते…

 

salman-khan-big-boss-InMarathi
ndtv.com

या शोचा होस्ट सलमान खानला एका एपिसोडसाठी तब्बल ११ कोटी देण्यात येत असल्याचं सांगितल्या जात.

 

dhinchak-pooja-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

YouTube सेन्सेशन ढिंच्याक पूजा हिची अखेर बिग बॉस च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि येताच ती ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनची सर्वात जास्त मानधन मिळविणारी कंटेस्टंट ठरली. तिने टीव्ही इंडस्ट्रीच्या आवडत्या सुनेला, म्हणजेच हीना खान हिला सर्वात जास्त मानधन मिळविणाऱ्या कंटेस्टंटच्या लिस्टमध्ये मागे सोडले.

 

Hina-khan-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही मालिकेतील ‘अक्षरा बहू’ म्हणजेच ‘खतरोकी खिलाडी’ हिना खान हिला या शोसाठी एका आठवड्याला तब्बल ७ ते ८ लाख रुपये मिळतात. ढिंच्याक पूजा यायच्या आधीपर्यंत  ती ‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनमधील सर्वात जास्त मानधन मिळविणारी कंटेस्टंट होती.

 

Hiten-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

‘सास भी कभी बहू थी’ मालिकेतील अभिनेता हितेन तेजवानी याला देखील एका आठवड्यासाठी ७ ते ८ लाख रुपये मानधन देण्यात येतं.

 

shilpa-shinde-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

‘भाबीजी घर पर है’ मालिकेतील ‘अंगुरी भाभी’ साकारणारी शिल्पा शिंदे देखील या रियालिटी शोमध्ये सहभागी झाली असून तिला आठवड्याला ६ ते ७ लाख रुपये मानधन देण्यात येत आहे.

 

vikas-gupta-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

अॅण्ड टीव्हीतील हेड प्रोड्युसर असणारा विकास गुप्ता याला देखील एका आठवड्यासाठी ६ ते ७ लाख रुपये मानधन देण्यात येत आहे.

 

Priyank-big-boss-InMarathi
bollywoodlife.com

रोडीज स्टार प्रियांक शर्मा हा जरी आता या शो मधून बाहेर निघालेला असेल तरी त्याला देखील या शोमध्ये सहभागी होण्यासाठी भरपूर मानधन देण्यात येत होते. प्रियांक शर्मा ह्याला दर आठवड्याला ४ ते ५ लाख मानधन देण्यात येत होते.

 

bigg-boss-11-InMarathi

यासोबतच शिवानी दुर्गा, सपना चौधरी यांना दर आठवड्याला २० हजार मानधन देण्यात येत.

 

bigg-boss-11-InMarathi01

तर आरशी खान आणि बेनाफ्षा यांना देखील चांगले मानधन देण्यात येत आहे.

आता कळालं या कंटेस्टंटना काय मिळत ‘बिग बॉस’मध्ये…

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *