यशस्वी जीवनासाठी चाणक्य चे १२ सूत्रं
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
गुरु चाणक्य अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, अर्थशास्त्राच्या बरोबर ते मुलांना राजकारण आणि कुटनीती देखील शिकवत असत. चाणक्यच्या याच कुटनीतीमुळेच सिकंदरला भारतातून पळ काढावा लागला होता. सर्वसाधारण चंद्रगूप्ताला ‘सम्राट चंद्रगूप्त मोर्य’ बनवण्यात चाणक्यांचेच खूप मोठे योगदान होते, चाणक्यांनी नीती शास्त्रची निर्मितीही केली होती. त्यामध्ये त्यांनी जीवन सुखी व आनंददायी कसे करावे हे सांगितले होते.

जीवनात अशी किती तरी वळणे येतात, जिथे आपल्याला दुसऱ्याच्या सल्ल्याची गरज भासते, म्हणून आज आम्ही तुम्हाला चाणक्य यांनी सांगीतलेली काही अशी सूत्रे सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जीवनात चांगल्याच गोष्टी घडतील.
१) कोणत्याही व्यक्तीने गरजेपेक्षा जास्त प्रामाणिक राहू नये. कारण सरळ असलेली झाडेच खूप कापली जातात, त्याचप्रमाणे जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट सोसावे लागतात.
२) चाणक्य मानायचे की जर आपल्याला काही आर्थिक नुकसान झाले, तर तसं चुकूनही कोणाला सांगू नये. कारण कोणीही तुमचे आर्थिक नुकसान ऐकल्यावर तुमची मदत करणार नाही, उलट तुम्हाला मदत करावी लागेल म्हणून तिथून पळ काढतील.
३) आपल्याला भूतकाळात घडलेल्या घटनेविषयी पश्चाताप नसावा आणि भविष्याविषयी चिंता देखील नसावी. बुद्धिवादी मनुष्य नेहमी वर्तमानात जगतात.

४) पुरुषाचे ज्ञान आणि महिलांचे सौंदर्य ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.
५) प्रत्येक मैत्री मागे काही ना काही स्वार्थ असतोच. जगात अशी कोणतीच मैत्री नाही जिच्या मागे लोकांचे स्वता:चे हित नसेल, हे एक कटू सत्य आहे.
६) मुलांवर त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत प्रेम करावे, नंतर दहा वर्षापर्यंत शिक्षा करावी, आणि जेव्हा ते सोळा वर्षांचे होतील तेव्हा त्यांचे चांगले मित्र बनावे.

७) भीती हि आपली सगळ्यात मोठी शत्रू आहे.
८) पैसा खूप कष्टाने मिळवला पाहिजे. आपल्या इमानदारीचा त्याग करून अथवा शत्रूच्या पायी पडून पैसा मिळत असेल, तर असे धन कधीही स्वीकारु नये.
९) ज्ञान आपला सर्वात चांगला मित्र आहे. एका शिकलेल्या व्यक्तीला सगळीकडेच सन्मान मिळतो. शिक्षण हे नेहमीच सौंदर्य आणि तरुणाईचा पराभव करते.

१०) फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने जातो, पण एका चांगल्या माणसाचा चांगुलपणा सर्वत्र पसरतो.
११) असंभव शब्दाचा प्रयोग तर भित्रे करतात, बुद्धिमान आणि धीट माणसे स्वता:चा रस्ता स्वतः तयार करतात.
१२) आपल्यापेक्षा उच्च किंवा कनिष्ठ दर्जाच्या व्यक्तीशी कधीही संगत करू नये, ते तुमच्या दुःखाचे कारण ठरू शकतात, नेहमी आपल्या बरोबरच्या व्यक्तीशीच संगत करावी.

चाणाक्यांची ही सूत्रे म्हणजे जीवन परिवर्तनाचा रामबाण उपाय म्हणावी लागतील!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.
Rigte now this is most important our life.