' चीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात – InMarathi

चीनमधील मीडिया सेन्सॉरशिप आणि नेतृत्वाची एकाधिकारशाही: जगाची सूत्रे बदलण्यास सुरुवात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely!
-John Acton.

एका प्रसिद्ध इंग्लिश इतिहासकार आणि उमद्या लेखकाचे हे शब्द! जगाची एकूण ऐतिहासिक आणि राजकीय मांडणी विस्तृत दृष्टिकोनातून पाहिली तर हे तंतोतंत खरे आहे. इतिहास स्वतःला वारंवार पुन्हा घडविण्याचा प्रयत्न करतो. काही सैद्धांतिक आणि प्रतिकात्मक वैशिष्टय या फरकाने हेही तितकंच खरं,

History repeats itself! If you are wise enough to understand, you will get to know the clarity of History!

हेगेलच्या इतिहासाच्या तत्वज्ञानात त्याने म्हणलं आहे, “इतिहास कधीच सरळ मार्गाने घडत नाही, prosperity invites chaos! In the end results, both are essentially important!”

एवढं सगळं सांगण्याचा हेतू म्हणजे, सध्या जागतिक पातळीवर घडणाऱ्या एका महत्वाच्या तितक्याच गंभीर बातमीचा प्रभाव! ११/१२ मार्च २०१८ रोजी जगातल्या एका बलाढ्य आणि शक्तिशाली देशाने राजनैतिक दृष्ट्या घेतलेला महत्वपूर्ण निर्णय-

“चीनच्या राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्ष यांच्या राजकीय कार्यकाळाची वर्तमान मर्यादा वाढवून पूढे अमर्याद करण्यात आली, त्यासाठी आवश्यक ते संविधानिक बदल करण्यास मागच्या आठवड्यात पार पडलेल्या विधिमंडळाच्या सत्रात सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली.

एकूण ३००० सदस्यांचे सत्र पूर्ण एक आठवडा चालले, यांत इतर अनेक गोष्टीचे प्रस्ताव चर्चिले गेले, पण जागतिक स्तरावर परिणाम होतील असे दोन प्रस्ताव जवळपास बिनविरोध, म्हणजे 2952 एवढ्या मतांनीशी थोडक्यात ९९.८६ % अनुमोदनाने मंजूर करण्यात आले हे विशेष!

 

youtube.com

एकंदर पाहिले तर संविधानिक बदल करण्यास प्रस्तुत केलेल्या कोणत्याही प्रस्तावास गंभीर चर्चा आणि वेळ आवश्यक असतो, पण चीनच्या राजकारणात हा प्रस्ताव मंजूर होण्यात कमालीची गतिशीलता आणली गेली हेही विशेष!

दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे राष्ट्रीय पर्यवेक्षण आयोगाची स्थापना!

या कमिशनला सर्व प्रकारच्या उच्च पदस्थ अधिकारी , आद्योगिक मंडळ, आणि व्यावसायिक यांच्यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्याचे काम असेल. या कमिशनला कॅबिनेटचा दर्जा देण्यात आलेला आहे, जेणेकरून यावर नियंत्रण स्वतः ६४ वर्षीय राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि ६९ वर्षीय उप-राष्ट्राध्यक्ष वांग किशान हे करतील. घटनेच्या मार्गाने राजकीय विरोध थोडक्यात तथाकथित गद्दारी ठेचण्याचं संविधानिक हत्यार!

ऑक्टोबर २०१७ ला झालेल्या १९ व्या नॅशनल पार्टी काँग्रेस च्या वार्षिक बैठकीत जिनपिंग यांनी येणाऱ्या काही वर्षांचे आर्थिक आणि जागतिक पटलावरचे चीनचे राष्ट्रीय धोरण जाहीर केले. या बैठकीत जिनपिंग यांना डेंग शिओ पिंग नंतरचे चीनचे सुप्रीम आणि बलशाली नेतृत्व म्हणून जाहीर(सर्वमान्य) केलं गेलं

“Xi Jinping Thought On Socialism With Chinese Characteristics For A New Era” ह्या शीर्षकाने जीनपिंग यांचे विचार मार्गदर्शक म्हणून कम्युनिस्ट पार्टीच्या संविधानात समाविष्ट करण्यात आले.

 

china-inmarathi
ralphlazar.com

जिनपिंग यांच्याकडे देशाचे राष्ट्राध्यक्ष पद, कम्युनिस्ट पार्टीचे सेक्रेटरी पद आणि चीनच्या लष्कराचे सर्वोच्च पद असे तीनही सर्वोच्च वर्तमान नेतृत्वपदे आहेत. १९ व्या पार्टी काँग्रेसच्या बैठकीत जिनपिंग यांनी त्यांचे निवडणुकी दरम्यानचे देशाला केलेले वचन पुनःश्च उद्घृत केले,

“मी वचन देतो की, चीनला समाजवादी विकासाच्या नव्या युगात घेऊन जाण्याचे सर्वंकष प्रयत्न करेन. जागतिक पातळीवर चीनचे स्थान आणखी भक्कम बनवणे सोबतच शांततामय वातावरण शाबूत ठेवण्याकडे चीन लक्ष देईल” असेही ते यावेळी म्हणाले.

माओ कालखंडातील वेदनादायी धडे घेऊन चीनला झालेली मोठ्या मानवी हानी भरून काढण्याची आणि राष्ट्रीय प्रतिमा सुधारण्याची गरज पूर्व राष्ट्राध्यक्ष डेंग शिओ पिंग यांना जाणवली होती. १९८० साली सुरू झालेल्या चीनच्या या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळात चीनचा पवित्रा स्वपरिक्षण आणि स्वविकास असा आत्मकेंद्री होता. डेंग शिओ पिंग यांनी काही ठराविक निकष ठरविले होते ते असे,

“लक्षपूर्वक विकास करणे, स्वतःची विशिष्ट प्रतिमा तयार करणे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि ती इतर देशांत परावर्तित न करणे, जागतिक पातळीवर लो प्रोफाइल राखणे”.

म्हणजेच, चीनने आत्मकेंद्री भूमिका घेऊन आर्थिक स्वावलंबन आणि स्वविकास करण्यावर भर द्यावा. जागतिक राजकारणात जास्त हस्तक्षेप न करता शेती, औद्योगिक, वैज्ञानिक आणि राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था यांतील आधुनिकीकरणाकडे लक्ष अर्थात प्राध्यान्य द्यावे असे धोरण स्वीकारले होते.

 

civil-china-inmarathi
encrypted-tbn0.gstatic.com

याचं काळात डेंग झिओपिंग यांनी संपूर्ण देशाचे नेतृत्व जर मोठ्या काळासाठी केंद्रित झाले तर राजकीय अनिश्चितता येऊ शकते हे जाणले होते म्हणूनच १९८२ साली आवश्यक असे संविधानिक बदल केले गेले आणि चीनच्या राजकारणात दोन वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याची मर्यादा आली.

२०१३ साली जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आणि राजकीय प्रमेय बदलायला सुरुवात झाली. त्यांनी धोरणात्मक बदल करून नवीन राजकीय प्रमेये मांडली, त्यानुसार चीन आता आर्थिक दृष्ट्या बराच स्वावलंबी आणि सुदृढ झाला आहे आद्योगिक प्रगती उत्तम साधली असल्या कारणाने जागतिक स्तरावर चीनचा ठसा उमटविला जाणे शक्य आहे असे जिनपिंग यांचे मार्गदर्शन सांगते.

चीन आता जगाच्या केंद्रस्थानी येण्यास तयार आहे असे जिनपिंग यांचे मत आहे.

२०५० पर्यंत चीन एक सर्वंकष समृद्ध, सामर्थ्यवान, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत समाजवादी राष्ट्र असेल असे स्वप्न जिनपिंग यांनी दिलेलं आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आणि पीपल्स आर्म्स पोलीस(PAP) यावर कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण नियंत्रण असेल. भविष्यात चीनने ‘वन रोड वन बेल्ट’ च्या रखडलेल्या कामात अधिक लक्ष घालण्याचे मंजूर झाले आहे.

२०१३ पासून जिनपिंग यांनी बरेच फेरबदल केले. मूळ पोलिटब्युरो मध्येही सध्याच्या 18 सदस्यांपैकी 15 तर जिनपिंगच्या मर्जीतले आहेत अशी माहिती आहे. मुख्य म्हणजे यांत, परराष्ट्र संबंध आणि धोरण हे खात सांभाळणारा म्हणजेच स्टेट कॉन्सलर ईंचार्ज ऑफ फॉरेन अफेयर्स चा चायनीज प्रतिनिधी नेताही पोलिटब्युरो मध्ये सामील करण्यात आलेला आहे. हा नेता इंडो-सायनो बॉर्डर निगडित समस्या हाताळतो. प्रथमच कोणा अश्या नेत्याला पोलिटब्युरोमध्ये स्थान मिळावं हे विशेष!

 

CMA-inmarathi
esource.jobscina.com

सरकार आणि कम्युनिस्ट पक्षाच्या बळकटीसाठी सर्व सत्तेचं केंद्रीकरण आणि पॉलिसी मेकिंग कमिटीची पुनर्रचना यांसारखे मुख्य बदल केले गेले. त्यांनी देशात सर्वप्रथम भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवली, जेणेकरून सर्व विरोधी पक्षनेते आणि मोठे उद्योगपती स्वतःच्या नेतृत्वाखाली यावेत असे प्रयत्न केले, आणि घडलेही तसेच! राष्ट्रीयीकृत उपक्रमांना प्राधान्य आणि बळकटी देणे, नियंत्रित बाजारव्यवस्था आणणे, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ठेऊन अभिनव उपक्रमांना उभारी देऊन जिनपिंग यांनी चीनला प्रगतीपथावर अग्रस्थानी ठेवण्याची स्वप्ने दिली आहेत.

परंतु हे सर्व बदल करताना मोठी सौदेबाजी, मीडियावर बरेच प्रतिबंध, तसेच मुक्त पत्रकारिता, लेखन व इतर कला यांवर अलिखित सेन्सॉरशिपची गदा आणली गेली आहे. गेल्या काही दिवसातील राजकीय हालचालींवर चीन मधील मुख्य मीडिया फक्त प्रशंसनीय वृत्त देण्यात व्यस्त आहे हेही खरेच!

याचप्रमाणे तेथील सोशल मीडियावरील सर्व स्वतंत्र ब्लॉगिंग साईटवरील टिप्पणी हा सेक्शन तात्पुरता निष्क्रिय करण्यात आला आहे. अमेरिकेचे वर्तमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे तर अमेरिकेतील ह्यूमन राईट्सने कठोर निंदा व्यक्त केली.

Xi asked all people to obey the Constitution and then used the Amendment to place himself above it. He used the Constitution as ultimate legal weapon that binds officials & citizens of china.

एका गोष्टीची आठवण झाली.

“जर्मनीच्या एकीकरणानंतर बिसमार्कने जर्मनीला आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवून सर्व जगाशी हितसंबंध निर्माण करून ते जोपासले, आणि कायझरने अति राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली संकटे ओढवून घेतली”

शेवटी एक म्हण सांगावीशी वाटते–

बिसमार्कने कमविले ते कायझरने गमावले!!

अंततः जागतिक शांतता नेहमी टिकून राहो हीच प्रामाणिक इच्छा!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?