' “देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र – InMarathi

“देवेंद्रजी, परिस्थिती चिघळल्यास तुम्ही जबाबदार असाल”: औरंगाबाद दंगल, खा. चंद्रकांत खैरेंचे पत्र

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

गेल्या महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या धार्मिक दंगलीच्या पोलीस तपासादरम्यान आता अनेक धागेदोरे समोर येत आहेत. जसजसा पोलीस तपास पुढे जातोय तसा पोलिसांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे खासदार चंद्रकात खैरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपले म्हणणे मांडले आहे. हे पत्र वाचकांसाठी प्रसिध्द करत आहोत.

===

दिनांक- २७/०६/२०१८

प्रति,
मा.देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,
महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई ३२

विषय- संभाजीनगर येथे धर्मांध प्रवृत्तींकडून २६/०६/२०१८ रोजी घडविलेल्या गेलेल्या प्रकारा संदर्भात कार्यवाही करिता.

महोदय,

खरं तर आपण गृहमंत्री आहात आणि मुख्यमंत्री देखील आहात…मी एक लोकनियुक्त खासदार आहे…पत्र लिहित आहे कायदा सुव्यवस्था संदर्भात… एका खासदाराला कायदा सुव्यवस्था या संवेदनशील विषयाकरिता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याची वेळ का येते हा विचार करूनचं मग पत्र वाचावं ही विनंती.

 

youtube.com

काल दुपारी मी दिल्ली येथे असतांना मला माझ्या संभाजीनगर (औरंगाबाद) मतदार संघातील काही हिंदू समाजाच्या व्यापारी बंधूंचा शहरातील सिटी चौक भागातून फोन आला व काही मुस्लीम समाजाचे लोक अल्लाहू अकबर या घोषणा देत त्यांची दुकाने धमक्या देत बंद करायला लावीत होते. मी तत्काळ पोलीस उपयुक्त श्री ढाकणे यांना फोन करून परिस्थितीची जाणीव करून दिली.

त्यानंतर काही क्षणातच ५ ते ६ हजार मुस्लीम समाजातील लोकांचा जमाव सिटी चौक पोलीस ठाण्याकडे निघाला आणि जबरदस्तीने त्यांनी सर्व परिसरातील दुकाने बंद करायला लावली.

त्यानंतर तत्काळ मी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना फोन करून परिस्थिती नियंत्रणात आणून भयभीत झालेल्या माझ्या हिंदू व्यापार्यांना तत्काळ पोलीस बंदोबस्तात दुकाने उघडून देण्याची विनंती केली त्यावर त्यांनी मी तिकडेच निघालो आहे आपण देखील आपल्याकडून शांतता पाळा अशी विनंती केली, तोवर मला येणाऱ्या असंख्य भयभीत हिंदूंच्या फोन ला आपण शांत राहा मी पोलिसांशी बोललो आहे असें उत्तर देत राहिलो आणि शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या दरम्यान सदर जमाव MIM आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर धरणे देण्यासाठी बसला त्यांच्या सोबतच्या काही मुस्लीम महिलांनी पोलीस स्टेशनवर बांगड्या फेकल्या ज्या वेळेस खुद्द पोलीस आयुक्त पोलीस ठाण्यात बसून होते.

 

news-inmarathi

 

विशेष म्हणजे सदर ठिकाणी आंदोलनाची कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नव्हती व तेथे पोलिसांकडून अनेक दिवसांपासून कलम १४४ लागू केलेले आहे.

काही दिवसांपूर्वी संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये MIM ने घडविलेल्या दंगली मध्ये पोलीस तपासा करिता काही व्यक्तींना पोलिसांनी रीतसर कोर्टाची परवानगी घेऊन अटक केली व ती अटक करू नये या मागणीसाठी मला काही दिवसांपूर्वी पत्र लिहून शांतता राखण्या साठी आपण शांतता मार्च काढू म्हणणाऱ्या दुतोंडी आमदार इम्तियाज जलील यांनी माझ्या हिंदू बांधवांच्या मध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, तसेच कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत थेट पोलीस ठाण्यासोर पोलीस आयुक्त पोलीस ठाण्यात उपस्थित असतांना सभा घेतली.

जमावबंदी असतांना पोलीस ठाण्यासमोर उभं राहून सदर भाषण करतांना पोलीस फेरीवाल्यांकडून हप्ते घेतात असं विना पुरावा विधान जलील यांनी केलं तेव्हा संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांच्या सर्व बेड्या पोलीस ठाण्यात शोभेच्या वस्तू म्हणून ठेवल्या होत्या की अटक करायला पोलिसांची हिम्मत होत नव्हती?

सदर घटनेबाबत १४४ कलम लागू असतांना पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या ५-६ हजार लोकांनी महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर जो आरोप केला त्यावर आपण काही कार्यवाही करणार आहात का?

सदर पोलीस ठाण्यात धर्मांध लोकांच्या भीतीने खुद्द पोलीस आयुक्तांना मागच्या दाराने प्रवेश करावा लागतो हीच महाराष्ट्राच्या गृहखात्याची मर्दानगी आहे का? कालच्या प्रकारात पोलीस ठाण्यासमोर १४४ कलमाचे धीदवडे उडवून ५-६ हजार लोकांना सोबत घेवून ४ तास घोषणाबाजी करणाऱ्या MIM आमदार इम्तियाज जलील वर गुन्हे दाखल करणार का?

 

devendra-fadanvis-inmarathi

 

माझ्या या मागण्यांवर आपण योग्य ती कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहेच परंतु जर आपल्या गृहखात्याला ते जमत नसेल तर तसे लेखी आम्हास कळविण्याची व्यवस्था करावी त्या नंतर आम्ही शिवसैनिक या धर्मांधांचा बंदोबस्त आणि त्याच बरोबर माझ्या हिंदू बांधवांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत करायला तयार आहोत…

या आधी देखील आम्ही ते काम केलं आहे, हिंदुत्व रक्षणाचे ब्रीद घेऊनच आम्ही जगत आहोत आणि तसे संस्कारचं शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंनी आमच्यावर करून ठेवलेत,आम्हास ते नवीन नाही…फक्त आपण तसे कळवावे अन्यथा या निजामाच्या औलादिंचा योग्य तो बंदोबस्त करून माझ्या शहरात शांतता राहील याची चोख व्यवस्था करावी हीच विनंती आहे अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास त्यास फक्त आपलं गृहखात जबाबदार असेल याची मी आपणास योग्य वेळी जाणीव करून देत आहे.

जय महाराष्ट्र…!
आपलाच
चंद्रकांत खैरे
खासदार-संभाजीनगर.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?