तुमच्या आवडत्या सिनेकलाकारांच्या लग्नातील हे फोटो एकदा तरी पाहायलाच हवेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुमच्या आवडत्या सिनेकलाकारांच्या लग्नातील काही दुर्मिळ फोटो नक्कीच बघा आणि त्यांच्याबाबतीत आणखीन जाणून घ्या या लेखात!

 

१. अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय बच्चन

 

abhi aish inmarathi
news24

 

२००७ साली अभिषेक ऐश्वर्या लग्नाच्या बेडीत अडकले, याआधी अभिषेक चे लग्न राणी मुखर्जी हिच्याशी होईल अशी अफवा होती पण नंतर त्यात काही तथ्य आढळून आले नाही!

अमिताभ बच्चन यांनी सुद्धा हे लग्न खूप थाटामाटात साजरं केलं ते सुद्धा मुंबईतल्या बऱ्याच मिडीया हाउसेस ना हाताशी घेऊन ते लग्न काही चॅनल्स ना दाखवायचे हक्क दिले!

 

२.ऋषी कपुर – नितु सिंग

 

neetu rishi inmarathi
pinterest

 

ऋषी कपुर आणि नितु सिंग हि खूप आयकॉनिक अशी ऑनलाईन आणि ऑफलाईन केमिस्ट्री असलेली जोडी आहे, २२ जानेवारी १९८० मध्ये हि जोडी विवाहबंधनात अडकली, फिल्म्स मध्ये सुद्धा यांची जोडी खूप हिट झाली आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा हि जोडी हिटच ठरली!

यांचाच रणबीर कपुर हा सध्याच्या तरुण पिढीच्या गळ्यातला ताईत झाला आहे, त्याने सुद्धा बॉलिवूड वर स्वतःची अशी छाप सोडली आहे!

 

३. शाहरुख खान – गौरी खान

 

srk inmarathijpg
mynation.com

 

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने २५ ऑक्टोबर १९९१ साली गौरी खान हिच्यासोबत लग्न केले, त्या वेळेस शाहरुख बॉलिवूड मध्ये पाय रोवायचे प्रयत्न करत होता आणि त्याची ओळख हि फक्त दूरदर्शन मध्ये काम करणारा एक ऍक्टर इतकीच होती!

तरीही त्याच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर विश्वास ठेवून गौरीच्या आई वडिलांनी या दोघांचे लग्न लावून दिले, धर्म वेगळा असून सुद्धा त्यांना त्याची अडचण कधीच आली नाही!

 

४.राजेश खन्ना – डिंपल कपाडिया

 

rajesh khanna inmarathi
bollywoodshadis.com

 

हिंदी सिनेमाचा पहिला वहिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्नाच फॅन फॉलोइंग कसलं मोठं होत हे कुणाला ठाऊक नाही? तर अशा या सुपरस्टारच्या प्रेमात डिंपल कपाडिया पडली!

केवळ १६ व्या वर्षी तिने मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना उर्फ काका यांच्याशी विवाह केला, त्या नंतर आठ महिन्यांनी तिचा पहिला सिनेमा बॉबी रिलीज झाला!

 

५. अमिताभ बच्चन – जय बच्चन 

 

amitabh wedding
youtube

 

१९७३ साली आपल्या महानायकाने म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी सुद्धा जया बच्चन यांच्याशी लग्न केले, याआधी या जोडीने जंजीर सारख्या सिनेमात काम केलं आणि लग्नानंतर सुद्धा अभिमान मिली ते अगदी कभी ख़ुशी कभी गम सारख्या सिनेमातून लोकांची करमणूक केली!

 

६.दिलीप कुमार – सायरा बानू

 

Dilip-and-Saira. inmarathi jpg
freepress journal

 

१९८१ साली दिलीप कुमार या बॉलिवूड च्या ट्रॅजेडी किंग ने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या सायरा बानू शी लग्न करून बऱ्याच लोकांना सुखद धक्काच दिला, हे दिलीप कुमार यांचे दुसरे लग्न होते!

सध्या ते आणि त्यांची पत्नी सायरा बानू बांद्रा येथे स्थित असून त्यांना एकही अपत्य नाही!

 

७. रणधीर कपूर –  बबिता शिवदसानी

 

randhir kpaoor
pinterest

 

६ नोव्हेंबर १९७१ ला रणधीर कपुर आणि बबिता हे लग्नबंधनात अडकले, याआधी त्यांनी काही सिनेमात एकत्र सुद्धा काम केलं होते, तसेच बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी करिष्मा कपुर आणि सध्याची उत्तम अभिनेत्री करीना कपुर या दोघी याच दाम्पत्याचा मुली!

 

८. धर्मेंद्र – हेमा मालिनी

 

dharmendra weddingjpg
Youtube

 

ही सिनेमाच्या पडद्यावरील सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळखली जाते, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे जेंव्हा लग्नबंधनात अडकले तेव्हा बरेच वाद झाले!

धर्मेंद्र यांना पहिल्या बायकोपासून २ मुलं होती जी सध्या बॉलिवूड मध्ये काम करतायत सनी आणि बॉबी! संजीव कुमार यांना सुद्धा हेमा मालिनी शी लग्न करायचे होते पण विचारायचे धाडस न केल्याने ते शक्य झाले नाही!

 

९. जितेंद्र – शोभा कपूर

 

jitendra weddding
pinterest

 

३१ ऑक्टोबर १९७४ साली जम्पिंग जॅक जितेंद्र यांनी शोभा कपूर शी लग्न केलं, त्यांना एकता कपूर आणि तुषार कपूर अशी दोन अपत्य देखील आहेत जे फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करतात!

 

१०. आमीर खान – रीना दत्ता 

 

aamir-reena_0
India today

 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची किरण राव ही काय पहिली बायको नाही, जेंव्हा कयामत से कयामत ताक रीलीज झाला त्यांनतर आमिरने रीना दत्ता हिच्याशी लग्न केले.

आणि ते १५ वर्षे टिकले पण त्यांनतर त्यांनी रीतसर घटस्फोट घेऊन आमिर ने किरण राव शी लग्न केले, आज त्याला ३ मुलं आहेत!

 

११. संजय दत्त – रीचा शर्मा

 

sanjay dutt inmarathi
bollywood shadis

 

१९८७ मध्ये संजय दत्त ने रीचा शर्मा या अभिनेत्रीशी लग्न केले होते नंतर त्याने वेगळे होऊन मान्यता दत्त हिच्याशी लग्न केले!

 

१२. सैफ अली खान – अम्रिता सिंग

 

saif inmarathi
Desi martini

 

टायगर पतौडी आणि शर्मिला टॅगोर यांचा मुलगा सैफ अली खान याचे पहिले लग्न त्यावेळची लोकप्रिय अभिनेत्री अम्रिता सिंग हिच्याशी झाले होते, नंतर तिच्याशी घटस्फोट घेऊन सैफ ने करीना कपूर शी लग्न केले!

मजेचा भाग म्हणजे सैफच्या पहिल्या लग्नात करीना हि ७ वीत होती, अम्रिता पासून सैफ ला एक मुलगी आहे जिचं नाव सारा अली खान जिने नुकतंच फिल्म इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलंय!

तसेच सैफ आणि करीनाच्या तैमूर ची चर्चा नेटकऱ्यांसाठी एक विशेष खाद्य आहे!

 

१३. अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना

 

akshay inmrathi
bollywwodshadis.com

 

१७ जानेवारी २००१ साली खिलाडी कुमार अक्षय कुमार ने काका आणि डिंपल च्या मुलीशी म्हणजे ट्विंकल खन्ना हिच्याशी लग्न केलं, लग्नानंतर ट्विंकल ने तीच्या फिल्म करीयर ला पूर्णविराम दिला!

 

१४ करिष्मा कपूर – संजय कपूर

 

Karisma-Kapoor inmarathi
indiatvnews.com

 

२००३ साली करिष्मा कपूर हिने एक मोठा बिझनेसमन संजय कपूर शी लग्न केले, लग्न मुंबईतच पार पडले आणि २०१४ साली हे जोडपं रीतसर घटस्फोट घेऊन वेगळं झालं!

१५. शाहीद कपूर – मीरा राजपूत

 

 

shahid kapoor inmrathi
bollywoodshadis.com

 

करीना, प्रियांका अशा अभिनेत्रींसोबत नावं जोडली गेल्यावर शाहीद कपूर ची इमेज खूप वेगळी झाली होती, आणि यातल कोणतंही रिलेशन जास्त काळ टिकलं नाही, पण २०१५ साली त्याने नॉन फिल्मी बॅकग्राउंड असलेल्या मीरा राजपूत हिच्याशी रीतसर अरेंज मॅरेज केलं!

 

१६. ह्रितिक रोशन आणि सुझेन खान

 

hrithik inmarathi
Youtube

 

ज्याच्या लुक्स मुळे आणि बॉडी मुळे, घाऱ्या डोळ्यांमुळे ज्याला ग्रीक गॉड म्हणतात अशा ह्रितिक रोशन चे लग्न सुझॅन खान हिच्याशी झाले, नुकत्याच झालेल्या खूप मोठ्या काँट्राव्हर्सी मुळे त्यांनी एकमेकांपासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला!

 

१७.बिपाशा बसू – करण सिंग ग्रोव्हर

 

bipasha wedding inmarathi
India tv

 

ऑनस्क्रीन केमिस्ट्री जबरी असलेलं आणखीन एक कपल म्हणजे बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर, बिपाशा आधी जॉन बरोबर रिलेशन मध्ये होती पण नंतर ते वेगळे झाले, करण चे हे तिसरे लग्न असून २०१६ मध्ये त्याने बिपाशा शी लग्न केले!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?