भगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करू पाहणाऱ्या ह्या माणसाला उत्कृष्ट उत्तर मिळालंय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

खरंतर शहीद भगतसिंग आणि काश्मीरामध्ये राहून आपल्याच देशाविरुद्ध कारवाया करणारा देशद्रोही बुर्हान वाणी ह्यांची तुलना होऊच शकत नाही, हे देशाभिमान असलेला अगदी लहानगा पोरगाही छातीठोकपणे सांगेल. पण आपल्यातच काही लोक असे आहेत ज्यांना खाली डोके आणि वर पाय करून विचार करण्याची सवयच जडलेली असते. अश्याच लोकांपैकी एकाने क्वोरा ह्या सोशल साईटवर एक प्रश्न विचारला की,

भगत सिंग आणि बुर्हान वाणी दोघेही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी लढताना मृत्यू पावले, तरी भगत सिंग यांना ‘शहीद’ म्हटले जाते आणि बुर्हान वाणीला ‘दहशतवादी’ असे का?

bhagat-singh-burhan-wani-marathipizza00
हा प्रश्नच मुळात बिनडोक आहे आणि त्याला जशास तसे उत्तर मिळणे अपेक्षित होते आणि तसे झाले देखील. काताकाम मानस तेजा ह्या हैद्राबाद येथे राहणाऱ्या आणि क्वोरा वर अॅक्टीव्ह असणाऱ्या इतिहास प्रेमीने ह्या प्रश्नाला आपल्या उत्तराच्या सहाय्याने जबरदस्त चपराक दिली आहे.

काताकाम मानस तेजा म्हणतात की,

जर कोणाला वाटत असेल की बुर्हान वाणीची शहीद भगत सिंग ह्यांच्याशी तुलना केली जाऊ शकते तर मी म्हणेन की असा विचार करणारा एक तर विचाराने दुर्बल असावा किंवा बुद्धीने विक्षिप्त असावा.

आपण सर्वात प्रथम दहशतवादाची व्याख्या पाहू –

राजकीय ध्येयाने उद्दिक्त होऊन हिंसा आणि धमकीच्या जोरावर, विशेषतः सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर कृत्ये करण्याला दहशतवाद म्हटले जाते.

भगत सिंग हे महान होते आणि त्यांना शहीद हा दर्जा का दिला गेला कारण त्यांनी कधीही कोणत्याही सामान्य नागरिकांची हत्या केली नाही. मग तो माणूस ब्रिटीश असो व भारतीय. त्यांची ब्रिटीश सरकार विरोधात आणि भारतीयांचे शोषण करणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांविरोधात होती.

bhagat-singh-burhan-wani-marathipizza01
gabruu.com

पण दुसरीकडे तुम्ही म्हणताय त्या हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुर्हान वाणीचे हात कित्येक निष्पाप जीवांच्या रक्ताने माखलेले आहेत.  त्याने केलेल्या कृत्यांचा पाढा वाचायचा असले तर ही लिंक नक्की पहा आणि स्वत:च ठरवा बुर्हान वाणीला दहशतवादी संबोधायचं की शहीद संबोधायचं?

अजून एक महत्त्वाची गोष्ट जी अजिबात दुर्लक्षित करून चालणार नाही ती म्हणजे, तो केवळ दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा कमांडरच नव्हता तर त्याने सोशल मिडीयाच्या सहाय्याने देखील कित्येक तरुण मुलांना भूलथापा देऊन त्यांचे ब्रेन वॉश करून ह्या वाईट कृत्यात त्यांना सामील करून घेतले आणि कित्येक घरे उध्वस्त केली, त्यांच्या आई-बापाचा, भावंडांचा आधार हिरावून घेतला.

बरं अजून एक महत्वाची गोष्ट जी की भगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल ती म्हणजे, लष्कर-ए-तयब्बा ह्या कुख्यात दहशतवादी संघटनेने जी अनेक हिंसक कृत्ये केली आणि निष्पाप नागरिकांचा बळी घेतला त्या संघटनेशी देखील बुर्हान वाणीचे संबंध होते.

bhagat-singh-burhan-wani-marathipizza02
ndtvimg.com

दुसरीकडे भगतसिंग यांच्याकडे पहा, त्यांचे विचार, त्यांनी केलेले कार्य, त्यांची जीवनगाथा ही प्रेरणादायी आहे. पण बुर्हान वाणीने असे कोणतेच प्रेरणादायी विचार समाजात पसरवलेले माझ्यातरी ऐकिवात नाहीत. उलट त्याने तरुणांच्या मनात विष कालवण्याचेच कार्य केले.

आताही जर तुम्ही म्हणत असाल की बुर्हान वाणी ह्याला स्वातंत्र्यवीर वा शहीद म्हणावे, तर तुम्हाला खरंच कोपरा पासून नमस्कार!

===

तर मंडळी असे होते हे उत्तर, अगदी डोळ्यात अंजन घालणारे! ह्यावर जमल्यास तुमची ही मते कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?