केवळ एका (अंध?)श्रद्धेपोटी मुंबईमधील अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये एक गमतीशीर साम्य आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मुंबई म्हणजे मायानगरी! देशाची आर्थिक राजधानी! तसं हे शहर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे , पण जगातील इतर शहरांसारखं मुंबई देखील खास प्रसिद्ध आहे ते गगनचुंबी आणि भल्यामोठ्या ईमारतींसाठी! पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का?

या दिमाखदार इमारतींपैकी अनेकांमध्ये १३ वा मजला तुम्हाला सापडणारच नाही…!

पुढल्या वेळेस कधी मुंबईमधल्या प्रसिद्ध हॉटेल्स किंवा इमारतींमध्ये गेलात ज्यांना १३ पेक्षा जास्त मजले आहेत, तर लिफ्ट मध्ये गेल्यावर १३ नंबरचा आकडा शोधा. ९०% इमारतींमध्ये तुम्हाला १३ नंबरचे बटन सापडणारचं नाही. काय दचकलात ना हे ऐकून? चला तर मग जाणून घेऊया या मागचं कारण आहे तरी काय!

 

no-13th-floor-marathipizza

स्रोत

सगळ्यात पहिलं हे समजून घ्या की ही लोकांची श्रद्धा (अंधश्रद्धा?) आहे.

इमारत बनवणारे बिल्डर्स १३ क्रमांकाचा आकडा हा अशुभ मानतात. त्यांच्या मते शुक्रवारी जर १३ तारीख आली तर ती अजून अशुभ असतें, कारण या वेळेस दुष्ट शक्ती जाग्या होतात. आणि या गोष्टीचे पुरावे म्हणून हे लोक शुक्रवारी १३ तारीख आलेल्या दिवशी जगभरात आजवर घडलेल्या अनेक वाईट घटनांचे दाखले देतात.

बिल्डर्स १३ वा मजला न बांधता स्वत:च्या मनाला अशी खात्री करून देतात की आता आपली बिल्डींग सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही वाईट शक्तींचे सावट नाही. एखादी इमारत ३० मजल्याची असेल तर १३ व्या मजल्याला १३ क्रमांक न देता त्याला १४ क्रमांक दिला जातो.

 

no-13th-floor-marathipizza01

स्रोत

नरीमन पॉइंट वरच हॉटेल ट्रायडंट तर सर्वांनाच माहित असेल. मुंबईमध्ये केवळ या हॉटेलच्या इमारतीमध्ये १३ वा मजला आहे. पण या मजल्याला टाळा लावून ठेवला आहे. येथे येण्याची परवानगी कोणालाही दिली जात नाही. हॉटेल ट्रायडंटच्या व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात येते की,

पूर्वी हा मजला सुरु होता. अनेक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचा येथे राबता असायचा, परंतु कालांतराने या १३ व्या मजल्यावर अनेक विचित्र गोष्टी अनेक जणांनी पहिल्या आहेत. तसेच या मजल्यावरून बऱ्याचदा भयानक आवाज येत असतात. म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मजला बंद ठेवण्यात आला आहे.

 

no-13th-floor-marathipizza02

स्रोत

नरीमन पॉइंट वर अजून एक होईचस्ट हाउस म्हणून इमारत आहे. या इमारतीमध्ये १३ व्या मजल्यावर राहून गेलेल्या रहिवाश्यांनी अशी तक्रार केली की,

बाथरुममधून सारखा नळातून पाणी टपकण्याचा आवाज येतो, पण जेव्हा आम्ही जाऊन बघितले तर नळ पूर्णपणे बंद होता. आणि कुठेही पाणी दिसत नव्हते.

 

np-13th-floor-marathipizza03

स्रोत

मुंबईमध्ये मेकर चेम्बर्स IV नावाचे अजून एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या इमारतीमधील १३ व्या मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अशी तक्रार केली की,

मजल्यावरच्या लाईट्स बंद असल्या तरी त्या सारख्या चालू-बंद होत असतात. अनेकवेळा त्यांची दुरुस्ती देखील केली, पण हा प्रकार सतत सुरु होता.

 

no-13th-floor-marathipizza04

स्रोत

बरं हे १३ क्रमांकाचं प्रकरण केवळ मुंबईमध्ये आहे असं काही नाही. भारतातील इतर शहरांमध्ये देखील १३ आकडा टाळला जातो. अहो अमेरिका देखील या गोष्टीवर विश्वास ठेवते. अमेरिकेमधील ८५% इमारतींमध्ये तुम्हाला १३ वा मजला सापडणार नाही.

 तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?