नेहरू – अफवा, अपप्रचार आणि सत्यता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : वैभव युवराज पाटिल

===

पंडित नेहरूंवर असलेल्या विविध आक्षेपांचा निष्पक्षपणे घेतलेला धांडोळा :

नेहरूंचे पूर्वज मुसलमान होते

नेहरूंचे कुटुंब कश्मीरी होते आणि त्यांचे सर्वात जुने आणि माहित असेलेले पूर्वज होते राज कौल. राज कौल यांचे घर एका कालव्या (नेहेर) जवळ होते. आणि म्हणूनच त्यांचे आडनाव नेहरु झाले.

 

Brife History Pandit Nehru
Ndtv.com

फाळणी साठी नेहरू जबाबदार होते – आणि सरदार पटेल नसते तर देश एकसंध राहिला नसता –

 

Brife History Pandit Nehru InMarathi 10
Indianexpress.com

या संदर्भात लॉर्ड माऊंटबॅटनचे एक निरीक्षण विचारात घेण्यासारखे आहे.

कॅबिनेट मिशनची योजना जेव्हा प्रथम मुस्लिम लीगकडून व नंतर काँग्रेसकडून फेटाळली गेली, तेव्हाच फाळणी अपरिहार्य झाली होती. त्यामुळे त्यापुढच्या राजकारणाच्या दृष्टीने काँग्रेस पक्षांतर्गत जी व्यवस्था निर्माण करण्यात आली होती त्यात संस्थानांचे खाते पं. नेहरूंकडे सोपविण्यात आले होते.

पण पुढे जुलै ४६ मध्ये जेव्हा अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले त्यावेळेस पं. नेहरू पंतप्रधान, लियाकत अली अर्थमंत्री व सरदार गृहमंत्री, असे खातेवाटप झाले होते आणि गृहमंत्री म्हणून संस्थानांचा विषय साहजिकच सरदार पटेलांच्या अखत्यारित आला होता. म्हणुन पटेलांऐवजी नेहरू असते तरी त्यांनी ते काम अतिशय मुत्सद्देगिरिने केले असते.

नेहरूंचे कपडे विदेशात इस्त्रीला जायचे –

 

Brife History Pandit Nehru InMarathi 13
The Hindu

यात गैर काय आहे?

त्यांनी स्वखर्चाने चैन केली. जनतेच्या पैशाने नव्हे. आणि उलट त्यांनी त्यांचा अलहाबादचा बंगला देशाला बहाल केला होता. त्यावेळेला ज्या प्रकारची परिस्थिती होती त्यावरून कोणीही हेच केले असते.

नेहरू आणि समाजवाद

 

Brife History Pandit Nehru.7jpg
Thewire.com

तेव्हा रशिया आपला नैसर्गिक मित्र होता आणि म्हणून अशावेळी नेहरूंनी संपूर्ण साम्यवाद न स्वीकारता लोकशाही समाजवाद स्वीकारला हे निश्चितच स्पृहणीय आहे.

नेहरूंचे प्रेम संबंध –

 

Brife History Pandit Nehru InMarathi 4
Telegraph.co.uk

त्यांचे एडविना माउंटबैटनशी असलेले प्रेमसंबंध अजुनही हे सिद्ध करणारा ठोस पुरावा नाही. एडविना ह्यांच्या कन्येने लिहिलेल्या पुस्तकावरुन वगैरे असे घडले होते, असे मानण्यास बरीच जागा असली तरी ह्याला पुराव्यांची पुष्टी नाही.

समजा जरी असले प्रेमप्रकरण तर त्यावरुन नेहरूंचे सर्व कर्तॄत्व धुळिला मिळते का? शेवटी नेहरू देखील माणूस होते आणि अशा गोष्टी/चुका माणसाकडून घडतच असतात. आतातरी आपण लोकप्रतिनिधींचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे राजकीय आयुष्य हे परस्परांपासुन दूर ठेवायला हवे.

नेहरू आणि पटेल हे एकमेकांचे स्पर्धक/विरोधक होते –

 

Brife History Pandit Nehru InMarathi 15
The LiveMint.com

ही अफवा जाणिवपूर्वक राजकीय स्वार्थासाठी पसरवली जात असते.त्यांना वाटते की नेहरू चीन,पाकिस्तान बद्दल सॉफ्ट होते किंवा पटेल नेहरुंपेक्षा चांगले पंतप्रधान झाले असते. पण सत्यता अशी आहे की पटेल आणि नेहरू हे एका टीम प्रमाणे काम करत.

त्या दोघांचे एक सामायिक ध्येय होते स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष,लोकशाही आणि एकत्र भारताचे पण नेहरू तळागाळातले हिरो होते त्यांचे उदा दलित, आदिवासी, मुस्लिम इ.इ. आणि म्हणून नेहरू विरोधक नेहरुंना बदनाम करण्याचे प्रयत्न करत असतात.

नेहरुंनी घराणेशाही आणली –

 

Brife History Pandit Nehru InMarathi 17
Indiafacts.com

वास्तविक ते “श्रेय” निर्विवाद त्यांच्या कन्या इंदिरा गांधींचे होते. नेहरूंनी त्यांच्या हयातीत कधिच इंदिरा माझी वारस असेल असे सूचित केले नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “नेहरू – अफवा, अपप्रचार आणि सत्यता

 • November 29, 2018 at 6:57 pm
  Permalink

  akdam mast ani brobar

  Reply
 • December 17, 2018 at 10:07 pm
  Permalink

  खूप छ्यान

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?