' ध्वनीच्या सातपट वेगाने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय ! – InMarathi

ध्वनीच्या सातपट वेगाने मारा करणारा भारताचा हायटेक सीमारक्षक शत्रूच्या मनात धडकी भरवतोय !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय संरक्षण क्षेत्राची उत्तरोत्तर प्रगती होत चालली आहे. एकेकाळी मोठयाप्रमाणावर शस्त्रास्त्रे आयात करणारा भारत देश आता संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने पुढे चालला आहे. यामुळे भारतीय सेना ही जगातील सर्वात शक्तिशाली सेनेपैकीं एक बनली आहे.

या अश्या भारतीय सेनेच्या शस्त्रसाठ्यात आजून एका ब्रम्हास्त्राचा समावेश होणार आहे. त्या अस्त्राचे नाव आहे “ब्रम्होस”.

या ब्रम्होस क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे या क्षेपणास्त्राचा प्रचंड वेग होय. ध्वनीच्या वेगापेक्षा सातपट जास्त वेग ब्रम्होस क्षेपणास्त्राचा आहे . हे ब्रम्होस क्षेपणास्त्र हायपरसोनिक प्रकारातले असून याचा वेग मैक-7 ही वेगमर्यादा पार करणार आहे.

जगातील सर्वात वेगवान अश्या क्रूझ मिसाईल ब्रम्होस नवीन आधुनिक इंजिनच्या मदतीने १० वर्षात हायपरसोनिक क्षमता प्राप्त करणार आणि ही मिसाईल वेगाचे मानांकण असलेल्या मैक -7 या अतिउच्च वेगमर्यादेला पार करेल.

या मिसाईलचं निर्माण भारत व रशियाने एकत्रितपणे केले आहे. या संयुक्त उपक्रमाची कंपनी ब्रम्होस ऐरोस्पेस ने दिलेल्या माहितीनुसार हायपरसोनिक मिसाईल प्रणाली बनवायला आजून सात ते दहा वर्ष लागतील”. आज या क्षेपणास्त्राचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा २.8 टक्क्यांनी जास्त आहे.

 

brahmos_inmarathi
indiatoday.in

ब्रम्होस येत्या तीन वर्षातच मैक 5 ही वेगमर्यादा ओलांडणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंजिनच्या आधुनिकीकरणा बरोबरच ही मिसाईल मैक ३.५ आणि तीन वर्षात मैक ५ ही वेगमर्यादा ओलांडणार आहे.

ब्रम्होस ला एका अश्या क्षेपणास्त्राची निर्मिती करायची आहे जे येणाऱ्या भविष्यातील आधुनिक हत्यारांचा बरोबरीचे असेल व त्यांना परास्त करण्यात यशस्वी होईल.

भारतातील रक्षा अनुसंधान व विकास संघटन ( DRDO), भारतीय प्रौद्योगिक संस्थान ( IIT ) आणि भारतीय विज्ञान संस्थान ( ISC) सारख्या संस्था या प्रोजेक्ट वर काम करत असून, नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत, जे येणाऱ्या भविष्यात या प्रोजेक्टसाठी उपयुक्त ठरणार आहे. रशियन संस्था देखील या प्रोजेक्टमध्ये गुंतल्या आहेत. या संयुक्त उपक्रमात DRDO ची ५५% हिस्सेदारी आहे, बाकी हिस्सेदारी रशियाची आहे.

या प्रकल्पासाठी ३० हजार करोड रुपयांची ऑर्डर आहे. मागच्या ही वर्षात क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाले आहेत त्यामुळे हे क्षेपणास्त्र जहाज, पाणबुड्या, सुखोई -३० सारखे लढाऊ विमान आणि जमीन या ठिकाणी ठेवलं जाऊ शकतं आणि लाँच ही केलं जाऊ शकतं.

ब्रम्होस चे तंत्रज्ञान ५ ते ७ वर्ष पुढे असून, हे विश्वातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र आहे, अमेरिका व इतर कुठल्याही देशात अशी मिसाईल प्रणाली नाही आहे.

 

brahmos-inmarathi
rt.com

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इंजिन, प्रणोदन आणि लक्ष्य शोधण्याचा प्रणालीचा विकास हा रशियाकडून करण्यात आला असून, भारताने दिशानिर्देशन, सॉफ्टवेअर, ऐयरफ्रेम आणि फायर कंट्रोल यांना नियंत्रित करणाऱ्या प्रणालींचा विकास भारताकडून करण्यात आला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मिसाईल पुढचे २५- ३० वर्ष या जगावर अधिराज्य गाजवणार आहे. युद्धातील उच्चशक्तीचे लेझर तसेच मायक्रोवेव्ह ऊर्जा असणारे शस्त्र या क्षेपणास्त्राचे लक्ष असणार आहे.

ब्रम्होसच्या विकासाने भारताच्या शत्रू राष्ट्रांना धडकी भरणार असून भारताच्या लष्करी सिद्धतेत प्रचंड वाढ होणार आहे, हे मात्र नक्की आहे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?