मराठी उद्योजकांसाठी ही धोक्याची घंटा! BookMyShow मराठीत येतंय!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लेखक : कुणाल गडहिरे, “स्किलसीखो.कॉम” चे फाऊंडर, सीईओ.

===

BookMyShow + Ticketees.com + मराठी उद्योजकांचे स्टार्ट अप्स

BookMyShow मराठी भाषेत उपलब्ध होणार आहे, पण हि गोष्ट अर्थात वेबसाईटची भाषा मराठीत असण्यापर्यंत मर्यादित नसेल. भरपूर पैसे, सॉलिड रिसोर्सेस आणि इतक्या वर्षांचा अनुभव घेऊन BookMyShow मराठी नाटक आणि स्थानिक कार्यक्रमांची संभाव्य मार्केट टार्गेट करणार. मराठी स्टार्ट अप्स आणि बिझनेस जगतासाठी हि महत्वाची गोष्ट आहे.

 

book my show inmarathi

 

या BookMyShow चा मराठी नाट्यक्षेत्रातील सर्वात मोठा प्रतिस्पर्धी Ticketees.com आहे. गेल्या काही वर्षात मराठी नाट्य क्षेत्रालाऑनलाईन तिकीट विक्रीची सवय Ticketees.com ने लावली. इथल्या मार्केटमध्ये अवेअरनेसचं महत्वाचं काम त्यांनी केलं. एक अवघड बिझनेस मॉडेल त्यांनी पूर्णपणे यशस्वी केलं. गेल्या वर्षी पर्यंतच्या माझ्या माहितीप्रमाणे ते फंडिंग मिळवण्याचा प्रयत्न करत होते. सध्याची लेटेस्ट अपडेट माझ्याकडे नाही. पण एक उत्तम टीम, यशस्वी बिझनेस मॉडेल असतानाही त्यांना BookMyShow प्रमाणे इतर डोमेनमध्ये त्यांना जाता आलं नाहीये. त्यांचं Brand Name सुद्धा चांगलं आहे.

कदाचित योग्य रिसोर्सेस आणि फंडिंग मिळाली असती तर ते नक्कीच फक्त मराठी नाटकांपुरते मर्यादित राहिले नसते. 

 

tumblr_static_ticketees-cover-inmarathi

 

Ticketees.com ला मोठी फंडिंग का मिळाली नाही?

BookMyShow प्रमाणे ते एक मोठा ब्रॅण्ड का झाले नाहीयेत?

त्यांना योग्य रिसोर्सेस का मिळाले नसतील ?

आणि योग्य रिसोर्सेस आणि फंडिंग मिळाली असती तर ते आज कुठे असते?

हे प्रश्न स्टार्ट अप सुरु केलेल्या किंवा ती इच्छा असणाऱ्यांनी स्वतःला विचारावेत. त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करावा.

पण “BookMyShow” मराठी येतेय आणि त्यांच्यामुळे Ticketees.com ला स्पर्धा निर्माण होईल याचा महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांशी काय संबंध ?

तर असं आहे कि, पुढच्या पाच वर्षात भारतातील आणि अनेक ग्लोबल स्टार्ट अप्स हे स्थानिक मराठी भाषेत येतील. ते फक्त भाषांतर आणि व्याकरण इतक्या मर्यादित स्वरूपात नसतील. प्रत्येक बिझनेस डोमेन मध्ये इंटरनेटमुळे गाव पातळीवर तयार होत असलेली मार्केट काबीज करण्यासाठी किंवा ती मार्केट स्वतःसाठी तयार करण्यासाठी हे मोठे स्टार्ट अप्स, कंपन्या विशेष प्रयत्नशील असतील. यांच्या स्पर्धेत स्वतःच अस्तित्व शून्यातून उभं करणे आणि पुढे ते टिकवणं हे सोप्प नसेल. ओला आणि टॅक्सी फॉर शुअर ची माहिती असणाऱ्यांना लगेच कळेल कि मला काय म्हणायचं आहे.

(स्टार्ट अप म्हणजे नेमकं काय? बिझनेस – सेल्फ एम्प्लॉयमेंट – स्टार्ट अप मध्ये काय फरक आहे – वाचा :

स्टार्ट अप – बिझनेस – स्वयंरोजगार – ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कश्या काय? वाचा!

आणि हे सगळं चित्र असं दिसत असताना, महाराष्ट्रातील पारंपरिक बिझनेस सर्कल अजूनही सूट बूट, ब्लेझर, व्हिजिटिंग कार्ड घेऊन नेटवर्किंग मिटिंग करण्यात प्रचंड मग्न आहेत. डोळे दिपवणारे सत्कार सोहळे आयोजित करणे या वर्तुळात जास्त महत्वाचे आहेत. निवडक लोकांची लाल म्हणजे” कार्यक्रम यशस्वी हे इथलं ठरलेलं समीकरण आहे. ते असंच चालू राहील. (यांच्यापैकी कोणीहि एक उत्तम स्टार्ट अप म्हणून Ticketees.com ची दखल घेतल्याचं दिसलं नाहीये. याविषयी माझी माहिती चुकत असेल तर कृपया सांगा. )

थोडक्यात, फक्त मराठी इन्व्हेस्टर्सचा योग्य पर्स्पेक्टिव्ह नसल्याने आणि त्यामुळे फंडिंग + भलं मोठं बिझनेस व्हिजन नसल्याने टीकेटीज सारखे स्टार्टअप बुक माय शो समोर कमी पडण्याची शक्यता आहे !

आणि हीच धोक्याची घंटा आहे!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?